
सुखाची व्याख्या नेमकी काय?
सौ. सुरेखा आद्वैत पाटील
(पाचोरा) मुंबई
सुख हे मानण्यावर असतं! पुस्तक वाचण्यात सुख, कडेकपारी फिरण्याचे सुख, नदीमध्ये पोहायचे सुख, प्लॅटफॉर्मवर उभे असताना अचानक जागा मिळाली बसायला तर त्यातही सुख, वेगवेगळे हिल स्टेशनला जाण्यामध्ये फिरण्या मध्ये सुख, देवदर्शनात सुख यात्रेत फिरण्यात सुख, सिनेमा बघण्यात सुख एवढच काय गप्पा मारण्यात सुख असत… सुख शोधलं तर कशातही सापडत. अचानक आपली हरवलेली वस्तू सापडण्यातही. ते पण मोठे सुख असतं, सुखाची व्याख्या ही व्यक्तीपरत्वे बदलते, कुणाला दुसऱ्याची निंदा करण्यातही सुख असत.. अचानक चालून दमल्यावर झाडाखाली बसल्यावर सावलीत जे सुख मिळतं त्याला एसीची सुद्धा सर येणार नाही, तहान लागली असल्यास पाणपोई वरचे पाणी सुख देऊन जात. एखाद्या उपासी ची भूक भागवली तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्याला सुख देऊन जात. घरातलं प्रेम आणि सलोख्याच
नातही सुख देऊन जाते. आईने लेकराच्या पाठीवर मायेने हात फिरवल्यावरपण सुख.
सासरी राहणाऱ्या लेकीला माहेरचं कोणी दिसलं तर त्यातही सुख. सुखाचे असे एक ना अनेक मार्ग आहेत,
सुखामध्ये शांती, आनंद, प्रसन्नता या सार्यांची अनुभूती मिळते. आपल्यातील अंतर्मनाचा आनंदही हे पण सुखच! संत मीराच्या कृष्णभक्तीतही होते. संत मीरेने तिच्या अभंगात म्हटलेच आहे पायोजी मैंने राम रतन धनपायो, वस्तू अमोलिक दि म्हारे सतगुरु किरपा करो अपनायो….
सुखही गोष्ट कशी आहे की ती प्रत्येकाला हवी असते, आता माणूस त्या सुखासाठी खूप मरमर मरतोय पण ते सुख मिळत नाही,… जसे की आता बंगलीवजा घर बांधू या, चारचाकी घेऊया. चारचाकी घेऊन झाली, तरी हवं ते सुख मिळत नाही. तिच्यावरच मॉडेल आपल्याला घ्यायचं असतं. बंगलीवजा घर गावावर आहे तर शहरात एखादा फ्लॅट घ्यावा, मुलांना पदवीपर्यंत शिकवू मग चांगला जॉब शोधू, त्याआधी पुन्हा आपल सुरु पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायला लावू, मग कुठे चांगला अधिकाऱ्याचा जॉब मिळेल,… एक नाही अशा अनेक गोष्टी आहेत ते मिळविण्यासाठी आपली धडपड चालली आहे.. यात खरं सुख आपण विसरून चाललो आहोत. ना कोणाशी बोलनं ना कोणाला भेटण.
फक्त आता स्मार्ट फोन घ्यायचा आणि तासनतास त्यावर चॅट करायचं किंवा एखादी मूव्ही बघायची.. नाहीतर व्हाट्सअप ला स्टेटस टाक व्हाट्सअप बघ किंवा फेसबुक चाळ यातच आपण स्वतःला गुरफटून घेत आहोत.. त्यामुळे नेमकी सुखं लांब चाललीयत.
आपण त्या सुखासाठी मृगजळासारखे धावत आहोत.. मी तर म्हणेल सुख याच्यातच आहे की आपण चांगली पुस्तके वाचावित, शरीर सुदृढ, निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करावा सोबत प्राणायाम देखील करावा.. प्राणायामाने आपल्याला आपल्यावर संयम ठेवण्यास मदत होते. आणि काय चूक काय बरोबर तेही कळते. कुठे सुरू व्हावा कुठे थांबा व ते पण समजते.. जमेल तेवढी एक दुसर्यास मदत करणे. अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे. नवीन नवीन छंद जोपासणे नवीन नवीन मैत्रिणी मित्र निर्माण करणे. त्यांच्याकडून नवीन काही शिकणे.
,,, वेळ मिळाल्यास एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांना व्यायाम शिकवण किंवा त्यांना हवी ती मदत करण यातही खूप मोठं सुख आहे..
सुखाची व्याख्याच न ठरवता आल्यामुळे दुःखाच्या संगतीत आपण जातोय. म्हणून आहे त्यात सुख मानणं यातच परम सुख आहे.
आपल्या संतांनी अभंगात म्हंटले आहेच “!
” मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण”
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


Nice
खुप छान आहे खुप आवडला
लेख आवडला
सुंदर विचार केला आहे सुख हे मानण्यात आहे। मजुराची बायको फ्लॅट मधील बाईचा विचार मनात आणुन म्हणते हि किती सुखी आहे तर वरुन पाहताना फ्लॅटमधील बाई खाली बघुन विचार करते हे किती सुखी आहेत एकत्रित राहतात जोडीने काम करतात एकत्रच जेवण करतात नाही तर आपण नवर् याबरोबर कधी एकत्र जेवण केले आठवत ही नाही । दोघींच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत । प्रत्येक व्यक्तीला दुसराच सुखी वाटतो।
खुप सुंदर
खूपच छान वाटले वास्तव वादी आहे