Skip to content

नातं सांभाळणं व नातं टिकवणं या दोन गोष्टी खूप भिन्न आहेत …

नातं सांभाळणं व नातं टिकवणं या दोन गोष्टी खूप भिन्न आहेत …


लीना राजीव


या आधीचे माझे दोन ,तीन लेख याच विषयावर होते…आज कदाचित शेवटचा असेल … याचं कारण हे की ,तोच तोच पणा ,तेच मुद्दे पुन्हा येऊ नयेत जे या आधी सांगितलं त्या पेक्षा वेगळे मुद्दे मांडता आले पाहीजेत ..हाच विचार मी हा लेख लिहीतांना करते आहे….

एखादं नातं मनापासून जपायचं असेल मग ते कोणतंही असो मित्र-मैत्रीण,नवरा -बायको,नातेवाईक अगदी कोणतंही …

या नात्यातून आपण घेतो किती या पेक्षा आपण देतो किती हे पाहीलं तर बरेच प्रश्न मिटतील …

सतत समोरच्याकडून अपेक्षा करणं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की चिडचिड होणं स्वाभाविक आहे …मानवी स्वभावाचे कंगोरे आहेत हे …पण अपेक्षा करतांना त्या रास्त आहेत का ,बरोबर आहेत का हे तपासायचं कुणी …?

माणसाच्या मानसिक आणि भावनिक गरजा वेगवेगळ्या असू शकतात…याची उकल अशी कि स्त्रियांना बहुतेक भावनिक आधाराची गरज असते…अगदी कोणत्याही वयांतली स्त्री असो ..मुळचा हळवा स्वभाव ,थोडंफार का होईना दुसऱ्या वर अवलंबून असणं या नैसर्गिक प्रक्रीयेत तीला हक्काचं कोणीतरी हवं असतं की जिथे ती मोकळी होऊ शकते ..संसारातल्या अडीअडचणी,भावनिक गुंता सोडवाय साठी कोणाची तरी मदत मागते …अशा वेळी तीच्या या मानसिक स्थित्यंतरांना समजून घेणारा तीचा जोडीदार असेल तर उत्तमच ,त्यानं तेवढा वेळ तीला देणं आवश्यक असतं …

ती गरज तीची असतेच असते ..अगदीच नाहीतर एखादी जवळची मैत्रीण ,मित्र,भाऊ ,भावजय,नणंद कोणीही ही भूमिका निभाऊ शकतं …तीच्या भावना समजून घेणं आणि जमलंच तर योग्य सल्ला देणं इतकी माफक अपेक्षा असते तीची …पण तीच्या वेळेलाच तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर भावनिक दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते ..

ज्या अपेक्षेने तीनं तुमच्याकडे हात मागितलाय ती अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे ती तुटत जाते आतुन ,इथं येतो तीला सांभाळून समजावून घ्यायचा भाग …तीला आधार देणं ,तीचं म्हणणं ऐकून घेणं हे जर जमलं तर नातं फुलत जातं ..जेवढं तुम्ही द्याल ती तेवढंच परत देईल ते कशाच्याही रुपात असू शकेल अगदी तुमचे नातेसंबंध टीकवणं,सांभाळणं अगदी मनापासून होत जाईल …

पुरुषांच्या बाबतीत याच्या उलटंय त्यांना स्वतःचा स्पेस हवा असतो …त्यांची मानसिक गरज वेगळी असते …धकाधकी च्या जीवनांत ,ऊसंत घ्यायला वेळ नसतो ,सतत च्या जबाबदाऱ्या ,बाहेरची टेंशन्स यांतून सुटका हवी असते …स्वतःच्या कोषात जायला त्याला आवडतं,त्याची गरज असते ती .

स्वतःचा वेळ हवा असतो जिथं कुणीही डोकावू नये ,थोडा वेळ शांतता हवी असते ,..जगातल्या सगळ्या कटकटीं पासून स्वतःला वेगळं करायचं असतं त्याला ..आपल्या इतर आवडी निवडी जोपासायच्या असतात .

तो त्यांचा वेळ त्यांना दिला पाहीजे ..हे समजून घेणं आलं पाहीजे ..आठवडा भर जो तुमच्या सुखासाठी जीवाचं रान करतो त्याला त्याचे छंद,त्याचं स्वतःचं अस्तित्व जपायची मुभा दिली पाहीजे … त्या त्याच्या कोषात जायच्या वेळेला त्याला संपुर्ण स्वातंत्र्य देणं जमलं जोडीदाराला ,तर नात्यातलं हे देणं तो खूप असोशीनं जपेल …सतत भुणभुण करण्या पेक्षा त्याची स्पेस त्याला द्यायची तो तिथून नव्या उमेदीनं,नव्या उत्साहानं बाहेर येईल हे साधायचं स्त्री जोडीदारानं …

ईथे संवाद तितकाच महत्वाचा स्वतःला काय हवंय हे स्पष्ट सांगता आलं पाहीजे ..दरवेळी समजून घेणं समोरच्याला जमेलच असं नाही …पण संवादानं काय अपेक्षा आहेत नात्याकडून आपल्याला हे नक्कीच सांगू शकतो एकमेकांना तो विश्वास देता आला पाहीजे .. तो मनमोकळेपणा आणता आला पाहीजे .घेण्या पेक्षा देणं महत्वाचं ठरतं ईथे ..मी नात्याला जर टीकवायचं ,सांभाळायचं असेल तर काय देऊ शकतो /शकते ,ही देण्याची भावना प्रबळ असली पाहीजे …..

शेवटी नात्यातली अवीट गोडी टीकवायची असेल तर हा केलेला थोडासा त्याग तुमचं आयुष्य समाधानाच्या उत्कटतेनं भारुन टाकेल . कोणत्याही नात्याचं बहरणं,आणि मोहरणं आपल्याच हातात असतं …
ह्या लेख मालेची मी सांगता करती आहे …आणखीन काही मुद्दे आले समोर तर लिहीन पुढे कधीतरी ….

या लेखातले मी मांडलेले मुद्दे तुम्हा वाचकांना काय देऊन गेले माहीत नाही पण निदान वेगळा विचार करायला भाग पाडला तरी सार्थक असेल माझ्या लिहीण्याचं …

तुमचे या लेखा वरचे विचार मोकळेपणानं मांडू शकता तुम्ही…..सूचनांचं स्वागत असेल …



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “नातं सांभाळणं व नातं टिकवणं या दोन गोष्टी खूप भिन्न आहेत …”

  1. Dr. Maya Shinde

    खुप छान वाटले. मी स्वताला त्या ठिकाणी बघत होते. मस्त आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!