
पुरुषांनाही असतो एक हळवा कोपरा…
समाजात वावरणारे अनेक लोक असतात..मग ते घर असो वा समाज ईथे वावरणारा प्रत्येकजण आपआपल्या वैचारीक चौकटीत वागत असतो.
जसे एखाद्या वाईट वागणाऱ्या स्रीमुळे समस्त स्रीजातीला दोषी ठरवले जाते…तसेच काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुषजातीवर अविश्वास ठेवला जातो…पण सर्वांनाच माहीतेय कि समाजात जसे वाईट वागणारे लोक आहेत याउलट चांगले गुणसंपन्न वैचारीक वागणारेही लोक आहेच म्हणून तर समतोल टिकून आहे आणि टिकून रहाणारच ….
पण तरीही पुरुषांची ओळख ही कणखर, संतापी, कारभारी, हुकुमशाह, आक्रमक,सत्ताधारी अशीच मानतात आणि ती असावीही काही अंशी आणि त्यांना बनावेच लागते असे …कारण ते आहेत म्हणूनही प्रत्येक कुटुंबात स्री सुरक्षित आहे …
आपल्या घरात नात्यांत वडील ,भाऊ,मुलगा,काका,मामा,आजोबा,मित्र हे सारेच सहवासात असतात तेव्हा जाणवतेच कि ” त्यांच्या हृदयातही असतो एक जाणीवांचा हळवा कोपरा”.!
ते जेव्हा घरातील कुणाला जरा दुःखावले कि हळहळतात…बाहेरुन यायला उशीर होऊ नये म्हणून जाताना काळजी करतात..कठोर होवून रागवतात पण आत मात्र हळव्या जाणीवा असतात…आपल्याला फक्त कर्त्या पुरुषांचे चिडणे,रागवणे ,धाकवणे दिसते…पण खरं तर त्यांच्या मनात खूप भीती असते आपल्या सुरक्षिततेची तेव्हा त्यांनाच गरज असते मानसिक आधाराची विश्वासाची कि आम्ही खंबीर आहोत आमची जबाबदारी आमचीही आहे ..तुम्ही काळजी करु नका असे ऐकण्याची…पण ते दाखवत नाही हा पुरुषी भाव नेहमी सुप्त आवस्थेत लपलेला असतो…प्रत्येक घरातला पुरुष नेहमी प्रत्येक जण सुखी रहावा म्हणून धडपडत असतो कष्टत असतो आपल्या नकळत ….काही अपवाद आहेतही जे स्रीच्याच कष्टावर जगतात..व्यसनी असता …विकृती असते,दयामाया नसते …पण अशा मुठभर पुरुषांमुळे समस्त पुरुषजातीला हिनवणेही चुकीचेच…तसेच काही मुठभर भांडखोर ,स्वार्थी, वाईट वागणाऱ्या स्रीयामुळे समस्त स्रीजातीलाही दोषी ठरवणे चुकीचेच पटतय ना…!
मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा अश्रु लपवत मांडवात फिरणारा बाप,भाऊ,आजोबा बघितला तर जाणवतो त्यांच्या आतील हळव्या मनाचा कोपरा कसा रिता असतो कायमच आणि तो कोपरा भरायलाच देवाने त्या त्या वेळेनुसार संवादातून व्यक्त व्हायला कधी मुलगी,कधी पत्नी,कधी मैत्रीण ,कधी बहीण आणि सतत काळजी घेणारी आई निर्माण केलीय…हेही तितकच सत्य आहे .
जेव्हा पुरुष निराश होतो खचतो एकाकी बनतो तेव्हा त्यातील आत्मविश्वासाची ताकद पुन्हा जागृत करायला एक साथ हवीच असते विश्वासाच्या आधाराच्या काठीची ..पण तरीही तो मागत नाही कुणाकडे स्वावलंबीपणा आड येतो भलेही आतून कितीही पोखरलेला असो सहन करत जातो .आतल्या आत जळत रहातो…अपेक्षा असते त्यालाही कि फक्त माझं असं कुणी घरात असावं ज्यांनी न सांगता माझं मन ओळखावं..”आणि असा शोध म्हणजेच प्रेमाचा,मायेचा, विश्वासाचा आधार होय…जो विसावा असतो त्याच्यासाठी काही क्षणांचा स्वतःस विसरून नव्याने उभारी घ्यायला”….
पण जेव्हा खचलेल्या मनासाठी आधाराऐवजी कधीकधी घरात समोर उभी दिसते चिडणारी बायको,मागण्या करणारे मुलं,अपेक्षा लादणारे आईवडील ,वाद घालणारे भावंड तर बाहेर मतलबी मित्रपरिवार स्वार्थी दुनिया…या भोवऱ्यात एखादा संस्कारी असूनही संकटांना हारलेला पुरुष सापडला तर त्याची बाहेरच्या दुनियेत वाट चुकते चुकीच्या शोधात आधार भेटण्यासाठी…आणि तो आधार विश्वासाचा मिळाला तर तो नव्याने उभारी घेतो अन्यथा व्यसन,नैराश्य,मनोरुग्न,संसाराचा त्याग,आत्महत्या,हतबलता यासारखे प्रसंग येतात आणि तेव्हा आयुष्यात संसाराचा खेळ होवून बसतो….
म्हणूनच त्याचा खरा आधार हा त्याची अर्धागिनीच असते हे तिने व त्याने दोघांनाही सम मान्य करायला हवे .तिच्यातच असते दैवी शक्ती त्याला सांभाळण्याची त्याचे हळवे व्यथित मन ओळखण्याची…पण त्याचा अहंकार मानायला तयार नसतो तिचे वर्चस्व किंवा तिच्यातली स्रीशक्ती ….मग तिचाही रोष त्याला पत्करावा लागतोच काही अंशी…
तरीही तिचा राग क्षणिक असतो त्याच्या सुखासाठी कुटुंबाच्या सुखासाठी ती नेहमीच पत्नीरुपाने सज्ज असते त्याचा हळवा कोपरा भरण्यासाठी ….!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


खुपच छान