Skip to content

‘Life’ आपली मजा घेते, आपण तिचीच मजा घ्यायला हवी!!!

‘Life’ आपली मजा घेते, आपण तिचीच मजा घ्यायला हवी!!!


दररोजच्या जगण्यात कित्येकदा आपण ठरवतो एक आणि होते भलतेच! अगदी लहानसहान गोष्टीतही हे जाणवते. वैताग येतो, चिडचिड होते.

आपण थांबवलेल्या रिक्षामधे कोणीतरी दुसराच येऊन बसतो,

टोल नाक्यावर आपण ज्या लाइन मध्ये गाडी थांबवलेली असते तीच लाइन नेमकी कासवाच्या गतीने पुढे सरकत असते आणि बाजूच्या लाइन मधल्या गाड्या आपल्या मागून येऊन टोल भरून पुढेही जातात,

एटीएम च्या मोठ्या लाइन मध्ये थांबून पण नेमका आपला नंबर यायला आणि कॅश संपायला एकच वेळ येते,

बरेच दिवस एखाद्या ठिकाणी जाऊन एखादा विशिष्ट पदार्थ खायचा असतो आणि प्लॅन करून गेल्यावर नेमका त्याच दिवशी तो पदार्थ संपलेला असतो,

एखाद्या दिवशी उशीर झालेला असताना वाटेतले सगळेच्या सगळे सिग्नल लागतात,

चहाची तल्लफ आल्यावर छान चहा करून घेतला तर नेमके काही ना काही घडते आणि तो चहा तसाच पडून रहातो,

आपण एखादी एक गोष्ट करायचे कित्येक महिने ठरवत असतो पण असे काही होते की सगळ्या प्लॅनिंग वर पाणी फिरते…

एक ना अनेक… आयुष्य आपले असे बर्‍याचदा छोटे मोठे पचके करत असतं..

कितीही पुढे जायचा प्रयत्न केला तरी पुन्हा मागे आणून सोडतं..

कामच आहे त्याचे हे! तरीही कोणी जगणं सोडत नाही.. स्वप्नं पहायची सोडत नाही, नवनवीन प्लॅन करायचे थांबवत नाही..

आयुष्य आपली मजा घेत असलं, मजा बघत असलं तर आपणही आयुष्याची मजा घ्यायचे थांबवायचे नाही..

बिनधास्त जगायचे!!


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “‘Life’ आपली मजा घेते, आपण तिचीच मजा घ्यायला हवी!!!”

  1. खरं तर आयुष्य मजा (आनंद) घेण्यासाठीच मिळाले आहे, परंतु माणूस स्वत:हून भरकटला आहे..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!