Skip to content

लोकांच्या मनाचा विचार होण्याआधी स्वतःचा विचार व्हायला हवा!!

खरंच माणसाने कुठेतरी नकार द्यायला शिकलं पाहिजे!


महेश बेलेकर


काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ऑफिस मधून बरोबर 5 वाजता मी बाहेर पडलो. छान ऊन पडलेलं होतं. पूर्ण 8 तास काम करून सुद्धा एकदम fresh वाटत होतं. एक विलक्षण उत्साह वाटत होता. गाडी चालवता चालवता मी विचार करत होतो की आज खूप वेळ आहे आपल्याकडे, आज काहीच काम करायचं नाही, मस्त जाऊन सोफ्यावर लोळत पडायचं, माझ्या आवडीच्या जुन्या गाण्यांची एक mp3 प्ले लिस्ट लावून छान ऐकत बसायचं निवांत काहीच प्रॉब्लेम नसेल, हा वेळ फक्त माझा असेल.

घराचं कुलूप उघडून आत आलो आणि फोन वाजला. गावाकडचा मित्र, “आज खूप दिवसांनी आठवण काढली ” मी फोन उचलल्या बरोबर बोललो. तो म्हणाला “मी पुण्याला आलोय Ruby hall मध्ये, आमच्या शेजारच्या काकांना आणलंय, सकाळी त्यांना attack आला होता म्हणून. पण आता बरे आहेत, तू येतोस का मला खूप बोअर झालय आणि आपण खूप दिवस झाले भेटलोही नाही?”.

रुबी हॉल माझ्या घरापासून जवळ जवळ 30km तरी असेल त्यात ट्रॅफिक ची वेळ म्हणजे जीव जातो नुसता. आता त्याला बोअर होतंय म्हणून मी एवढ्या लांबून जाणं म्हणजे माझ्या जीवावर आलं होतं, पण माझा नकार ऐकून त्याला वाईट वाटेल म्हणून ईच्छा नसताना ही मी बोललो “ठीक आहे, येतो”.

नेहमीप्रमाणे आज ही मला “नाही” म्हणता आलं नाही. मनात नसताना मी गेलो. त्याच्याकडे पोचायला मला जवळ जवळ 8 वाजत आले होते. त्याच्याबरोबर आणखी काही लोकं होती ज्यांना मी ओळखत नव्हतो. तो एकटाच नसल्याने कुठे बाहेर फिरणं पण जमणार नव्हतं. शेवटी थोडावेळ थांबुन मी घरी निघालो. घरी यायला मला 10 वाजले होते. त्याला मी 15-20min भेटलो असेल त्यातही बाकीची लोकं आणि त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग यामुळे आम्हाला जास्त काही बोलता ही आलं नाही आणि इकडे माझ्या प्लॅनचे पण तीन तेरा वाजले होते.

नंतर एकदोन दिवसांनी मित्राचा फोन आला की “काय यार काय माणूस आहे तू, मी एवढा पुण्यात आलो आणि तू फक्त 15-20 min च भेटला”.

असं वाटलं की त्याचवेळी नाही म्हंटल असतं आणि नंतर त्याला निवांत घरी बोलऊन पाहुणचार केला असता, मन मोकळ्या गप्पा मारल्या असत्या तर बरं झालं असत. माझा सगळा प्लॅन कॅन्सल करून ही, मी ना त्याच मन राखू शकलो ना स्वतःच.

खरच माणसाने कुठेतरी नकार द्यायला शिकायला पाहिजे. लोकांच्या मनाचा विचार करण्याआधी स्वतःचा विचारपण व्हायलाच हवा. नाहीतर आपण फक्त फरफटत जाऊ प्रवाहसोबत.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

11 thoughts on “लोकांच्या मनाचा विचार होण्याआधी स्वतःचा विचार व्हायला हवा!!”

  1. असं नेहमीच माझ्या मनाला वाटतं, मात्र तसं वागायचं ठरवलं तरी ते माझ्या न होत नाही

  2. Khup सुंदर लेख आहे हा ….योग्य वेळी नकार द्यायला शिकले मी यामुळे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!