Skip to content

‘Positive Attitude’ ठेऊन येणारा प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया!!

दृष्टीकोन


एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच . मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते .
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते . या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती .

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले , “काय करतेयस ?” मुलगी म्हणाली, “आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे ‘negative thanks giving ‘ .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात ”

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली . बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय
मुलीने लिहीलं होतं

– मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..

-मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.

– मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते .
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

” income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे .”

” घरी भरपूर काम कराव लागत म्हणजेच माझ्याकडे एक घर , एक हक्काचे आश्रयस्थान आहे ..”

” सणासूदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत .”

गोष्टीचे तात्पर्य –
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..

चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “‘Positive Attitude’ ठेऊन येणारा प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया!!”

  1. Rajendra Tatar marriage Counselor

    खूप छान व बोध घेणारी गोष्ट आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!