
थांबवा हे सगळं
सौ सुरेखा अद्वैत पाटील
मुंबई (पाचोरा)
प्रत्येक वेळी तीचं बलिदान
दररोज एक तरी बातमी विकृत लोकांची तयार आहेच. एका माथेफिरूने पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा मृत्यू…
कुठेतरी मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी बदल हा घरातूनच व्हावा. यासाठी आई-वडील म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवा !
मुलं लहान असताना जसे आपण शिकवतो. कीं कोणतीही स्त्री आपली आई, बहीण असते, पण मुले जेव्हा तरुण होतात तेव्हा त्यांची मानसिकता बदलण्यास सुरुवात होतें.. त्यावेळी त्यांची मानसिकता बदलण्यासाठी शाळेतून सोबत घरातूनदेखील, प्रसंगी मित्र-मैत्रिणी यांच्याकडूनही या गोष्टी वर चर्चा व्हायला हवी.
कुणावरही अत्याचार किंवा अन्याय होऊ नये ही शिकवण मिळायला हवी. मुले जेव्हा मोठी होतात साधारण बारा-तेरा वर्षे वयाची. त्या वेळेला त्यांच्या मनात प्रचंड घालमेल झालेली असते. त्यांना नवीन गोष्टींचे कुतूहल असतं पण पालकांनी त्याबद्दल मुलांशी बोलायला हव…
आजकाल घरोघरी आई-बाबा सगळ्यांजवळ मोबाईल असतो.
त्यामुळे हट्टी पणा करून मोबाइल मुलं ताब्यात घेतात. आणि नको त्या गोष्टी त्यांच्या हाती लागतात.आणि त्यातून एका मित्राच्या माध्यमातून त्यांना बरीच माहिती मिळत असतेती पॉर्नोग्राफी सारख्या !सोबत आज काल टीव्हीवर होणाऱ्या सिरीयल, त्यात प्रत्येक वेळी होणारे स्त्री वरचा अन्याय याच गोष्टी बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत. मुलांना बिघडण्यात.
पालकांनी पुस्तक वाचन सुरु केल्यास, मुले देखील पुस्तक वाचतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल, आजकालची पिढी अनुकरणप्रिय आहे प्रत्येक वेळी आई-वडीलच जबाबदार नसतात तर सभोवतालचे वातावरण देखील त्यास जबाबदार असते. आपली मुलं काय करतात कुठे जातात त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण या सर्वांचा आई बाबानी नीट बारकाईने अभ्यास करावा, प्रसंगी मुलांशी चर्चाही करावी.
मुलांशी मैत्रीपूर्ण नाते संबंध ठेवावे, जेव्हा मुलांमध्ये शारीरिक बदल होतात तेव्हा आई-बाबांनी जमेल तितका मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करावा, काही वेळेला कुटुंब समुपदेशन करावं, आजकाल प्रत्येक शहरात समुपदेशन केंद्र आहेत, योग्य-अयोग्य वाईट चांगलं कुठे सुरू व्हाव कुठे थांबावं हे मुलांना आपसूकच कळतं.. आणि त्यांना योग्य प्रकारे दिशा मिळते. आपल्या भारतीयांचं संस्कार, शिक्षण या गोष्टीइतकंच समुपदेशन याला महत्व देणे गरजेचे आहे.. आपली भारतीयांची मानसिकता चांगले कपडे, चांगल्या हॉटेलात जेवण करणं, वेगवेगळ्या टूरला जाणं यावर भरमसाठ पैसा आपण खर्च करतो, पण हवा तो निकाल आपल्या हाती येत नाही.
त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला समुपदेशन ही काळाची गरज आहे. यासाठी समुपदेशन करून घेतल्यास आपोआपच कुटुंब आणि समाज पुढे जाईल यात तिळमात्र शंका नाही,,
हिंडण्या फिरण्यावर केलेला खर्च तात्पुरता समाधान देईल, व एक वेळ वसूल होणार नाही. पण कुटुंब समुपदेशन केल्यास भावी पिढी !
एक चांगला इतिहास घडविण्यास नक्कीच मदत करेल… आणि स्वहितासाठी पण उपयोगी पडेल. ?
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !

Nice