Skip to content

तो असलाच पाहिजे का….?……एक सुंदर काव्यरचना !

जवळ असला तर
कधी जाईल माहित नाही
लांब गेला तर,
त्याच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही,
मला प्रश्न पडतो,
साऱ्या आनंदच गुपित त्यांच्यातच दडलंय का???
खरच, तो असलाच पाहिजे का??
त्याच्या जवळ असण्याने,
सगळे कसे,अनोळखी तरी,
नेहमीच जवळचे भासवतात,
तो ज्यादिवशी नसेल,
त्यादिवशी मात्र ओळखीचे सुद्धा ,
पाठ फिरवतात,….
मग वाटत,
हा इतका सगळ्यांना आपला वाटतो का???
खरच तो असलाच पाहिजे का???
पाकिटात जरी नसला तरी,
उगाचच तो माझ्या खिश्यातच आहे म्हणण्याचं कौतुक मला,
आणि मुठीत असला तर मग काय,
त्याच्यासारख दुसर सुख नाही म्हणा
“”””””असा हा पैसा”””””
कधी जवळचा बनून आपल्या आयुष्यात,
तर कधी आयुष्य जवळून दाखवणारा,,,,
आता आता कुठे कळत चालय…
तो एक ‘साधन ‘आहे आयुष्याचं,
बाकी स्वता लाच ठरवायच आहे,
त्याला काय मानायचं……
सर्वस्व कि ,
फक्त एक रूप साधनाच……
पैसा एक साधन आहे…त्याला सर्वस्व मानून जगणारे अमाप पैसे मिळवला तरी सुखी राहत नाहीत…कारण थोडा जरी तुटवडा भासला तरी त्यांना अस्वस्थ वाटत,बैचेन होतात….पण जो या साधनाला एका वाटाड्याच्या रुपात पाहतो.. तो मात्र जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याची शिकवण लक्षात ठेवतो…भले तो सोबत नसला तरी….
असा माणूस आयुष्याच्या “साधनेत ” या “साधनाला” खऱ्या
अर्थाने कमावतो…..
तो एक वाटाड्या आहे सोबत असेल नसेल आपण मात्र न थकता चालत राहायचं….पुन्हा तुमच्या या आशेपायी तो भेटत राहीलच…
फक्त प्रामाणिक साधक बना…
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!