Skip to content

‘सेक्स’ बद्दल मुलांना कसं..कधी..काय सांगावं? काय काळजी घ्यावी?

काही लोक विचारतात…सेक्सबद्दल मुलांना कसं..कधी…काय सांगावं ?..काय काळजी घ्यावी ? वगैरे. ..


योगेश चव्हाण


भारतात गोष्टी फार वेगळ्या आहेत….

बाहेरच्या देशात समाज प्रगल्भ आहेच..शिवाय तिथे शाळांमध्येही टप्प्या..टप्प्यांत सेक्स एज्युकेशन दिलं जातं…व्यक्तीस्वातंत्र्य हा तिकडचा प्राण आहे…पण म्हणून नुसताच नंगा-नाच नसतो..तर त्याबरोबर जनतेची जागृता देखील केली जाते…बंधनं टाकणं आणि विषय टाळणं..या दोन्ही गोष्टी प्रगल्भतेत कधीच बसत नाही…यावर काहींचं म्हणणं असतं ते..
पण मुलांना का सांगायचंय याबद्दल ? त्यांचं त्यांचं बघून घेतील मोठं झालं की…. आम्हाला कुठे आई-वडिलांनी सांगितलं.. पण आम्हाला कळलंच ना ? वगैरे. .

मुलांना याबद्दल कळणं..आपण सांगणं यासाठी गरजेचं आहे..कारण त्यांच्या प्रश्नांचं निरसन करणं पालकांचं कर्तव्य आहे…नकळत ते ज्ञान मिळवण्याच्या गडबडीत त्यांच्या हाती काही चुकीचा पर्याय पडू नये.. त्यांची पावलं चुकीची पडू नयेत… म्हणून…आणि महत्त्वाचं कारण हे देखील आहे..जेवढं त्यांना गोष्टी माहित होतील..तेवढी मुलं जवाबदार होतील चुका टाळण्यासाठी…वासना आणि राग या दोन भावना फार भयानक भावना आहेत…त्या जर कंट्रोल झाल्या..केल्या..शमवल्या नाहीत..तर त्यातून काहीही नकोसं उद्भवू शकतं…कारण या दोन गोष्टींसाठी शरीराने आपल्याला अतिरीक्त एनर्जी पुरवली आहे…या दोन भावना व्यक्त होताना..आपल्या शरीराचं मॅकेनिजम देखील फार वेगळ्या प्रकारे चालतं…वासना ही भावना आहे की स्वतंत्र काही..यावर बरीच मतांतर आहेत. मलाही ते इतर भावनांत इनक्लुड न करता स्वतंत्र असावं असं वाटतं…सेक्स..एज्युकेशन साठी मला सर्वात गरजेचं वाटतं ते पालकांची हुशारी आणि वय त्यामागचा विचार समजून घेण्याची कुवत..तुम्ही जर ढगोबे असाल..पोरं तुमच्या दोन पावलं पुढे असतील.. तुम्हाला पोरं काय करतायेत याची खबरबात नसेल..पोरं तुम्हाला सहज उल्लू बनवत असतील आणि त्यातही तुम्ही पोरांवर हुकूमशाही गाजवत असाल..तर तुम्ही सेक्स एज्युकेशनसाठी आवश्यक असणारं वातावरण निर्माण करू शकत नाही…मग कुठलं वातावरण हवंय ?

पालक आणि पाल्यांत विश्वासाचं..प्रेमाचं नातं हवंय… मुलांना हवं ते प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हवंय…मुलांच्या कुठल्याही प्रश्नाला अव्वा..इश्श..शी..घाण असली लेबलं लावण्याचा अडाणीपणा नसायला हवा..तुमच्या मुलांची संगत कुठली..हे पाहणंही फार महत्त्वाचं असतं…वेळप्रसंगी..काही गोष्टी समजायला तुम्हाला मोठं व्हावं लागेल..असं त्यांना विश्वासात घेऊन.. प्रामाणिकपणे.प्रांजळपणे उत्तर देता यायला हवं…मुलं ऐकतात आपलं…असो..असं समजून चालू..की तुम्ही सगळे हुशार आणि समंजस पालक आहात…मुलांशी सेक्सवर बोलताना कुठले प्रॉब्लेम्स येतात ?

सर्वात पहिलं..मुलांना सांगण्याआधी तुम्हाला तरी सेक्सबद्दल पूर्ण माहिती आहे का ? तुम्हाला रोगांबद्दल..ते कसे होतात..ते कसे टाळावेत.. वगैरे ज्ञान आहे का ? मुलांचं शरीर..मुलींचं शरीर … त्यानुसार होणारे हॉर्मोनल बदल… याबद्दल तुम्ही जाणून घेतलंय का ? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला असायला हवी.

