
समस्यांच संधीत रूपांतर करा.
जेव्हा आयुष्यात तुमच्यासमोर समस्या, विवंचना, अडथळे येतात तेव्हा तुमची लगेचच होणारी प्रतिक्रिया कशी असते. जर तुम्ही सर्वसामान्य मनोवृत्तीचे असाल तर, तुमची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होईल,” हे माझ्याच बाबतीत का घडलं?” “आता मी काय करू?” ” माझ्या सगळ्या बेतावर पाणी पडलं.”
अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण प्रथमदर्शी आलेली निराशा कमी झाली की तुमच्या लक्षात येईल की तुमच्या समोर पर्याय आहेत. तुम्ही एक तर रडत असाल आणि समोर उभ्या ठाकलेल्या नकारात्मक परिस्थितीत सतत विचार करीत राहाल. किंवा या समस्येतून ज्या नवीन संधी मिळू शकत आहेत त्यांचा फायदा घ्यायचा प्रयत्न कराल. किंवा त्या समस्येतून काही शिकण्याचा प्रयत्न करा.
तुमचं काही काळ अनिश्चितता आणि संघर्ष ह्यात जाईल. हे मान्य आहे. पण, लक्षात ठेवा प्रत्येक समस्येला दुसरी पण एक बाजू असते. अडचण, समस्या या अनेक वेळेस आपल्याला वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात. प्रत्यक्षात कदाचित ती समस्या नसून ती संधी असू शकते. उदाहरणार्थ एखादी अडचण आल्यावर त्यातून मार्ग काढताना कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करणे आवश्यक आहे. हे तुमच्या लक्षात येईल. जर ही अडचण आली नसती तर तुम्हाला त्याची जाणीवही झालेली नसती. आणि त्यामुळेच बदल करण्याची सकारात्मक कृती ही तुम्ही केली नसती.
तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल असेल की, एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करून दाखवला. ती व्यक्ती तुम्हाला असेही सांगेल की, नोकरीतून तिला जर कमी केलं नसतं. तर हा व्यवसाय सुरू झाला नसता. प्रतिकूल परिस्थितीचा शेवट सुवर्णसंधी मिळण्यात झाला.
असं किती वेळा झाला आहे की, तुमच्या दृष्टीने तुम्ही एखाद्या नोकरी करता तिचे पात्र आहात. अशी तुमची खात्री आहे. तुमची नोकरीसाठी मुलाखत ही उत्तम रीतीने पार पडली आहे. आणि आता फक्त नेमणुकीचे पत्र केव्हा हातात पडते याची तुम्ही वाट पाहत आहात. पण, ते नेमणूक पत्र प्रत्यक्षात येतच नाही. आणि दुसर्या कुणाला तरी ती नोकरी मिळून जाते. या अनुभवांनी तुम्ही खचून जाता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर जेव्हा एखादी नवीन नोकरी चालून येते. तेव्हा मनाला जाणवतं की पहिली नोकरीची प्रत्यक्षात मिळाली नाही तिच्यापेक्षाही दुसरी नोकरी जास्त हवीहवीशी वाटणारी, जास्त चांगली आहे.
पहिल्यांदा तुम्हाला मिळालेला नकार प्रत्यक्षात वरदान ठरला. दुसरे उदाहरण तुमच्या स्वप्नातल घर आहे. एखादं घर तुमच्या कल्पनेतल्या घराशी अगदी मिळतच होता. म्हणून तुम्हाला ते हवा होता. पण प्रत्यक्षात मिळालं नाही. म्हणून तुम्ही शोध घेत राहिला आणि नंतर तुम्हाला जे घर मिळाला ते पहिल्यापेक्षा जास्त चांगला होता.
समस्या आपत्तींचा, आपल्याला फायदा कसा होतो-:
आता आपण समस्या, आपत्तींचा फायदा करून घेण्याचे 7 मार्ग कोणते ते पाहू या.
