Skip to content

तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही….


अनिल काशिनाथ नेवाळकर


आम्ही सरकारी कार्यालयात काम करणारे तिघे जिगरी दोस्त.. आमच्या शिरिष नावाचा मित्र दुपारी आम्हा दोघांना चहा प्यायला नेहमी घेऊन जात असे. दिवसभर तो काहीच खायचा नाही तरीही उत्साहाने काम करायचा.

आमच्या या दोन्ही मित्रांकडे दुचाकी वाहने होती…मी आपला मागे बसून त्यांच्याबरोबर कार्यालयाजवळ असलेल्या रंगोली नावाच्या हाँटेलमध्ये जाऊन चहाचा आस्वाद घेत असे. हाँटेलमध्ये आमच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असत. आजुबाजुला निरिक्षण आणि वेगळे चेहरे पहायला मिळायचे. एकंदरीत आमचा दिनक्रम खुपच चांगला असायचा.

त्यादिवशी आम्ही हाँटेलमध्ये नेहमीच्याच टेबलावर बसलो होतो. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गप्पा चालू होत्या.. माझं इकडे तिकडे पहाणे सुरू होते.. इतक्यात माझी नजर त्या तरुणाच्या दिशेने स्थिरावली होती. एकटाच होता.त्याची नजर मात्र भिरभिर फीरत होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती. त्याची नजर कोणालातरी शोधत होती. त्याला दरदरून घाम फुटला होता हे मला स्पष्ट दिसत होते.त्यांने मलाही एकदा पाहिले…माझं लक्ष त्या तरुणावर केंद्रीत झालं होतं. माझ्या मित्रांनी मला विचारले.. कुठे रमला आहेस?… मी खुणेनेच सांगितले… मागे वळून पहा.. त्यांनी आश्चर्याने पाहीले…. आमच्या मित्रांच्याही लक्षात आले… काहितरी गडबड आहे.

आम्हाला तिथे बसुन बराच वेळ झाला होता.शेवटी कार्यालयात काम असल्यामुळे लवकरच पोहचणे आवश्यक होते परंतु आम्हा तिघांची नजर मात्र त्याच तरुणावर होती. साधारण पंचविसतील असेल तो.आम्ही निघालोच होतो… इतक्यात तो तरुण आपलं टेबल सोडून आमच्याकडे धावतच आला… म्हणाला…I need your help… आम्ही तिघेही थोडे गडबडून गेलो होतो. आमच्यापैकी विकास चेष्टेच्या सुरात म्हणाला..yes please!! तो खुपच घाबरलेला होता.

इकडेतिकडे पहात म्हणाला may I have your company please? आमचा शिरिष मात्र थोडा वेगळा विचार करणारा होता.त्याने या परिस्थितीचा ताबा घेतला .आणि आम्हाला म्हणाला आपण याला मदत केली पाहिजे. शिरिष त्याला म्हणाला .. please have a seat!!! आम्ही सगळेच एकाच टेबलावर बसलो होतो.

तो म्हणाला I am hungry, I need to take something, .. anybody want to have anything with me..then you are welcome…

त्याने टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास एका फटक्यात रिकामा केला होता यातलं बरचसं पाणी त्याच्या अंगावर सांडलं होते. चेहरा घामाने भिजलेला होता. त्याने वेटरला वडासांबारची आँर्डर दिली. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात त्याने मागवलेली डिश वेटरने टेबलवर आणून ठेवली होती.तुम्ही कोणी माझ्या बरोबर खाणार का? असे विचारले.आम्ही सगळ्यांनी नकारार्थी सूर आळवला कारण आम्हाला कार्यालयात लवकरच पोहचणे आवश्यक होते. त्याने आपल्या समोर ठेवलेली डिश अशा प्रकारे संपवण्याचा प्रयत्न करत होता जसं एखादं लहान बाळ…

सगळं काही अंगावर सांडत होता नंतर म्हणाला … just few minutes spare for me… शिरीष म्हणाला okay. आम्ही सगळेजण तिथेच बसलो.आता काय करायचे? हा मोठा प्रश्नच होता. मध्ये बराच वेळ गेला. हाँटेलमध्ये असलेल्या गोंगाटात आम्ही भयाण शांतता अनुभवत होतो. त्याने जे काही सांगितले त्यानंतर माझी बोबडीच वळली होती. तो म्हणाला .. somebody is behind me…he wanted to kill me…आमचे तिघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते.

