Skip to content

परीक्षेचा ताण येतोय??? मग हे उपाय नक्की करून पहा!

परीक्षेचा ताण येतोय?मग हे उपाय नक्की करा..


ऋचा पाठक


10 वी आणि 12वी ची परीक्षा म्हणजे आयुष्यातील turning points असतात. टेन्शन, थकवा हे शब्द त्या 10वी,12वी च्या वर्षांमध्ये आपण हमखास वापरतोच! चला मी आता मस्त पेपर लिहायला जाणार आहे असं कोणताच विद्यार्थी म्हणत नाही,मग तो कितीही हुशार असला तरीही…

आज आपण पाहणार आहोत परीक्षेच्या आधी आलेल्या ताणाचे व्यवस्थापन कसे करावे??

1.परीक्षेच्या आधी एक दिवस ज्यावेळेस ताण येतो त्यावेळेस मनाला ठणकाउन सांगा कि मी वर्षभर चांगला अभ्यास केलाय त्यामुळं मला उद्याचा पेपर हा छान मस्त जाणार आहे.त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

2.परीक्षेच्या आधल्या दिवशी थोडा वेळ तुमच्या घरच्या लोकांसोबत गप्पा गोष्टी करा.पण त्या गप्पांमध्ये अभ्यासाची चर्चा करू नका..अश्याने तुमचे mind एकदम fresh होते व तुमचा तणाव दूर होतो.

3. परीक्षेच्या आधल्या दिवशी नवीन पाठांतर करत बसू नका,(त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो)…जेवढं तुम्ही आधी वर्षभर वाचलेलं आहे त्याचंच revision करा.

4.परीक्षेला नेणाऱ्या वस्तू पेन,पेन्सिल,रबर,पट्टी,कम्पास व हॉल तिकीट हे सारं आधीच बाजूला काढून ठेवा,

5.परीक्षेच्या आधल्या दिवशी हलका आहार घ्या,मुगाच्या डाळीची खिचडी ,वरण भात असंच हलकं फुलक घ्या..तेलकट,मसालेदार आहार नका घेऊ…शिवाय परीक्षेच्या दिवशी सुद्धा हलकाच आहार घ्या,दूध,फळे ,वरण भात …पेपर लिहून घरी आल्यानंतर पोटभर जेवा पण आधी नाही,कारण अश्याने पेपर लिहिताना तुम्हाला झोप नाही येणार..

6.परीक्षेच्या हॉल मध्ये गेल्यावर घाबरू नका, भीती वाटणं सहाजिक च आहे,पण तरीही स्वतःला सावरा मनात negative विचार करण्यापेक्षा स्वतःला म्हणा कि वर्षभर मी ज्या दिवसासाठी रात्रन् दिन अभ्यास केला तो दिवस आज finally आलाय, त्यामुळं तुम्ही उत्साहात पेपर लिहा.

6.उत्तर पत्रिका हातात आल्यानंतर सर्वात प्रथम त्याची सर्व पाने एकदा तपासून बघा कुठे फाटले वैगेरे तर नाही ना….

7.मग काय मस्त लिहा पेपर… घाबरू नका,आणि विश्वास ठेवा स्वतःच्या अभ्यासावर….

All the very best….

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर like करा share करा..आणि मस्त रहा आनंदात रहा..भेटूया आपण पुढच्या लेखात…


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “परीक्षेचा ताण येतोय??? मग हे उपाय नक्की करून पहा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!