“सोबत”…….
आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.
ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं….!
इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात “आपले लोक” पण असतात हे विशेष!
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका “नकाराने” बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
“स्वतःला काय हवं आहे?”
हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.
मग अशा वेळी प्रश्न पडतो
“हे सगळं कशासाठी ?”
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे –
“आपण एकटेपणाला घाबरतो.”
सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.
एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.
मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” अस गोंडस नाव देतो….
आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.
जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.
‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.
मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
“सोबत”…!
माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.
गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.
असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते…
थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड….
आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल…!
Think positive
Live positive
Be Positive
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.
खूप छान वाटलं वाचून
अतिशय सुंदर आणि सत्य परिस्थिती,??????
खुप छान होता…??
हो माझं पण गेली ६ ते 8 महिने झालीत असच चालतं.एखाद्याने निराशा केली की नको वाटतं आता त्याच्या संपर्कात दूर राहीले ल चांगलं अस एकटं एकटं रहावस वाटत.तसा आत्मविश्वास पण भरपूर असतो.म्हणजे माझा प्रत्येक प्रश्नाला मलाच उत्तर द्यायचे मग का कुणाला जवळ जवळ करायचं. मी माझ्या अडचणी स्वतः दूर करु शकतो मग का एक्याद्याकडण नंहाग अपेक्षा ठेवायच्या त्या पेक्षा एकटं रहा.व एकटा लढ पण कधी कधी मन खुप उदास होत.असा काही तरी विरंगुळा पाहिजे असतो.
खुप छान
खरच आपल्या आयुष्यात मोजकीच पण चांगली माणस असावी