Skip to content

मुली अजूनही इथे सुरक्षित नाहीत…..

मुलींनो सावध व्हा


संगीता वाईकर
नागपूर


आपल्या देशात आजही मुली सुरक्षित नाही हे वास्तव आहे.
आपल्या देशात गर्भात असताना पासूनच संघर्ष तिच्या नशिबात आहे.
जन्म झाला तरी देखील समाजात तिला मिळणारी वागणूक म्हणावी तशी आजही सकारात्मक नाही हे दुर्दैव आहे.

मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञाना मूळे गर्भ लिंग निदान करून मुलीला जन्मा आधी च संपवले गेले आणि त्यामुळे समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले .त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत .

आज विवाहासारखा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे.
काही वर्षांपूर्वी एक जाहिरात येत असे “मुलगा किंवा मुलगी काय फरक पडणार” पण सत्य हेच आहे की मुलगा आणि मुलगी यात समाज फरक करतोच .

आजही मुलगाच हवा हा घरातील वडील धाऱ्यांचा अट्टाहास दिसून येतोच.

खरं तर मुलगा असो की मुलगी ही दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत .
आज मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाही .तिने आपल्या जिद्दीने ,चिकाटीने आणि परिश्रमाने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पणाने भरारी घेतली आहे .

पण सत्य परिस्थिती मात्र आजही ती समाजात असुरक्षितच आहे.
गेल्या काही वर्षांत लक्ष्मी , प्रियांका ,अंकिता यांच्या सारख्या अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला .काहींना तर आपला जीवही गमवावा लागला.

समाजात वावरताना गाफील राहून चालणार नाही.
एखादी घटना घडते त्यामागे बरेच धागे दोरे असतात पण त्याकडे वेळीच सावध राहून लक्ष दिले पाहिजे.
आज प्रेमाच्या नावाखाली अशा अनेक घटना घडत आहेत .पण प्रेमात जीव घेतला जात नाही .

नजर ऐकण्याची क्षमता नसल्याने सरळ त्या व्यक्तीवर हल्ला केला जातो आणि त्याचा परिणाम अतिशय गंभीर समस्या करतो .
आज घरातील संवाद कमी झाला आहे आणि त्यामुळे मुलांच्या किंवा मुलींच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज येत नाही.आणि मग अविचाराने वागून असे पाऊल उचलले जाते.

आज मुलींनी शिक्षण घेतले . त्याचा फायदा नोकरी मिळाली आणि त्या स्वतंत्र झाल्या .पण बाहेरच्या जगात वावरताना आजही त्या सुरक्षित नाही.

यासाठी प्रत्येक घरातून मुलींना जसे संस्कार दिले जातात तसे मुलांना देखील देणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या सोबत काम करणाऱ्या महिलांचा आदर करणे .संकटाच्या वेळी मदत करणे गरजेचे आहे.
संयम असणे ,नकार पचवण्याची ताकद असणे देखील गरजेचे आहे.

मुलींना कोणी चुकीचे वागत असल्यास तात्काळ लक्षात येते ती क्षमता त्यांच्यात असतेच त्याकडे दुर्लक्ष न करता काही गंभीर परिणाम होण्यापूर्वीच सावध व्हायला हवे.

आपली सुरक्षा आपण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.त्यासाठी स्व सुरक्षेचे धडे घेणे किंवा त्यासाठी नेहमी दक्ष राहायला हवे.

शाळा ,कॉलेज किंवा कार्यालयात ,रस्त्यावर कुठेही काही गैर वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”मला काय करायचं ” या भूमिकेतून बाहेर पडायला हवे .तरच कोणाची मुलगी ,कोणाची बहीण यांचा बळी जाणार नाही.

आज अधिक गरज आहे ती जागरूक राहण्याची .
कोणासोबत बोलताना ,वागताना ती देखील कोणाची मुलगी, कोणाची बहीण याची जाणीव ठेऊन वागणे बोलणे आवश्यक आहे.

फार फार वर्षांपूर्वी स्त्रिया घरात राहत असत .पण हळू हळू तिने आपल्या जिद्दीने चिकाटीने आणि परिश्रमाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले .आणि अनेक क्षेत्रात यशस्वी कामगिरी करून दाखवली पण पुरुष प्रधान संस्कृतीने तिचे जगणे कठीण केले आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एक स्त्री उभी असते तसेच प्रत्येक स्त्री मागे घरातील पुरुषाने उभे राहणे आवश्यक झाले आहे.तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

आज समाजात वावरताना अतिशय जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे अशा घटनांमधील आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे.पण निर्भया सारख्या हत्याकांडातील आरोपींना अजुनही शिक्षा झाली नाही .आज आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते.आणि त्यामुळे असे गुन्हे सातत्याने समाजात घडत आहेत.अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे तरच या पाशवी वृत्तीला काही प्रमाणात आळा बसेल.

कोणीही अॅसिड टाकून विद्रूप करणे ,पेट्रोल टाकून जाळून टाकणे अशा समाज विघातक कृत्य करणाऱ्या नराधमांना तात्काळ कठोर शासन होणे गरजेचे आहे.

प्रत्येक मूल हे त्या घरातील माय बापच्या काळजाचा तुकडा असतो त्यांचे भविष्य असते. एका क्षणात अशा जीवघेण्या कृत्याने ते कुटुंब उध्वस्त होते .कधीही न भरून येणारे ते दुःख असते .अशा घटनेत जीव हानी होते किंवा कधी आयुष्यभरा साठी वेदना दायी जगण्याचा संघर्ष करावा लागतो.

घटना घडली की समाजात काही दिवस हळहळ व्यक्त होते पण जोपर्यंत अशा गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत असे गुन्हे कमी होणार नाही.

तेव्हा मुलींनो सावध व्हा.

परक्या लोकांवर अती विश्वास ठेवण्या पेक्षा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर विश्वास ठेवा त्यांच्याशी संवाद साधा .त्यांच्या संपर्कात रहा ते आपलेच सगे सोयरे आहेत.त्यांच्याशी मनमोकळा संवाद करा .



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!