Skip to content

खळखळत जगा… नितळ झ-यासारखं शुद्ध..!!

।। झरा ।।


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं.

माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली त्याचं दबलेलं पुर्वआयुष्य मिळेल. उलट कधी पुर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल.

सतत वाहत रहावं नितळ झ-यासारखं, लोकं म्हणु देत उथळ पाण्याला खळखळाट फार… तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदर्थांनी कुजका निघु शकतो.

बेफिकीर पणे मांडावं आपण आहोत तसे, लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा… स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने… आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये .

बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त… सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!!

कुढुन मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे… दिलखुलास जगा.

सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित.

सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होवून जाईल .जगणही सुंदर होवून जाईल…!!

खळखळत जगा… नितळ झ-यासारखं शुद्ध..!!


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “खळखळत जगा… नितळ झ-यासारखं शुद्ध..!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!