लोकं निघुन जातात परत कधीही न येण्यासाठी…
लोकं आहेत तोपर्यंतच आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करायला हव्यात…ती माणसच गेल्यावर त्या भावना काय कामाच्या…? ?नुसताच श्रद्धांजलीचा..श्राद्धाचा खेळ खेळत बसण्याला काहीच अर्थ नाही…कुणाचं अकाली..लवकर निघुन जाणं..हादरवून टाकतं…पुन्हा पुन्हा नव्याने आयुष्याबद्दल विचार करावासा वाटतो…
राग..द्वेष..तिरस्कार..घृणा… या भावना कितीही शाश्वत असल्या तरी जगण्या..मरण्यापुढे किती शुल्लक आहेत ?नंतर पश्चाताप करून तरी काय फायदा ?
वैचारिक मतभेद राहतीलच..असावेच ते…आपण रोबोट नसल्याची एकमेव खुण असावी ती..
पण..
आज वाटू लागलंय प्रकर्षाने..जाणउ लागलय…..ज्या कुणाशी वाद आहेत..भांडण आहेत..ते कायमचे बोलुन..समजुन..समजाउन मिटवून टाकावेत… ज्या कुणाबद्दल राग आहे..त्या आपल्यांना..परक्यांना माफ करून टाकावं… आणि आपली चूक असेल तर मोठ्या मनाने माफी मागावी…प्रयत्न तरी करायला हवा…कधी आयुष्य संपेल कुणास ठाऊक…वैचारिक वाद होतच राहावेत.. होत राहतील…परखडपणे..स्पष्टपणे व्यक्तही होतच राहावं..होत राहीन..
पण..एवढं नखभर आयुष्य..त्यात किती आपण कुणाचा रागराग..द्वेष करणार…घटना वाईट घडत राहतात..त्यावर आपला कंट्रोल नव्हता…ह्यापुढेही नसणार…पण त्यातून आपल्याला शिकता यायला हवं..स्वतःत बदल घडवता यायला हवेत…
एका सुंदर कवीने म्हटलय…आपण प्रत्येकाने आयुष्यभर अस काही कराव…त्याने समाज सुखी होईल..सुंदर होईल…म्हणजे आपण गेल्यावर पण लोक…समाज आपली आठवण काढतील…नुसतेच पैसे कमाउ नका…माणस जोडा…
देवाने आपल्याला दोन हात दीले आहेत…म्हणजे ते दोन हात आपल्याला पुरेसे आहेत…त्या हातांच्या ओंजळीतुन निसटुन खाली पडण्याआधी जे काही आपल्याकडे आहे…ते दुसऱ्यांना देउन टाका…नाहीतरी ते फुकटच जाणार आहे..
नुसताच माणुस गेला अस लोकांनी म्हणण्यापेक्षा समाजासाठी..लोकांसाठी काहीतरी करणारा माणुस गेला..
ही भावना ठेउन प्रत्येक माणुस जगला तर हे जग कीती सुंदर होईल..जगात पैसेवाले आहेत…व ह्या पुढेही राहतील…आज पेशव्यांचे सावकार कोण होते हे कोणाला माहीत नाही…पण ज्यांच्या विचारामुळे जग बदलल..त्या गौतम बुद्धांना आज अख्ख जग ओळखत…आयुष्य सुंदर आहे…ते तसच जगण्याचा प्रयत्न करा…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
Nice
Nice one
Nice one
Nice sir
खुप छान !
आजकाल खुप नाते अशा क्षुल्लक गोष्टिमुळे तुटतात, वेळीच बोलून माफ करून, माफी मागून त्या नात्याला सवरण्याचा प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे.
Nice
???
खूप छान
सुंदर लेख आहे, खरच आज माणसाने माणूस होऊन जगण्याची खूप गरज आहे, सगळंच स्वार्थी वृत्तीने आपलं व्हावं वाटलं तर इतरांनी काय अपेक्षा ठेवाव्यात…..
त्यासाठी फक्त एक माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा…
Nice thinking