Skip to content

काही लोकं सतत मनाचं खच्चीकरण करण्याचं काम करत असतात..

का मी अशी?


सौ सुरेखा अद्वैत पाटील
मुंबई(पाचोरा)


प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो,
काही लोक गंभीर असतात तर काही हळवी काहींचं मनअगदीच हळव असतं. कुणी मोठ्या आवाजात बोललं तरी मनाला लागतं आणि मन उदास होतं. आणि मनात विचार येतात की हे आपल्यासोबतच का होतं? काही माणसं खूप खंबीर असतात त्यांना असल्या वागण्या बोलण्याचा काही एक फरक पडत नाही… कुणी बोललेच तर समोरच्याला उत्तर देऊन मोकळे होणारे पण असतात पण मी आपली बसते कुडत.

त्यामुळे मला असे वाटते की प्रत्येक आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलायला वागायला हवं.

त्यामुळे नातेसंबंध सुधारण्यास फार मोठी मदत होते. कुणालाही दुखवून आपण काही एक साध्य करीत नाही. त्यापैकी बरेचसे लोक अशी असतात की दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवणे किंवा त्याचा आत्मविश्वास खच्चीकरण करणे.

नुकताच मला आलेला अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करतीये माझी जवळची बहीण माझा लेख वाचून मला म्हणते ती पहिले अमलात आण. आणि मग बाकीच्यांना उपदेश दे!

काही वेळासाठी वाटलं ते जाऊदे मी नाही करीत लिखाण… नंतर विचार केला माझ्याकडे बघण्याचा तिचा तो दृष्टिकोन आहे.

लिहायला घे कर सुरुवात.. आणि मी स्वतःचे मनोबल वाढविले.

कुणी ना कुणी तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीतच राहणार पण त्याला न जुमानता आपण आपले काम अव्याहतपणे सुरू ठेवायला हवे हे मनाशी पक्कं ठरवलं. आणि समोरच्याचं बोलणं मी त्यांच्या शुभेच्छा समजून स्वीकारलं!

थांबवणारे खूप असतात पण त्यासोबत वाट दाखविणारे पण खूप असतात.. आपण काही प्रत्येकाला बदलू शकत नाही त्यापेक्षा आपणच बदलावं. हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग!

तर मग बदलणार ना माझ्या सारखा स्वभाव..

त्यामुळे दुसरा नाही, पण आपण खुश होतो. म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं.

पण मी एवढेच म्हणेन स्वतःला बदलण्याचं औषध नक्कीच असत आपल्याकडे..

हा माझा स्वानुभव..

माझ्यामते प्रत्येकाने समोरच्याशी विचार करून बोलावं आणि वागाव देखील त्यामुळे हितसंबंध सर्वांशी प्रेमाचे आणि आपुलकीचे राहतील यात तिळमात्र शंका नाही.. हा सुद्धा एक नाते टिकविण्यासाठी चा प्रयत्न समजूया.. आणि प्रत्येकाचं मन सांभाळू या!

अति लोभो न कर्तव्य.

जास्त लेख लिहिल्यास वाचणाऱ्याला कंटाळा येऊ शकतो. म्हणून इथेच थांबते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

9 thoughts on “काही लोकं सतत मनाचं खच्चीकरण करण्याचं काम करत असतात..”

  1. खूप छान लेख आहे .जीवनात पावलो पावली टिक करणारे लोक भेटत असतात त्यांचे टीका हे आम्ही शुभेच्छा म्हणुन घ्यायला हवे.

  2. बाळासाहेब वाघ

    फारच वास्तव लिखाण, धन्यवाद

  3. Laluprasad Kashid

    खुप छान लेख आहे ,
    लोकांचे कामच असते कोणाची ना कोणीच खाची कार्याची आपण त्याकडं दूर8 करायचे व असे संमजाचे की ते आपल्याला चांगलेच बोले

  4. मंगेश वसंत फराक्टे

    खुपच छान व् वास्तविक विचार सांगितले

  5. सामाजिक अनुभवातून लेखकानी वास्तव मांडणी केली आहे,

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!