Skip to content

आपली मुलं आणि निसर्ग वेगळे होऊ देऊ नका!!

निसर्ग आणि मुलं


डॉ अमित पवार


टि व्ही, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ला खिळलेली मुलं एकलकोंडी आत्ममग्न बनत चालली आहेत. शाळा, ट्यूशन ,extra करीक्युलर ऍक्टिव्हिटीज झाल्यावर फारच थोडा वेळ उरतो मुलांकडे. त्यातही स्क्रीन असतेच , किंवा पालक खूप प्रोटेक्टिव्ह होऊन खेळू देतात. बाहेर पडलेच तर आपण निर्भेळ निसर्गच राहू दिला नाही.
आपण त्यांच्या विकासातील महत्त्वाचा भाग हिरावून घेतलाय, तो म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होणे, त्याच्याकडून शिकणे.
निसर्ग आपल्या मुलांसाठी शिक्षक आहे, मित्र आहे आणि डॉक्टर सुद्धा.

1) निसर्ग मुलांची कल्पनाशक्ती वाढवतो,

2) problem solving ची क्षमता वाढते

3) अभ्यासातून दिसून आलंय की भाषा, विज्ञान, गणितात रुची वाढते

4) शारीरिक क्षमता वाढते

5) प्रतिकारशक्ती बळकट होते

6) सामाजिक भान आणि परस्पर संबंध सुधारतात

7) आजच्या काळात महत्वाचे , मुलं तणावमुक्त होतात

8) मुलांचा आत्मविश्वास वाढतो

अजून बरेच फायदे होतात..

खूप लहान बदल आणि कृती आहेत ज्याने आजही तुम्ही मुलांची निसर्गाशी जवळीक निर्माण करू शकतो.

१) मुलांना शेतात घेऊन जा , आपलं अन्न कसं पिकतं ते बघू द्या

२)घरी बागेत किंवा कुंडीत रोप लावायला सांगा, त्याची निगा त्यांनाच घेऊ द्या . यात त्यांना निर्मितीचा आनंद आणि संयम शिकायला मिळेल .

३)झाडावर चढू द्या , चढायला शिकवा .

४) सुरपारंब्या खेळू द्या .

५) पावसात चिंब भिजू द्या , चिखलात खेळू द्या .

६) बाहेरून खेळून आल्यावर लागलं, खरचटलं, कपडे मळले तर रागावू नका, अपराधीपणाची भावना येणार नाही याची खबरदारी घ्यावी.

७) नदीकाठी जाऊन विविध आकाराचे रंगांचे दगड जमवू द्या .

८) विविध झाडे , त्यांची पाने , फुले निरखु द्या . त्यातली गम्मत सांगा

९) पाणी आणि विज बचती बद्दल समजावून सांगा .

१०) जास्तीत जास्त नैसर्गिक जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करा .

ज्या निसर्गाचा आंनद घेऊन ,त्यातून शिकून आपण मोठे झालो , तो आपल्या मुलांकडून हिरावुन घेऊ नका.

ज्या वसुंधरेवर आपली मुलं मोठी होणार , राहणार आहेत, त्या मातीशी, पाण्याशी, हवेशी , आकाशाशी त्यांना समरस होऊ द्या , ” कुठलाही फिल्टर न लावता ”


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!