मला काहीच सुचत नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर मी हे दृष्य साकारले होते. एक भयानक चेहरा आणि डोळे लालभडक, मोठ्या मिशा, पागोटे बांधलेला पिस्तुलधारी माणूस… त्याने आपले पिस्तुल त्या तरुणावर रोखले आहे आणि त्याचा नेम चुकुन पुढे ही गोळी मला लागली तर इहलोकीचा प्रवास संपवून आपल्याला परलोकी जावे लागेल की काय ? असे सारखे वाटत होते. त्याचे वागणे सुद्धा एकंदरीत आम्हाला विचित्र वाटत होते.

आम्ही तिन्ही मित्र आणि तो बुचकळ्यात पडलेला तरुण एकमेकांना अंदाज घेण्यात आमचा वेळ गेला.

मधेच त्याने आपले वॉलेट काढून त्यातील बॅंकांची वेगवेगळी डेबिट, क्रेडिट कार्डस आणि पाचशे हजारच्या नोटा दाखवून तुम्हाला पाहिजे तेव्हढी रक्कम यातून घेऊ शकता पण मला मदत करा अशी विनवणी करत होता. आता याला नेमकी मदत काय हवी आहे याचा आम्हाला अंदाज येत नव्हता. शिरीष पुढे होऊन म्हणाला…. आम्ही सगळेच तुला काय मदत करु शकतो?…

तो लगेच म्हणाला… just drop me at my residence…I have my own vehicle.. you only accompanied me till I reached my residence. आम्ही म्हणालो ठीक आहे.

कोणालातरी आम्ही मदत करतो आहोत याचा वेगळाच आनंद आणि समाधान होतं. आम्ही तिघेही आणि तो पार्कींग मध्ये आलो.माझ्या दोन्ही मित्रांकडे गाड्या होत्या. शिरीष म्हणाला तू त्यांच्या मागे बस आम्ही दोघेही तुझ्या मागून येतच आहोत.त्यावेळी माझी अवस्था काय होती हे न सांगितलेलं बरं… माझ्या दोन्ही मित्रांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही…त्यांनी मला धीर दिला…अरे बस रे !!

मी भीतभीतच त्यांच्या मोटरसायकलवर बसलो.त्याने आपली मोटारसायकल सुरू केली. मी मागे भीत भीत बसलो.गाडी सूसाट वेगाने भांडारकर रस्त्याने निघून कमला नेहरू पार्क येथे थांबली. माझी तारांबळ उडाली होती. माझे दोन्ही मित्र काही केल्या आजूबाजूला दिसत नव्हते त्यामुळे मी खुपचं घाबरून गेलो होतो. इतक्यात ते मला येताना दिसले.

मला आता थोडा धीर आला होता.पुन्हा आम्ही एकत्र जमलो. तो म्हणाला… मी रस्ता चुकलो आहे. त्याने आपली गाडी वळवून पुन्हा भांडारकर रस्त्याने वळवली. मी मागे वळून पाहिले तर माझे दोन्ही मित्र माझ्या मागे होते. या दोघांना माझी काळजी वाटत होती. माझ्या मनात एक विचार आला आता हा कुठे जाणार आहे?. इतक्यात त्याने आपली गाडी सेनापती बापट रोडवर वळवली आणि पुढे रत्ना हाॅस्पिटल पुढे डावीकडे वळून एका मोठ्या सोसायटीच्या आवारात थांबवली.

मी जवळपास उडी मारतच गाडीवरून उतरलो.त्याने गाडी पार्क केली आणि माझ्याकडे न बघताच पुढे निघून गेला. मी बघतच राहिलो… तोपर्यंत माझे जिवाभावाचे मित्र माझ्यापर्यंत पोहोचले होते. आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहत काही क्षण पहात राहिलो. मीही गोंधळून गेलो होतो.

मित्रांनी विचारले…तो कुठे आहे?. मी फक्त त्या सोसायटीच्या दिशेने बोट दाखवत..

कुठेतरी मीच हरवलो होतो…..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!