Skip to content

‘अरे काल कितीवेळा फोन केला, मुद्दामहून बंद ठेवलास ना!’

‘अरे काल कितीवेळा फोन केला, मुद्दामहून बंद ठेवलास ना!’


“अरे काल तुला किती वेळ फोन करत होते…
सतत बंद येत होता.
शेवटी मी कंटाळून गेले…
काय झाल..??”

मी सुनीलला काहीशी चिडूनच विचारत होते….
त्याने दिलेल्या एका पत्रिकेच्या संदर्भात त्याला सांगायचं होत…
माझ्या प्रश्नावर ओशाळून तो म्हणाला :
” ओह SO SORRY मिनल…
मी तुला सांगायचंच विसरलो ग … अग मी घरी गेलो की माझा मोबाईल बंद असतो…
Landline नंबर तुला द्यायचाच विसरलो…!”

मी त्याच्या उत्तरावर त्याच्याकडे आश्चर्य चकित होऊन बघतच राहिले…
आजच्या काळात जिथे २ मिनिट जरी मोबाईल दिसला नाही तरी वेड्यासारखे होणारे आपण सुनील नक्की आपल्याच पिढीतला आहे का ?

असा प्रश्न मनात आला.
सुनीलला बहुतेक माझ्या चेहऱ्यावर असलेल प्रश्न चिन्ह कळल होत.
तो मनापासून हसला म्हणाला :
“मला माहित आहे तू काय विचार करत असशील…
सुनील वेडा आहे का ?

खर सांगू मिनल खर शहाणपण हे मला आत्ता आल आहे.
पूर्वी मोबाईल घेण्याआधी मी घरी गेलो की मस्त आई बाबांशी गप्पा मारायचो , गिटार वाजवायचो ,
माझ वाचन देखील मस्त चालायचं.
ते खुश आणि मी देखील खुश…

एकही दिवस असा नसायचा जेव्हा काही सांगण्यासारख नसायचं.
साधा मोबाईल होता तोपर्यंत ठीक होत सगळ पण जसा हा नवीन मोबाईल घेतला सगळ चक्र बिघडून गेल…

त्याच्यासोबत आलेले गेम्स , whats अप ,
इतर chatting apps सगळ्यांनी मला अक्षरशः वेंड लावलं. एखाद्या लहान मुलाच्या हातात खेळण मिळाल की कसा तो त्याला क्षणभर देखील सोडत नाहीत तसाच काहीसा भाग झाला…

ह्या वेडापायी घरी गेल्यावर होणार्या गप्पा ,
गिटार वाजवाण इतकच काय माझ वाचन देखील थांबल.
रात्रीची जाग्रण सुरु झाली सगळच शेड्युल बिघडून गेल.

पूर्वी आईने बी पी ची गोळी घेतली की नाही हे न चुकता विचारणारा मी दिवस दिवस तिच्याशी काही बोलत नव्हतो.

तरीही आई बाबांनी माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदर करत काहीच तक्रार केली नाही.

एक दिवस माहित नाही पण फेड अप झालो. ह्या सगळ्या खोट्या तकलादू गोष्टींचा एका प्रकारचा उबक आला …

कुठेतरी वाटल ह्या यंत्रापेक्षा जिवंत संवाद हवेत.
मित्रांचे कट्टे हवेत ,चर्चा हवी , कौटुंबिक आयुष्य हव आणि सगळ्यात महत्वाच मला माझ्यासाठी वेळ हवा.

तुला कल्पना नाही मिनल ह्या मोबाईलच्या वेडामुळे आपण स्वतःच किती नुकसान करून घेत आहोत…

आपण यंत्रवत झालो आहोत ग.
कुठे थांबल पाहिजे हे देखील कळत नाही.

एखाद्या जिवलग मित्रालाही आपण सहज त्याचा फोन मेसेज नको म्हणून ब्लोक करून टाकतो.

ओंन लाइन आहोत हे लपवण्याची गरज निर्माण होते का तर अन्य कुणी आपल्याशी बोलू नये.

ज्यांना मित्र मैत्रिणी मानतो त्या सगळ्यांशी एक खोटेपणा आपण सहज करतो.

इतकच नाही तर आपल प्रेम देखील ह्या आपल्या वृतीमधून सुटत नाहीत.

कशाला हव हे सगळ ?
दिवसा ठीक आहे पण घरी गेल्यावर हे विश्व उंबरठ्याच्या बाहेरच सोडलेलं बर…

अस वाटल मला.

हे औपचारिक विश्व त्यापेक्षा ज्याला माझ्याविषयी खर प्रेम आहे त्या व्यक्तीला मी माझा वेळ देण अधिक योग्य हे मला आवर्जून जाणवलं.
एका क्षणी निर्णय घेतला आणि त्या दिवसानंतर माझा मोबाईल घरी गेलो की बंद असतो…

महत्वाच्या लोकांना घराचा नंबर दिला आहे तो पुरेसा आहे.
तुला एक गंमत सांगू इतकी शांती ,समाधान आणि मानसिक स्थैर्य मी अनुभवतो न ग…

तू पण हे करून बघ….

तुला देखील तेच जाणवेल…
हे सगळ मृगजळ आहे मिनल…
खरा आनंद हा जिवंत सहवास आणि स्पर्शात असतो हे मला कळल आहे…!”

सुनील जे काही बोलला ते ऐकल्या नंतर मी निशब्द झाले…
आज विनाकारण मोबाईल , नेट सारख्या गोष्टींच्या वेडापायी तब्येतीची , कौटुंबिक आयुष्याची वाताहत लावणारे आपण सगळेच

काहीतरी त्याच्याकडून काही शिकू का?

दमलेल्या जीवाला आपल्याच माणसांचे स्पर्श ,
जवळच्या व्यक्तीशी बोललेले प्रेमाचे दोन शब्द जेव्हा अधिक महत्वाचे वाटतील तेव्हाच हा बदल शक्य होईल…

अन्यथा हे मृगजळ आपल्याला नेहमीच भुलवत राहील ह्यात शंका नाही…

मर्यादित वापर करून नाती जपा
Forwarded As Received.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “‘अरे काल कितीवेळा फोन केला, मुद्दामहून बंद ठेवलास ना!’”

  1. Khup chan aahe Ni kharch manala patla pn aahe. Aapnhi as vagayla suruvat krayla hviy.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!