प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असतात कोणाला किती वेळा प्रेम होईल, हे पण सांगता येत नाही, प्रत्येक जण आपल पाहिलं प्रेम बेस्ट म्हणत असतो,
आणि आपल्या नंतरच्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदाराशी, तिच्याशी किंवा त्याच्याशी तुलना करत बसतो, या तुलनेत आपण तिच्यातील किंवा त्याच्यातील नवीन काय आहे, हे शोधण्या ऐवजीं जुन्या जोडीदाराला त्यात शोधत बसतो ( जस ती/तो खूप छान हसायची त्याचा स्वभाव खूप शांत होता इ.), त्यामुळे नकळतपणे आपण आपल्या जोडीदाराला दुखावत असतो आणि तो मात्र, नक्की काय हवं आपल्यात अजून, या विचारत सुन्न बसतो , आणि पुन्हा भावनांचा संघर्ष , विचारांचा दमन, एकमेकांबद्दल अनादर , समजूतदारीचा अभाव, संशय या कारणामुळे नात्यांच्या घड्या विस्कळीत होतात, याच कारण एकच असतो जुन्या आयुष्यातुन पुढे नवीन आयुष्यात स्वतःला ऍडजस्ट करणं जमत नाही , आणि ज्याला जमलं तो भरभरून जीवन जगतो, ज्याला नाही कळलं तो अनेक समस्याचा अनुभव घेतो.
जगण्याची ही कला आहे मित्रांनो, नवीन येण्याऱ्या अनुभवांचा , माणसांचा, गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने पाहण्याची कला ठेवा, आयुष्यात नवीन प्रयोग करा , प्रत्येक माणुस चांगला असतो परिस्थिती माणसाला कठोर बनविते , आपण संयमाने , प्रेमाने सर्वांना आपलेसे करू आणि प्रत्येकात नेहमी काहीतरी विशेष आणि चांगल आहे अगदी आपल्या जोडीदारामध्ये देखील कमीपणा शोधणं सोडून चांगल्या गोष्टी पहा’ कमी काही असतील तर त्याना तुम्ही शिकवा.
पहा मग आपलं आयुष्य आपल्या हातातल्या रेषेवर नाही चालत तर आपल्या बुद्धीवर चालतं , सारासार विचार करून आयुष्य सकारात्मक दृष्टीने जगायला सर्वांनाच प्रत्येक वेळी जमत नाही म्हणा, पण प्रयत्न केला आणि सवय लागली तर व्यसन म्हणून नक्कीच अवलंब करू शकतो,
शेवटच्या क्षणी एवढचं म्हणेल आयुष्य सुंदर आहे जरी रोज ऐकत असाल हे वाक्य पण ज्याला समजलं तो हसत हसत नक्कीच म्हणेल खरचं हो आयुष्य खूप च सुंदर आहे.
***
लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक

______________________________________________________
फेसबुक पेज फेसबुक ग्रुप YouTube संचालक WhatsApp
फेसबुक पेज फेसबुक ग्रुप YouTube संचालक WhatsApp
_______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
खूप छान कविता
कमीत कमी एकटेपणा तरी नको तुम्ही सुचवतात त्या विचारात. किंवा तो इतर कुणी दुसऱ्याला शेवटची भेट म्हणून द्यायला नकोत.