बोला..मोकळे व्हा!!
२६ डिसेंबर २०१९, एका ३७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. एका लेखातून असे वाचण्यात आले की त्यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी झाली नव्हती, काहीजण म्हणतात की त्यांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण होते.
कारणं काहीही असू शकतात.
मित्रांनो, सध्या आपण स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण वातावरणात राहत आहोत. आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीत रोज नवनवीन बदल होत असतात. या बदलत्या परिस्थतीचा सामना कसा करायचा हे प्रत्येकाची जडणघडण आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते. घडणाऱ्या घटना आपल्या हातात नसल्या तरी त्याला सामोरे कसे जायचे, त्याचा सामना कसा करायचा यासाठी काही कौशल्ये विकसित करणे आवश्यक असते.
घडणाऱ्या घटनांचे परिणाम मनावर चांगलेच होतील असे नाही, वाईटही होवू शकतात. आणि हे आपण त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर अवलंबून आहे.
मनाचा विचार केला तर, मन हे दोन प्रकारचे असते. बाह्यमन आणि अंतर्मन. बाह्य मनापेक्षा अंतर्मनाच सामर्थ्य खूप शक्तिशाली आहे. पण आपण आयुष्यात घडलेल्या घटनाचा आपल्या बाह्य मनावरच जास्त परिणाम करून घेतो.
म्हणजेच या ठिकाणी अंतर्मनाचा वापर जर सारासार विचार(critical analysis) म्हणजेच बघितलेल्या दृष्यांवर आपले विचार आधारित न ठेवता आपले व्यक्तिगत विचार(self management skills) विकसित केले आणि घडलेल्या घटनांना सकारात्मक बनवलं तर आपला आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात ठरवलेले ध्येय निश्चित प्राप्त करू शकतो.
यासाठी घडलेल्या घटनांचा मनामध्ये जो कोंडमारा होतो ती मोकळा करायला शिका. त्याचा मनावर नकारात्मक पगडा बसवण्याआधी या नकारात्मक विचारातून स्वतःला बाहेर काढा. हे मनातील विचार कोणाकडे तरी व्यक्त करायला शिका, ते एका वहीमध्ये लिहायला शिका. आपोआपच मन हलके होईल आणि सकारात्मक उपाय सुचायला लागतील.
बोला!! व्यक्त व्हा!! आणि प्रसन्न राहा.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
Excellent!!!
अप्रतिम!!!
थोडक्यात पण मार्मिक विश्लेषण केले आहे. विचार करायला लावणारा लेख