
मुलांनो स्वतः ला ओळखा!
संगीता वाईकर
नागपूर.
प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कोणत्या ना कोणत्या परीक्षेला सामोरे जावे लागते.विद्यार्थी दशेत असताना तर सतत वेगवेगळ्या परिक्षा देणे क्रमप्राप्त असते .
परीक्षा म्हंटले की यश आणि अपयश हे ओघाने आलेच.
परीक्षेचं आयोजन या साठीच असतं की त्यामुळे आपण ग्रहण केलेलं ज्ञान किती लक्षात ठेवता येतं.
अनेकविध व्यक्तिमत्त्वाचे पैलू जपत असताना चांगले शिक्षण घेणे आणि त्यासाठी उत्तरोत्तर प्रगती करणे हे मुलांचे कर्तव्य आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यातूनच ताण तणाव निर्माण होतो.पण थोडा फार ताण तणाव निर्माण झाल्या शिवाय आपण काम उत्तम रीतीने करू शकत नाही.
पालक आणि शिक्षक यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन केले तर तणाव न येता अभ्यास करता येतो.
योग्य आहार, विहार, हे देखील अत्यंत आवश्यक आहे.
एखाद्या विषयात किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले तरी निराश न होता ते कमी का मिळाले याचा विचार करून पुन्हा प्रयत्न करावा .
वेळीच नैराश्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे आयुष्यात एकच नाही तर अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते.त्यामुळे निराश होऊन चालणार नाही.
मनात नेहमी सकारात्मक विचार निर्माण करावे .नकारात्मक विचारांनी तणाव अजूनच वाढतो.
नियमित वाचन, मनन, चिंतन ,स्वाध्याय या गोष्टी करायला हव्या.
एखादा छंद किंवा खेळ जपायला हवा.त्यामुळे मन नेहमी आनंदी राहील.
वेळेचे नियोजन ही खूप महत्त्वाची बाब आहे.
प्रत्येक कामाचे नियोजन केले तर बरंच काही साध्य करता येतं.
अभ्यासात नियमितपणा असेल तर परीक्षेच्या वेळी गोंधळ होत नाही.
मोकळ्या हवेत फिरणे,प्राणायाम करणे ,वाचन यामुळेही मन प्रसन्न राहते .
मन प्रसन्न असेल तर कठीण काम देखील सहज साध्य होते .
आपल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करताना इतर विषयांचा अभ्यास देखील आवश्यक आहे .कारण शालेय अभ्यासक्रमात सर्व विषय समजून घ्यावे लागतात.
अभ्यासात काही अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांना नि:संकोच पणे विचारा .
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नव्हे तर आपण किती ज्ञान मिळवले हे तपासण्याची पद्धत आहे .
पेपर चांगला गेला नाही किंवा कमी गुण मिळाले म्हणून निराश होऊन चुकीचे पाऊल उचलू नये .तर त्यातून काय मार्ग काढता येईल या बाबत मोठ्या व्यक्तींशी चर्चा करावी .
प्रत्येक मूल हे वेगळं असतं .त्यांची आवड आणि क्षमता देखील वेगळी असते हे लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्यांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे.
अक्षर सुरेख,उत्तराची मांडणी योग्य ,आणि जे प्रश्न असतील त्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका सोडवावी .
प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते ते ओळखून स्वतः ची शक्ती ओळखावी म्हणजे योग्य पाऊल उचलणे शक्य होते.
अपयश या शब्दातच यश आहे याची जाणीव ठेवावी .
आज समाजात असे कितीतरी सर्वोच्च पदावर विराजमान असलेले व्यक्ती देखील कधीतरी अपयशातूनच यशस्वी झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
मुलांची कधीही भावंडांशी किंवा मित्रांशी तुलना करू नये.त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते.
प्रत्येक मूल हे वेगळं असतं ज्याला जे आवडेल ते केल्याने ते अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती पथावर वाटचाल करील यात शंकाच नाही.
जे आपण करू शकलो नाही ते उगाच जबरदस्तीने मुलांवर लादू नये.त्याचे परिणाम चांगले होत आहे.
विकास होण्याऐवजी ते व्यक्तिमत्व खुरटे होते.
परमेश्वर ही एक शक्ती आहे एक ऊर्जा आहे त्याचे नामस्मरण ,प्रार्थना देखील आवश्यक आहे.
शारीरिक विकास साधणे आवश्यक आहे त्यामुळे लवचिकता,ताकद,हिम्मत,चपळता,उत्साह, काट कता,सुदृढता या गोष्टी प्राप्त होतात .
रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आपण कोणतेही काम उत्तम रीतीने पार पाडू शकतो.
सतत नवे काही शिकत राहण्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.
यशाचा आनंद आणि अपयशाचा सामना करता यायला हवा.
एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे.
मन संयमित, आणि शांत ठेवावे.
कोणतेही काम धावपळ करण्यापेक्षा नियोजन पूर्वक करावे .
वस्तुस्थिती ला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला तर मार्ग निश्चित निघतो.
शिक्षण हे प्रकाश आणि सामर्थ्य यांचा स्त्रोत आहे.
शिक्षणामुळे आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक क्षमतेचा सातत्यपूर्ण आणि सामंजस्य युक्त विकास होऊन आपल्या स्वभावात बदल घडवून आणला जातो.प्रत्येकात स्व ची शक्ती आहे.हेच आपले बळ आहे.
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत हे लक्षात घेतले की यश मिळणारच आहे .
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
