Skip to content

शेवटच्या एक महिन्यात अभ्यास कसा करावा!!

शेवटच्या १ महिन्यात अभ्यास कसा करावा.


सौ. वृषाली म. बिवरे


दहावी बारावी च्या परीक्षा जवळ येत आहेत त्या अनुषंगाने शेवटच्या 1 महिन्यात आहार-विहार आणि अभ्यास कसा करावा यावर दृष्टिक्षेप:-
अभ्यास करताना केलेला अभ्यास लक्षात रहावा म्हणून, स्मरणशक्ती वाढावी म्हणून, चित्त एकाग्र व्हावे म्हणून काही खालील गोष्टी सांगितल्या आहेत, त्या अवश्य वापरून बघाव्या.

आहार:- स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अशी काही खास गोळी नाही, पण मेंदूतील पेशींची झीज कमी व्हावी म्हणून, आणि आपला मेंदू सशक्त व्हावा म्हणून आपल्या मेंदूला आहारातून अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनोइड, A, B1, B5, C, E आयर्न, मॅग्नेशिअम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे घटक मिळण्याची खूप गरज असते.

गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे, आवळा मोराम्बा, साळीच्या लाह्या, बदाम, आक्रोड, कोहळा, भोपळा, सालासकट सफरचंद, मध,(पंचामृत) * एखाद्याला दही वर्ज्य असल्यास ते सोडून बाकीचे घटक घेणे*, बिट, गाजर, मुळा आणि यांची पाने, उगळलेलं वेखंड रात्री झोपतांना दुधात, गुलकंद, केशर-तूप यांचे कॉम्बिनेशन, अंडी, ब्रोकोली, मासे, काळी द्राक्षे, ग्रीन /ब्लॅक टी, डार्क चॉकलेट, मोहरीचे तेल, सोयाबीन, जवस, कडधान्ये, शेवगा आणि पाला, कोबी आणि फळभाज्या या सर्वांचा समावेश आहारात व्हावा.

खाऊ नये:

शिळे पदार्थ, गवार, तोंडली, दही अतिप्रमाणात, म्हशीचे दूध- बुद्धिमांद्यकर, बेकरी उत्पादने, आंबवलेले पदार्थ, चायनीज, पचायला जड आणि मसालेदार पदार्थ, कांदा लसूण- तम् गुण वाढवणारे पदार्थ, चहा कॉफी- उत्तेजक पदार्थ अपायकारक

व्यायाम:

चालणे, पळणे, सूर्यनमस्कार, गरुडासन, बलासन, उत्तानासान, वृक्षासन, प्राणायाम -अनुलोम विलोम भ्रमरी, ओंकार जप-एकाग्रता, 6 ते 8 तासांची झोप, डोके व तळपाय यांना तेलाने मॉलिश करणे, झोपतांना TV नको.

ब्रेन एक्सरसाईज:

कानाच्या पाळ्यांपासून वर पर्यंतचे सर्व पॉइंट्स दाबणे, उठाबशा, इन्सी विंसी स्पायडर ची स्टेप, बोटांच्या एक्सरसाईज सुपर ब्रेन योगा असे ,योग मुद्रा- आकाश मुद्रा, अंजली मुद्रा, हकिनी मुद्रा, भैरव मुद्रा, ज्ञान, ध्यान मुद्रा, अशा सर्व मुद्रा

अभ्यास कसा करू नये:-

घोकंपट्टी, फक्त महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करणे, भरमसाठ नोट्स काढणे, सतत स्वतः ची परीक्षा घेणं, अति आत्मविश्वास नको.

अभ्यासाची योग्य पद्धत वापरणे:-

सखोल वाचन, अभ्यासाच्या वेळांमध्ये अंतर ठेवणे, शांत पणे विचार करणे, झालेल्या अभ्यासाचे चिंतन करणे, मनन करणे, छोट्या आणि मोजक्या पण मुद्देसूद शब्दातल्या नोट्स काढणे, विषयांचा सखोल अभ्यास करा. सखोल अभ्यास तपासून पहा.

थोडेसे मेडिटेशन (ध्यान) करावे. light music ऐकून मग अभ्यासाला बसावे. अभ्यासाला बसतांना किंवा रात्री झोपताना, सुवासिक द्रव्ये जर असतील तर त्यांचा ही एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर चांगला परिणाम होतो, त्यासाठी रोजमेरी किंवा लविंडर essential oil चा diffuser मधून उपयोग करावा.

अभ्यास करताना अधून मधून हिरवी झाडे बघावी, पिवळा आणि केशरी रंग सुद्धा एकाग्रतेसाठी आणि स्मरणशक्ती साठी उपायोगी आहे, म्हणून मध्ये मध्ये त्या रंगाची चित्रे पहावी.

या सर्व उपचारात्मक पद्धतींचा उपयोग करून कमीत कमी 15 दिवसांनंतर आपण, नक्कीच अभ्यास करतांना आपल्या स्मरणशक्तित चांगला फरक अनुभवू शकतो.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!