Skip to content

आयुष्यात कुठलंही ध्येय ठरवणं किती महत्वाचं असतं…माहितीये!

लोक ध्येय का ठरवत नाहीत?


ऋचा पाठक


आपल्या सर्वानाच माहिती आहे की आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही वेगळं इतरांपेक्षा निराळं काही करायचं असेल तर त्यासाठी ध्येय ठरवणे फार महत्त्वाचं असतं.

आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ध्येय ठरवणं हे यशासाठीचं एक प्रमुख कौशल्य आहे. ध्येयाविना माणूस आयुष्यातून भरकटत जातो.आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही कुठून आला आहात याला महत्व नाही तर तुम्ही कुठं चालला आहात याला महत्व आहे. आणि तुम्ही कुठं चालला आहात हे तर तुमचे विचारच ठरवतात…आणि विचारावरून ध्येय निश्चित करण्यात येत….

तुमचं ध्येय जर सुस्पष्ट असेल तर ते तुमचा आत्मविश्वास वाढवते.. ध्येय निश्चित करण्याचे इतके सारे फायदे असूनही लोक ध्येय का ठरवत नाहीत?असा प्रश्न पडतो आणि मग त्याची खलील कारण दिसतात…

1.त्यांना ध्येय महत्वाची वाटत नाहीत.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, त्यांना ध्येय महत्वाची वाटत नाहीत. ज्या कुटुंबामध्ये कोणालाच ध्येय नाहीत अशा घरात तुम्ही वाढलात किंवा ज्या समूहांमध्ये ध्येयाबाबत चर्चा होत नाहीं किवा त्यांना किंमत दिली जात नाही अशा समूहात वावरत असाल

तर ध्येय ठरवण्याची आणि ते मिळवण्याची आणि ते मिळवण्याची क्षमता हे तुमच्या आयुष्यात इतर कोणत्याही कौशल्यापेक्षा जास्त परिणाम करते,हे कळायच्या आधीच तुम्ही मोठे झालेले असता…, त्यामुळं आशा लोकांना ध्येय ठरवणं महत्वाचं वाटत नाही.

2. त्यांना अपयशाची भीती वाटते.

ध्येय न ठरवण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजेच अपयशाची भीती.सहाजिक च आहे अपयश आपल्याला दुखवते.. कित्येकवेळा तर भावनिक व आर्थिक व मानसिक वेळा जास्त त्रासदायक ठरते..त्यामुळं लोक त्यांच्या आयुष्यात ध्येय ठरवत नाहीत.

3.त्यांना टिकांची भीती वाटते.

लोकांचं ध्येय न ठरवण्याचं तिसरं व शेवटचं कारण म्हणजेच लोकांच्या टिकांची भीती वाटते. आपल ध्येय जर पूर्ण नाही झालं तर लोक आपल्यावर हसतील,खिदळतील चेष्टा करतील म्हणून लोक घाबरतात …

तुम्हाला तुमचं आदर्श भविष्य रेखाटायचं असेल तर तुमच्या हातात आहे की तुम्ही लोकांकडे किती लक्ष द्यायचं.तुमच्यामध्ये अमर्याद क्षमता आहेत,गरज आहेत त्यांना सुप्त अवस्थेमधून जागृत करण्याची…व समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक सुंदर व स्पष्ट ध्येय ठरवण्याची…

हा लेख तुम्हाला कसा वाटला?
नक्की सांगा….

आवडल्यास like करा
Share करा…आणि सगळ्यात महत्त्वाचं
मस्त रहा..आनंदात रहा..

भेटुया आपण पुढच्या नवीन
विषयाबरोबर….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “आयुष्यात कुठलंही ध्येय ठरवणं किती महत्वाचं असतं…माहितीये!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!