Skip to content

आपण सुद्धा केव्हातरी म्हातारे होणार आहोत!!

वृद्धांकडे भावना शुन्यत्यने न पाहता सकारात्मकपणे पाहायला हवं.


जमीर मुलाणी


भौतिक गोष्टी साठी आपण वन वन फिरत असतो. काही काळापूर्वी हे फिरणे स्थानिक पातळीवर होत. आता ग्लोबल झालं आहे. माणसा -माणसा मधील अंतर आता वाढले आहे. वृध्दांची मुलं गावापासून लांब मोठ्या शहरांमध्ये काम करत असतात. या मुलांची बऱ्याच वेळा अपेक्षा असते की वृद्ध आई वडिलांनी त्यांच्याकडे रहावं पण ते एका स्वार्थी कारणासाठी , आई वडील आले तर आपण कामावर गेल्यावर ते आपल्या मुलांचा सांभाळ करतील. कधी कधी वृद्ध व्यक्तीचा आयष्याचा जोडीदार जगातून निघून गेलेला असतो अश्या परीस्तिथीत त्यांच्यावर मोठा मानसिक आघात झालेला असतो.अश्यावेळी त्यांच्याकडुन स्वार्थी मागण्या करणं चुकीचं नाही का?

वृद्धांना वयोमानामुळे काही शारीरिक आजार जडलेले असतात जसे कि पाय दुखणे, चालता न येणे, दृष्टी कमी होणे, कमी ऐकायला येणे, विसर पडणे. तसेच त्यांना मानसिक आणि आर्थिक अडचणीही असतात. अश्यावेळी त्यांना साथ न देता समाज त्यांना अंतर देतो. ते असे बोलतात, ते तसे बोलतात, ते चहा मागतात, त्यांच्या खायच्या सवयी चांगल्या नाहीत असे शुल्लक कारणे देवून त्यांना दूर लोटले जाते. वृद्धांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. मी एका वृद्धाशी बोललो तर त्याने त्याची व्यथा मला सांगितली कि मी माझी सगळी काम करतो पण सर्वात वाईट याचे वाटते की कोणीही त्याची विचारपूस करत नाही ज्यांना शिकवून मोठं केलं ते आज सदिच्छा भेटही देत नाही.

आपणही वृद्ध होणार आहोत, आपल्यालाही व्याधी जडणार आहेत , आपणही आर्थिक दृष्ट्या खचणार आहोत असा विचार करून वृद्धांकडे आपण सकारात्मक पणे पाहायला हवं कारण,आयुष्य भर काम करून ज्यांना मोठं केलं त्यांनी आपल्याला दूर लोटन हि कल्पना देखील डिस्टर्ब करून जाते. आपण त्यांच्या जागी स्व:त ला ठेवून बघायला हवे. ज्याला आपण रोल प्ले म्हणतो.

आशा करतो कि वरील लेख वाचल्या नंतर तुम्ही वृद्धांकडे भावना शुन्यत्यने न पाहता सकारात्मकतेने पाहाल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “आपण सुद्धा केव्हातरी म्हातारे होणार आहोत!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!