१) समस्यांमुळे आपल्याला नवीन दिशा किंवा दृष्टी मिळते. जर का तुम्ही एखाद्या जीवघेण्या दुखण्यातून बरे झाला असेल. तर ऐनवेळी पंक्चर झालेले गाडीचा, किंवा गळणाऱ्या छत या अडचणींचा तुम्ही त्रास करून घेत नाही. रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अशा छोट्या-छोट्या अडचणींमुळे चिडचिड करणं कमी होऊन आयुष्यातल्या इतर जास्त महत्त्वाच्या बाबींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.
२) जे तुमच्याकडे आहे. तुम्हाला मिळाला आहे त्याच्या प्रती कृतज्ञतेची जाणीव संकट काळात होते. अडथळे आणि समस्या विशेषता अशा समस्या तुम्ही काही गमावून बसतात. किंवा कशापासून तरी वंचित राहता. अशावेळी तुमच्याकडे आहे त्याच्या योग्यतेची तुम्हाला प्रकर्षाने जाणीव होते .तसे त्यात नवीन काही नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे .तुमच्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतल्या शिवाय त्या गोष्टीचं महत्त्व तुमच्या लक्षात येत नाही. जेव्हा गरम पाण्याची गरज असते आणि ते मिळत नाही तेव्हा तुम्हाला त्याआधी उपलब्ध असणाऱ्या गरम पाण्याचे महत्त्व लक्षात येत. आजारी पडल्यावरच तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात येत. शहाणी माणसं प्रत्येक अडचणीत शिकलेल्या धड्यानुसर अडचणींवर मात करण्यासाठी केलेली उपाययोजना पुढेही चालु ठेवतात. लक्षात ठेवा आपल्या मनातल्या विचारांच्या दिशेने आपला प्रवास सुरू असतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यातला चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचे जास्त चांगले परिणाम तुम्हाला दिसतील.
३) सगळ्या अडचणींमुळे तुमच्यातील सुप्तगुण समोर येतात. एखाद्या कठीण ,कटू अनुभवातून बाहेर पडल्यानंतर किंवा एखादा अडथळा पार केल्यावर तुम्ही भावनिक पातळीवर अधिक कणखर होता आयुष्याने तुमची परीक्षा घेतली. आणि त्या परीक्षेत तुम्ही तुमची योग्यता पटवून दिली, की पुन्हा पुढचा अडथळा किंवा संकट पेलायची तुमची अधिक तयारी झालेली असते. समस्या आणि आव्हाने तुमच्यातील सर्वोत्तम गुण नजरे समोर आणतात. आपल्याकडे असणाऱ्या क्षमतांची आधी कधीही न झालेली जाणीव आपल्याला होते. अडथळे आणि समस्या आल्या नसत्या तर ही सुप्त गुण सुप्तच राहिले असते. अडथळे आणि समस्या तुमच्यातील सामर्थ्य आणि क्षमताना तुमच्या समोर आणतात. आणि हे गुण जोपासायला आणि वाढवायला तुम्हाला प्रेरित करतात.
४) आपली संकटात तुम्हाला बदल घडवायला. आणि प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडतात. आयुष्य कितीही क्लेशकरी, नीरस आणि कंटाळवाणा झाला असला तरी काही जण त्यात काहीही बदल न करता मळलेल्या वाटांवरून मार्गक्रमण करीत राहतात. एखादा आणीबाणीचा प्रसंग किंवा संकटांची मालिका सामोरी आल्याशिवाय आयुष्यात बदल घडतच नाहीत. समस्यांमुळे तुमच्या लक्षात येऊ शकतो कि जे तुम्ही करत आहे ते आता महत्त्वाचा राहिलेला नाहीये आणि त्यात दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे.
५) अडथळे आणि संकट आपल्याला काही अतिशय मोलाचे धडे शिकवून जातात. एखाद्या अयशस्वी उद्योजकाचे उदाहरण घ्या. त्या धड्यातून संबंधित व्यावसायिक अशा गोष्टी शिकेल ज्याच्या जोरावर पुढच्या व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवू शकेल.
