Skip to content

अभ्यास करताना पाठांतर कसे करावे ??

अभ्यास करताना पाठांतर कसे करावे?याबद्दल थोडीशी माहिती.


ऋचा पाठक


शालेय जीवनात सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे अभ्यास करणं… आणि त्याहून जास्त कंटाळवाणी गोष्ट म्हणजे पाठांतर करणं…

कुणाला सायन्स च पाठ होत नाही ,कुणाला हिस्टरी,कुणाला Geography तर अजून काहीही असू शकतं…

तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पाठांतर करण्याची एक पद्धत…जिचा वापर करून तुम्ही तुमचा परीक्षेत यश संपादन करू शकता…चला पाहूया पाठांतर कसं करावं??

1.पहिल्याच दिवशी सगळं पान नाही लक्षात राहणार,त्यामुळं पहिल्या दिवशी सम्पूर्ण पाठांतराचा भाग वाचून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो भाग पुन्हा एकदा वाचा.(सकाळी 4 ते 8 पर्यंत वाचलेलं जास्त लक्षात राहत,स्वअनुभवावरून)

2.जो भाग तुम्हाला पाठ करायचा आहे,तो भाग मोठ्याने वाचा(मोठ्या आवाजात वाचल्याने लक्ष विचलित नाही होत)

3.त्या भागात काय सांगितल आहे हे नीट समजून घ्या,समजल्याशिवाय तुमच्या लक्षात नाही राहणार…पोपटपंची करणं टाळा.

4.पाठांतर करत असताना दर तीस मिनिटांमधे 10 मिनिटे ब्रेक घ्यावा ,व त्या 10 मिनिटात मध्ये प्राणायम केल्याने आलेला थकवा दूर होतो,व तुम्हाला फ्रेश वाटत..

त्या 10 मिनिटात (मोबाईल ला हात लावू नये,)

5.आता वाचलेलं आठवतंय का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचे डोळे बंद करून मनातल्या मनात आठवतंय का ते पहा आणि तुमचं काहीही काम करताना वाचलेलं आठवण्याचा प्रयत्न करा,अश्याने तुमच्या बुद्धीला चालना मिळते व स्मरणशक्ती तेज होते.

आता थोडस पाहूया ,काय काय केल्याने स्मरणशक्ती वाढते

●दूध,फळे,पालेभाज्या असाच आहार विद्यार्थी दशेत असताना जास्त घ्यावा ,यामुळे स्मरणशक्तीस फायदा होतो.

●थंड पाण्याने स्नान केल्यास स्मरणशक्ती वाढते.

●सगळे म्हणतात की 8 तास झोप ही compulsory पाहिजे, त्यात वाद नाहीच..झोप कमी झाल्याने स्मरणशक्ती कमकुवत होते.निदान परीक्षेच्या काळात हे व्यवस्थापन हवंच..

काय मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आता पाठांतर करणं वाटतंय ना सोपं?? चला तर मग लागा कामाला.. आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा….

हा लेख तुम्हाला कसा वाटला,हे नक्की सांगा..भेटूया आपण पुढच्या लेखात …मस्त रहा..आनंदी रहा..


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “अभ्यास करताना पाठांतर कसे करावे ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!