
तुम्हाला यशस्वी व्यक्ती बनण्याची इच्छा आहे?
ऋचा पाठक
मानवी जीवनात प्रत्येकाची इच्छा असते घवघवीत यश मिळवण्याची.प्रत्येकाच्या दृष्टीने यश हे वेगळं असतं. धंद्यातील लोकांना धंद्याची वाढ होणं म्हणजे यश असतं तर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळण म्हणजे यश असत…. प्रत्येकालाच यश हवंय पण प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगळीय…प्रत्येकालाच मोठं व्हायचं आहे पण खरंच आज जी लोकं At the peak of success आहेत (उदा सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, धोनी, अंबानी,)आणि किती जण आहेत!! ह्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही बारीक अभ्यास केलाय का? कोणत्या गोष्टीमुळें आज ती लोकं त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली आहेत? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की यशस्वी लोकांचा त्यांच्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन.
1.यशस्वी माणसं हि त्यांच्या आयुष्याबद्दल खूप सकारात्मक असतात.
2.यशस्वी माणसं नेहमीच त्यांच्या समोर आलेल्या समस्येचं निराकरण करण्याच्या मागे असतात,समस्येचा बाऊ करत बसत नाहीत.
3.यशस्वी माणसं कधीच काम टाळत नाहीत. किंवा काम टाळण्यासाठी सबबी देखील सांगत नाहीत.
4.यशस्वी माणसं बोलण्याआधी विचार करतात.बोलल्यानंतर विचार नाहीत करत बसत
5.यशस्वी माणसं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करतात,उगीच कागदी घोडे नाचवत नाहीत.
6.यशस्वी माणसं म्हणतात,हे काम मीच केलं पाहिजे. ते काम दुसरं कोणीतरी करण्याची वाट पाहत ते बसत नाहीत.
7.यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांचेही कल्याण व्हावे या मताचे असतात.इतरांचे वाईट चिंतत नाहीत
8.यशस्वी माणसं हि त्यांच्या तत्वांशी वचनबद्ध असतात ,त्यात ते तडजोड करत नाहीत.
9.यशस्वी माणसं गोष्टी स्वतः घडवून आणतात.
10.यशस्वी माणसं चुकण्याची व ती चूक सुधारण्याची तयारी ठेवतात.मी ही चूक केलीच नाही असं ते नाही म्हणत..
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर share करा…like करा…आणि महत्वाचं म्हणजे मस्त रहा आनंदात रहा…भेटूया आपण पुढच्या लेखात.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


Mala tumcha ha lekh khup chan vatla .
Very motivate
खूप छान लेख आहे ,, आणि हो मी हे तुमचे रोजचे नवनवीन लेख वाचत असतो , आता तर मला रोज सवय च लागली आहे सकाळी उठल्यावर तुमचा लेख वाचण्याची