Skip to content

खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश!!

खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश


‘Healthy WOMEN’…….

वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.

या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.
या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या *अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त* मिळून Super woman होता येईल!

Energy boosting:
पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.

दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.
बस्स पांच मिनिटवाला नाश्ता with देशी अंदाज:
नाश्ता compulsory प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.
ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी* यांना ठामपणे “NO” म्हणायचे.

किचन क्लिनिक:
फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून *हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास* दूर सरतील.
एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की *पचनाच्या तक्रारी चक्क गायब.

कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

Fitness मंत्र
सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया.
==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.
आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता “फिरुनी नवे जन्मेन मी” हे promise स्वतःशीच करूया !

माझ्या खास ‘Healthy WOMENS’…??…. साठी माहिती ?


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश!!”

  1. हे नुसते लेख नाही नविन जगणे साठी चा धडा आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!