Skip to content

तुम्हांला खूपच राग येतो का? मग हे वाचाच!!

तुम्हाला खूप राग येतो का? मग हे वाचा!


ज्याला राग येत नाही असा या जगात शोधूनही कोणी सापडणार नाही. कारण मनुष्य हा संवेदनशील प्राणी आहे. यामुळे आनंद, दुख, राग, मत्सर, द्वेष, लोभ, प्रेम या भावना त्याच्यात कुटून भरलेल्या आहेत. जसा आनंद झाल्यावर आपण हसून तो व्यक्त करतो. दु:ख अश्रू ढाळून मोकळे करतो तसाच राग व्यक्त करण्यासाठी आपण ओरडतो, चिडचिड करतो, आदळआपट करतो. तर क्वचित प्रसंगी हाणामारीही करतो.

त्यानंतर काहीवेळाने मात्र आपण शांत होतो. झालेल्या गोष्टीचा विचार करू लागतो. यातून बऱ्याचवेळा फक्त पश्चाताप होतो. पण तोपर्यत वेळ निघून गेलेली असते. काहीक्षणाच्या त्या रागाने जवळची माणसं दूर गेलेली असतात. तर कधी आपणच स्वत;च नुकसान करुन घेतलेलं असतं.

पण या रागाने आपलं फक्त एवढंच नुकसान केलंल नसतं तर जाताना तो आपल्याला उच्च रक्तदाब नावाची व्याधीही देऊन जातो. ज्यातून पुढे अनेक व्याधी जन्म घेतात. यामुळे अशा या राग नावाच्या भावनेला आवर घालणं फार गरजेचं आहे. यासाठी काही उपयुक्त टीप्स…

उत्तम श्रोते व्हा

समोरची व्यक्ती चिडून किंवा ओरडून बोलत असली तरी त्याच्यावर उलट ओरडण्यापेक्षा त्याचे बोलणे शांततेने ऐकून घ्या. त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजून घ्या. प्रतिक्रीया देण्याआधी विचार करा.

विचार करून बोला

कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलताना, आपली मत व्यक्त करण्याआधी विचार करा. उगाच समोरचा बोलतो म्हणून तुम्ही विचार न करता त्याच्यावर ओरडू नका. त्याचे बोलणे खोटे व आपले खरे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना तोल सांभाळा. नाहीतर आक्रस्ताळे आहात अशी तुमची प्रतिमा तयार होईल. तुमचे नुकसान होईल.

राग येत असेल तर शांत राहा

ऑफिसमध्ये, घरात कुठल्याही गोष्टीवरुन तुमचा कोणाशी वाद झाला असेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तरी त्याच्यावर एकदम राग प्रकट करू नका. शांत राहा. समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. त्याचे बोलणे झाले की तुमचा मुद्दा शांतपणे त्याला समजावून सांगा. यामुळे तुम्ही किती परिपक्व आहात ते समोरच्याला कळेल. यामुळे तुमच्याबद्दलची त्याची मतही बदलतील.

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीरच सुदृढ होत नाही तर मनंही फ्रेश होतं असं म्हणतात. यामुळे जर एखाद्याचा तुम्हांला खूप राग येत असेल तर तिथून बाहेर पडा. मोकळ्या बागेत अथवा रस्त्यावर जा. फिरा. शक्य असल्यास जीमला जा. व्यायाम करा. मग बघा. तुम्हाला त्या व्यक्तीचा विसर पडलेला असेल.त्याच्याबद्दल आलेला रागाचा फुगा केव्हाच फुटलेला असेल हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही.

गाणी ऐका

गाणं हे मन फ्रेश करण्याचं उत्तम साधन आहे. आवडती गाणी ऐकताना आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडतो. गाण्यात दंग झाल्याने मूड बदलतो. यामुळे एखाद्याबरोबर तुमचे बिनसलं असेल तर त्याला विसरण्यासाठी तो वाद विसरण्यासाठी गाण्याचा सहारा घ्यावा. जेणेकरुन मन उधास होणार नाही आणि तुमची चिडचिडही होणार नाही.

आकस ठेवू नका

आपले कधी ना कधी कोणाबरोबर तरी कडाक्याचे भांडण झालेले असते. तो वाद, अपमान काही केल्या विसरता येण्यासारखा नसतो. त्या रागाच्या ज्वाळा कायम मनाच्या कोपऱ्यात धगधगत असतात. त्या प्रसंगाची आठवण आली तरी रक्तदाब वाढतो. इतक्या खोलवर जखमा त्या व्यक्तीने दिलेल्या असतात. पण काळाबरोबर नेहमी पुढे जायला शिका.

जुने वाद, जुने द्वेष मनातून काढून फेका. झालं गेलं विसरुन जा. कारण अप्रिय प्रसंगांच कधीच कोडकौतुक करायचं नसतं. नाहीतर ते मन पोखरायला लागतं. यामुळे मानसिक व्याधी जडू शकते…


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

6 thoughts on “तुम्हांला खूपच राग येतो का? मग हे वाचाच!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!