Skip to content

आपण घाबरतो… म्हणूनच की काय इतरांचं फावतं!

भीती


मिलिंद जोशी


माणसाची अशी कोणती भावना आहे जी इतरांना सगळ्यात जास्त उपयोगी ठरते? अनेकांचं यावर उत्तर असतं… ‘प्रेम’… पण जर कुणी हाच प्रश्न मला विचारला तर माझे उत्तर असेल, ‘भीती’.

माणसाची ‘भीती’ हीच भावना सगळ्यात जास्त इतरांना उपयोगी ठरते. म्हणजे बघा, ‘अभ्यास कर, नाहीतर नापास होशील..!’, ‘चांगले वाग, नाहीतर पाप लागेल..!’, ‘गुन्हा करू नका, नाहीतर तुरुंगात जाल..!’, ‘संघटीत व्हा, नाहीतर संपून जाल..!’. या सगळ्याच वाक्यात आपल्याला दिसेल, कायम कुणाची किंवा कशाची तरी भीती घातली जाते आणि आपल्याला हवे तसे त्या माणसाला वागण्यास भाग पाडले जाते. पण जर माणसाच्या मनाचा अभ्यास केला तर सामान्यतः त्याला तोपर्यंत भीती वाटत नाही, जोपर्यंत त्याला तसा अनुभव येत नाही. पण एकदा का अनुभव आला, की ती गोष्ट त्याच्या मनात घर करून बसते, ती जवळपास कायमसाठी.

याला कुणीही अपवाद नाही. इतकेच काय पण जे लोक इतरांना सांगतात की, ‘देव धर्म थोतांड आहे, ते कधीच मान्य करू नका…’ तेही पुढे जाऊन म्हणताना दिसतात… ‘देवधर्म करत राहिलात, परंपरा पाळत राहिलात तर उद्या हेच लोक तुम्हाला मानसिक गुलाम बनवतील.’ म्हणजे तेही काय करत आहेत? त्यांचे इप्सित साध्य करण्यासाठी याच भावनेचा आधार घेत आहेत. आणि ज्यावेळी माणूस या भावनेच्या अधीन होतो, आपोआपच इतरांना फायदा होतो. हीच गोष्ट पूर्वीच्या लोकांनी जाणली आणि मग देवधर्म, रूढी, परंपरा यांचा उदय झाला. नुसते वैज्ञानिक कारण सांगून माणसे त्यांच्या फायद्याच्या गोष्टीही करणार नाहीत मग त्याला उपाय म्हणजे त्यांना पाप लागते, नरक मिळतो अशी जोडीला भीतीही घातली. जे वैज्ञानिक विचार करणार नाहीत ते किमान भीतीने तरी या गोष्टी करतील आणि सामाजिक व्यवस्था टिकून राहण्यास हातभार लागेल.

मग आता कुणी म्हणेल, भीती बाळगायचीच नाही का? त्या उत्तर आहे… जरूर बाळगायची, पण किती आणि कोणती यावरही विचार करायचा. कारण ‘भीती’ ही भावना अशीही आहे की ती तुम्हालाही अनेकदा संकटात जाण्यापासून वाचवते. खूप जोरात गाडी चालवली तर पडण्याची भीती मनात असेल तर मी हळू गाडी चालवेन आणि अपघाताचे प्रमाण निम्म्यावर येईल. आपले कार्ड hack होऊ शकते ही भीती मनात असेल तर माणूस त्याबद्दल अतिरिक्त माहिती घेईल, त्यावर काळजी घेईल आणि फसवले जाण्याचे प्रमाण कित्येक पटीने कमी होईल.

मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे, कोणतीच भावना पूर्णतः टाकाऊ नाही. अगदी राग, लोभ, मद, मोह, मत्सर या भावना देखील माणसाच्या विकासासाठी तेवढ्याच गरजेच्या आहेत.

मानसशास्त्राचा विद्यार्थी मिलिंद



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

6 thoughts on “आपण घाबरतो… म्हणूनच की काय इतरांचं फावतं!”

  1. Chhan ahe

    Man kase Kam karte savistar. Sanga
    Basic mahiti dya
    Negative. Positive though. Kase Kam sanga

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!