Skip to content

इगोला “गो” म्हणून पहा नक्की सुखी व्हाल!!

इगोला “गो” म्हणून पहा नक्की सुखी व्हाल!


धनंजय देशपांडे


एका खेड्यात एक शेतकरी राहत असतो. गाय, कोंबड्या असा त्याच्याकडे बारदाना असतो.

दुपारनंतर नेहमीप्रमाणे शेतकरी कोंबड्याना दाणे टिपायला म्हणून आणि गाईला चरण्यासाठी म्हणून रानात सोडून देतो. रानाच्या पलीकडे जंगलही असते. तर ती गाय चरता चरता नकळत त्या जंगलात जाते. चरता चरता संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती एकदम दचकली, घाबरून भीतीने इकडे तिकडे जोरात पळू लागली. वाघसुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेल्या गाईने शेवटी तळ्यात उडी घेतली. किमान पाण्यात गेल्यावर तरी जीव वाचेल असं तिला वाटलं. पण वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे मात्र चिखल जास्त आहे. गाय पुढे पुढे अन पाठीमागे वाघ…. असं करता करता त्या दोघांमधील अंतर कमी होत गेले. मात्र हळूहळू दोघेही त्या चिखलात रुतत जाऊ लागले. गाय त्या चिखलात हळूहळू जास्त रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता परंतु तो सुद्धा चिखलात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेले होते अन शेवटी अशी अवस्था आली की दोघेही जागीच अडकले. ना गाईला पुढे सरकता येईना ना वाघाला तिच्यापर्यंत पोचता येईना.

आता गाईला थोडा धीर आला होता कारण तिच्या लक्षात आलं होत की आता काही वाघ आपल्यापर्यंत पोचत नाहीये मग मग थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, “तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का? की जो तुला किमान वाचवेल?”

वाघ घुश्यात बोलला, “मी तर जंगलाचा राजा आहे, माझा कोणी मालक नाही. मीच ह्या जंगलाचा मालक आहे.”

गाय त्याला म्हणाली, “तू राजा असूनही तुझ्या शक्तीचा आता याक्षणी तुला काहीच उपयोग होत नाही आहे.”

वाघ म्हणाला, “तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत.”
तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, “बिलकुल नाही. माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.”

थोड्यावेळाने खरंच एक माणूस आला (म्हणजे तो शेतकरी), त्याने एकूण सगळं ते पाहिले, सुरुवातीला वाघाला पाहून तोही घाबरला पण नंतर त्याला लक्षात आले की वाघ चिखलात अडकला आहे त्यामुळे बिनधास्तपणे शेतकरी हातातल्या काठीच्या मदतीने हळूहळू गाईपर्यँत पोचला.

आणि तिला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला, जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नव्हते. कारण त्यांच्या जीवाला वाघापासून धोका होता.

डीडी क्लास : आज रूपक कथा सांगितली आहे. यामध्ये गाय म्हणजे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे. वाघ म्हणजे आपले अहंकारी मन आहे.
तर मालक ईश्वराचे म्हणा किंवा जगनियंत्याचे प्रतीक आहे तर तळ्यातील तो चिखल म्हणजे संसार आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष म्हणजेच अस्तित्वाची लढाई आहे.

आपण कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही, मात्र आपण कर्म चांगले केले असेल कुणाला दुखावले नसेल अन जमेल तेव्हा इतरांना उपयोगी पडलो असू तर शेतकरी रुपी कुणीतरी तुमच्या पाठीशी राहतोच अन वाघरूपी संकटापासून वाचवतो. परंतु वाघ जसे म्हणाला की मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.

हे आपण लक्षात घेतले तर जीवन नक्की सुखमय होईल. “इगो” ला तुम्ही जोवर “गो” म्हणत नाही तोवर तुमच्या जीवनाची आनंदी, प्रगती “ग्रो” होत नाही, हे नक्की !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “इगोला “गो” म्हणून पहा नक्की सुखी व्हाल!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!