६) अडचणींमुळे ते नव्या संधीची कवाडं खुली होतात. एखादी मैत्री, नाते संबंध तुटतात आणि तुम्ही दुसऱ्या अधिक समाधानकारक नातेसंबंधत प्रवेश करता. एखादी नोकरी तुम्ही गमावता. पण दुसरी अधिक चांगली नोकरी तुम्हाला मिळते. या सगळ्या उदाहरणातील समस्या या समस्या नव्हत्या. तरी छुप्या संधी होत्या. एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा अधिक चांगला दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करीत असतो.
७) समस्या अडचणींमुळे आत्मविश्वास आणि स्वाभिमान वृद्धिंगत होतो. तेव्हा तुम्ही जिद्दीने सगळं बळ एकवटून एखाद्या अडचणीचा सामना करता तेव्हा तुम्हाला तुमची खरी लायकी कळते. आणि आत्मविश्वास निर्माण होतो या सकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या इतर कृतींवर होतो.
सकारात्मकतेचा शोध घेत राहा -:
तुमच्या आयुष्यात अडथळे आणि समस्या येणार याबद्दल शंकाच नाही. मी असंच सुचवत नाहीये की एखादी दुःखद घटना घडल्यास तुमच्या मनातल्या भावनांकडे दुर्लक्ष करा. किंवा वस्तुस्थिती स्वीकारू नका. मी असं म्हणते की कोणताही प्रसंग घडल्यावर ताबडतोब तो दुःखद प्रसंग होता, असं त्यावर शिक्कामोर्तब करून, तुमच्या मुळे तो घडला. तुम्ही कमी पडला. तसे विचार करत राहू नका. कधीकधी या प्रसंगातून होणारा फायदा तुम्हाला लगेच दिसणार नाही पण तो नक्की असेल.
निवड करण्याचा अधिकार तुम्हाला नेहमीच उपलब्ध असतो. तुम्हाला येणाऱ्या समस्यांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघून तुम्ही दुःखी, कष्टी व्हाल. अगदी खात्रीपुर्वक सांगु शकते की या प्रवृत्तीमुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढतातच. याउलट वरकरणी अत्यंत नकारात्मक वाटणारा एखादा अनुभव तुम्हाला एखाद्या संधी सारखा वाटेल. अशी घटना त्यातून तुम्ही बरेच काही शिकू शकाल. किंवा तुमच्या मानसिक विकासाला हातभार लागेल. विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. पण तुमच्या समस्या तुमच्या मदतीसाठी निर्माण झालेल्या असतात. तुमचा खात्मा करण्यासाठी मुळीच नाही.
म्हणूनच इथून पुढे जेव्हा तुम्हाला एखादी अडचण येईल. जेव्हा तुमची पीछेहाट होईल. तेव्हा निराश होऊ नका. आणि प्रयत्न सोडून देऊ नका. तुमच्या मनोवृत्तीच्या खिडकीवर समस्यांचे कायमची जळमट जमू देऊ नका. तर मनोवृत्तीची झाकोळलेली खिडकी स्वच्छ करा. समस्यांमुळे उडालेली धूळ खाली बसल्यावर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त स्पष्ट आणि चांगली दृष्टी मिळेल. नेपोलियन हिल यांचे शब्द नेहमी लक्षात ठेवा, ‘प्रत्येक समस्या आपल्याबरोबर तेवढ्याच किंवा जास्त फायद्याचे बीज घेऊन येत असते.’
कठीण प्रसंगातून आपण काय शिकलो, असा प्रश्न सतत स्वतःला करीत रहा. आणि सतत पुढे जाण्यावर आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्या वर लक्ष केंद्रित करा. समस्यांच्या काळात नेहमीच आशावादी मनोवृत्ती आणि मोकळ मन असू द्या. कारण यामुळे समस्येतून फायदा शोधून काढायला तुमच्या मनाला तुम्ही मदत कराल.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


प्रेरणादायी लेख
Khup Motivation milalee…. khar tar manala bhidlaaa ..,khup Aabhaar ?