Skip to content

स्वभावाला औषध नाही, हे खरे आहे का?

स्वभावाला औषध नाहीं!


सौ सुरेखा अद्वैत पाटील

मुंबई (पाचोरा)


ही म्हण खरी आहे का?

आपले विचार भावना प्रतिक्रिया आणि संवेदना यातूनच आपला स्वभाव बनतो.. माणसं ओळखायला शिकवतात आपणहून. अनेकदा विरोधी स्वभाव असलेल्या लोकांसोबत वावरण्याची वेळ येतें. विभाव असलेल्या व्यक्ती देखील असतात. अश्यावेळी स्वत्व नं गमावता शांत चित्त राहून काम करणं हेच शांतपणाचं लक्षण असतं.

काही लोकं अगदी जवळची असतात फक्त नात्याने. पण आतून काही आणी बाहेरून वेगळे. त्यामुळे त्रास देण्यात ते अगदीच पटाईत असतात. हा त्यांच्यातील विभाव.. दुसऱ्याच उणंदुणं काढण्यात ती सराईत असतात. ते पण समूहाने. त्यात त्यांचा वेळ आणी आजारी मानसिकता वाया घालवितात. या अशा विक्षिप्त वागण्याचा त्यांना मनस्वी आनंद होतो. अगदी शौर्य पदक मिळाल्यासारखा.. अगदी टवाळ बोलणं आणी टवाळखोरी करणं हा त्यांच्या आनुवंशिकतेचा कदाचित मुख्य भाग असावा असंच वाटतं.

दुसऱ्यास नावे ठेवणं किंवा तिरसटसारखं असमर्पक बोलणं एक नाहीं असें अनेक महाभाग महाभारत काळापासून जन्माला येतात आणी जातात..

व्हाट्सअप हे त्यांच्या या विक्षिप्त विचारांना प्रेरित करण्याचं माध्यम आहे असा त्यांचा गैरसमज असावा..

व्हाट्सअप वर चांगल काही टाकाव चांगला मॅसेज किंवा नवीन काही माहिती आली असल्यास ती द्यावी घ्यावी.. किंवा कुणाचं कौतुक करण्यात हात राखण करू नये. उगीच कुणाच्या मन आणी भावनांना ठेच पोहचेल अश्या पोस्ट टाकू नये वेळेच आणी प्रसंगाचं गांभीर्य ओळखावं. प्रसंगी विचारपूस करावी. उगीच खुसपटं काढून स्वतःची नालस्ती करू नये ही व्हाट्सअप वरील खुळचट लोकांना महत्वाची आणी ममत्वाची सूचना..

दुसऱ्याला लहान करून आपण मोठे होत नसतो. अगदी वयाची पस्तिशी चाळीशी पार केलेल्या महाभागांनी परिपक्व असल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करावा.. समोर आल्यावर वरवर करणारे बरेच मागे बेडूकउड्या मारतात. गृपवर त्यांना तोच अनुभव येत असावा जसं कीं बेडूक डबक्यातल्या डबक्यात उड्या मारतो पण आव समुद्रातील मगरी आणी मासे यांच्यासोबत पोहत असल्याचा आव आणतो .

पण आपण यातून एक शिकायचं लोकं हसलीत तरी चालेल पण आपण आपलं वेगळपण जपावं. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाहीं पण शब्द मनाला स्पर्शून जातात याच आपण भान ठेवावं l
गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्रं होतो. दुसऱ्याचा उपहास करून क्षणिक सुखं मिळविणारा आतून घाबरलेला असतो. आपल्या बोलण्या वागण्यातून समोरच्याच्या भावना दुखावणार नाहीं याची आपण काळजी घ्यावीl

राग आणी द्वेष सोडल्यास मनुष्य नात्यांनी श्रीमंत होतो. आणी खरा सुखी होतो.

त्यांच्या वागण्याकडे लक्ष नं देता आपल्या पद्धतीने आपलं काम करत राहणं आपणास प्रगती कडे नेण्यासाठी योग्य असेल.

ज्यानं नाती टिकविण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात तो तोडताना विचार करतो. आयतं मिळालेल्या ला त्याची किंमत शून्य असते. ज्याला आपले आप्तस्वकीय नसतात त्यांच्या कडे बघितल्यावर माणसाला आपल्याकडे असलेल्या नात्यांची श्रीमंती कळते. जीवन खूप छोटं आहे. आहे तो क्षण आणी जी आहेत ती नाती त्यांना टिकवा..
धर्तीवर पुण्य अवतरावे म्हणून एकेकाळी जी भूमी सुवर्णनांगराने नांगरली त्याच भूमीत कुरुक्षेत्रावर उठलेले काळे भिन्न धुराचे लोट आकाशाला भिडले होतें l

कौरवपांडवांचे महाभारत असेच का झाले.. याचा ही विचार करावा. द्वेष आणी आसुया यातूनच हे घडतं.. थांबविणे आपल्याच हातात असतं.. मनाचा निश्चय केल्यास चांगल वागणं सहज शक्य आहे… शेवटी सकारात्मकता वाढविणं आपल्याच हातात.सकारात्मक बदल आपण जितके आचरणात आणणार तितकं आपण यशस्वी होणार आपण जे करतो त्याची परतफेड इथेच चारपट मिळतं हा पूर्वापार चालत आलेला सिध्दांत आहे त्यामुळे नाकारत्मकता पुसावी .

दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानल्यास आपण नक्कीच सुखी होतो lहेच स्वभावाला औषध आहे.

तूच तूझ्या जीवनाचा शिल्पकार. ??


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!