Skip to content

आपल्या मुलांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढा!!!

कोषमय आवरणातून बाहेर पड़ण गरजेच


कु. आनंद लेले


मानसिक वैफल्य आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्यास दरवेळेस बाहेरची परिस्थिति कारणीभूत ठरते अस नाही, काही वेळेस मनातील चुकीच्या समजुती बाहेरील सत्य परिस्थितीवर आदळतात आणि तिथेच मन वैफल्यग्रस्त होते. सतत आपल्या संरक्षित कोशात मुलांना वाढवण, लहानपणापासून च त्यांना सतत एका पोषक वलयाखाली जपण या सवयी भविष्यात त्रासदायक ठरतात आणि जगरहाटी माहित नसल्याने मुलांची मने अर्थातच नाजुक आणि कमकुवत होतात.

पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्यांनी मुलांना थोड़स सुटवंग करायच आहे, तर ति शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कुठल्याही कठिण परिक्षेला सामोरे जाऊ शकतील. मुल लहान असताना रडली तर एकवेळ चालेल पण ती भविष्यात रडली नाही पाहिजेत.

आता प्रश्न राहिला मुलांचा, तर मुलांनो आपल जीवन इतक स्वस्त आहे का की क्षणिक नापास होण्याचा भीतीने ती आत्महत्या तुम्हाला जवळ करावीशी वाटते, एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्महत्या करायला खुप हिम्मत लागते, त्यातली थोड़ी जरी आपल्यात असेल तर आपण आयुष्यात खुप काही करू शकतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक alternative (पर्याय)तर द्यायला शिका, की ही आत्महत्या करण आत्ता खरच गरजेचे आहे का? रिजल्ट येईपर्यंत तर वाट बघू, कदाचित पास झालो तर!!

अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी आत्महत्या केल्यावर त्यांचा रिजल्ट चांगल्या मार्कानि लागला आहे. म्हणूनच असे अविचार करण्याआधी एकदा विचार करून बघा कारण तुम्ही केलेला एक अविचारामुळे तुमच्या स्वतःच्याच आयुष्याशी सगळ्यात मोठा व्यभिचार घडू शकतो हे लक्षात ठेवा. घरच्यांशी बोलून तर बघा, नक्कीच मार्ग निघेल. नापास तर नापास त्याने आयुष्य संपणार आहे का? मुळात अशा गोष्टीनसाठी समुपदेशनाची गरज च नाहीये. कारण समुपदेशन हा शब्द ऐकला की मानसिकदृष्टया आधीच दुर्बल असलेल्या मुलांना अजुनच दड़पण येते व धड़की भरते. मोकळेपणाने बोलणे व हसत खेळत सुसंवाद हाच त्याचे औषध आहे.

आजकाल लोक जगतील कशी यापेक्षा जास्त ती नाऊमेदीने मरतील कशी ह्याचा प्रत्यय देणारे खेळ बनवले जात आहेत, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जगलात किंवा मेलात कोणाला काही फरक पड़त नाही, मेलात तरी लोक तुमच्यावर पाय देऊन पुढे जातात, आणि ही सद्यस्थिति आहे.म्हणून आपल्याला लोक क़ाय म्हणतिल त्यापेक्षा तुम्हाला क़ाय वाटत याचा विचार करा. कारण तुम्ही कसेही वागलात तरी लोक काहीना काहीतरी म्हणत च राहणार. तरुण पीढ़ीला एवढ डोक असेल तर हातावर I am Whale अस गोंदवून blue whale खेळण्याऐवजी एकवेळ Dolphin माशासारखे उड़ाणटप्पू आयुष्य जगा आणि जगायला उमेद किंवा चालना देतील असे खेळ बनवा आणि अवश्य खेळा म्हणजे मानसिक दौर्बल्य, वैफल्य अस काही अस्तित्वातच राहणार नाही.

धन्यवाद!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “आपल्या मुलांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढा!!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!