ही उत्तरं कुठे मिळतील ? पुस्तकं आहेत..google आहे..youtube आहे… अगदीच काही नाही..तर सरळ प्रश्नांची एक लिस्ट बनवा..एक चांगला सेक्सॉलॉजिस्ट गाठा आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन करून घ्या आधी..ते पैसे वसूल काम असेल…नुसतं मुलांच्या शिक्षणासाठी फिया भरल्या..डान्सला टाकलं..कला जोपासण्यासाठीच पैसे खर्च करावेत असं नाही. (कोणाला इथे या संदर्भात काही महत्त्वाची पुस्तकं कमेंटमध्ये टाकता आली तर मदत होईल इतरांना)

आता पहिला प्रश्न येतो ते..कसं सांगणार ?..ऑकवर्ड वाटतं…असं ऑकवर्ड का वाटतं ? कारण आपल्याला आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची नावं घेणं..घाण वाटतं, त्याची लाज वाटते..आणि इथेच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे…तुम्हाला प्रायव्हेट पार्टसची लाज का वाटते ? का घाण वाटते ? त्यात घाण काय आहे ? ते इतर अवयवांसारखं ट्रीट का करत नाही…कोणी..मला गाल आवडतात..केस आवडतात..म्हटलं कि तुमच्या भुवया वर जात नाहीत.. तर मग कोणी..शिश्न आवडतो..स्तन आवडतात..योनी आवडते..म्हटलं की तुम्हाला आश्चर्य का वाटतं..का त्या पार्ट्सना प्रत्येकवेळी जेलमध्ये टाकल्यासारखं कैद्याची भावना निर्माण करता…जोपर्यंत तुमच्या मनातून त्या पार्टसची लाज..घाण जाणार नाही.. तुम्ही त्याबद्दल बिनधास्तपणे बोलू शकणार नाही.. तोपर्यंत तुमच्या मनातला ऑकवर्डपणा जाणार नाही.. ही तुमची पहिली स्टेप आहे..असायला हवी…मुलांना प्रायव्हेट पार्टसची योग्य नावं माहित असणं फार गरजेचं आहे…त्याचं त्यांना ज्ञान आहे..नावं माहित आहेत म्हणून त्याचा ते गैरवापर करतील असं होत नाही…तर समजा..तुम्ही वरची पहिली स्टेप क्रॉस केली…तर मग सांगणार कसं…?

आता इथे महत्त्वाचं आहे की त्यांचं वय काय ? म्हणजे जर तुम्ही ३ वर्षाच्या मुलाला..१५ वर्षाच्या मुलाला हवंय ते ज्ञान..ती माहिती देऊ शकत नाही…प्रत्येक मुल वेगळं असतं आणि त्यानुसार, त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार तशी माहिती त्याला पुरवणं गरजेचं असतं…पोस्टपुरतं..हे वय..मर्यादा आपण ७ च्या पुढचं घेऊ…त्या वयात मुलांना बऱ्यापैकी आपल्या लिंगाशी ओळख-पाळख होते…काही हस्त..मैथुनही करू लागले असतात…मुलांच्यात स्पर्म्स बनण्याचा काळ जरी १० वर्षानंतर असला..तरी ते आधीही मैथुन करू शकतात…फक्त वीर्य गळत नाही..येवढंच.. बाकी प्लेजर मिळतं…तर सांगायचा मुद्दा हाच की..तुमची मुलं त्या वयात..मैथुनापर्यंत..आसपास पोहोचलेली असतील…या वयात त्यांना यासाठीही कळणं गरजेचं आहे..कारण या वयात शरीरात बदल व्हायला सुरुवात होते..कधी रात्री..अपरात्री चड्ड्या ओल्या होतील..केस यायला लागतील..पाळी सुरु होईल…. वगैरे…पण आता प्रॉब्लेम कुठेय ? तर त्यांना सांगण्यात ? पण का ?

कारण तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी दहाव्या वर्षी एकदम सेक्सवर बोलायला लागला..तर ते त्यांनाही ऑकवर्ड होऊन जाईल…जे आई..बाप आपल्याशी सेक्सबद्दल एक चकार शब्द देखील बोलले नाहीत कधी..ते एकदम सेक्स..वगैरे बोलायला लागले तर कसं वाटेल ?

म्हणजे इथे तुम्ही आधीपासूनच तुमच्या मुलांशी त्यावर चर्चा करणं फार गरजेचं आहे…सेक्स लैंगिक चर्चा हा विषय आधीच हलका..फुलका ठेवला तर त्यांनाही पुढे काही विचारायला संकोच वाटणार नाही…आणि ते कसं करावं यासाठी पुस्तकं वाचा..डाॅक्टरांचे सल्ले घ्या…

आता इथे दोन प्रकारची मुलं आहेत.
१. जे बिनधास्तपणे विचारतात…
२. जे काही विचारत नाहीत…

जे पहिल्या कॅटेगरीत येतात..जे बिनधास्त विचारतात.. त्यांच्याबद्दल काळजी नाही..कारण पालक..पाल्य यांच्यामधलं नातं किती विश्वासाचं आहे.. हे ते दर्शवतं. इथे पालकांना फुलटाॅस मिळतो…आऊट व्हायचं की सिक्स मारायचा..हे त्या पालकावरून निश्चित होतं…
जे दुसऱ्या कॅटेगरीत येतात..त्यांना हा विषय कुठल्या ना कुठल्या कारणाने Taboo झालाय.. मग ते कारण तुमचं मुलांशी वागणं असेल नकळत..किंवा मग त्यांच्यावर समाजाचा प्रभाव असेल.. समाज..शाळा..मित्र, आजूबाजूची लोकं… वगैरे. तुम्ही कुठे राहताय..कुठल्या परिसरात राहताय..तिकडच्या लोकांची मानसिकता काय… अशी बरीच कारणं असू शकतील..तर आता जे बिनधास्त विचारतायेत..त्यांना कुठलाही संकोच न बाळगता…उत्तरं द्या. ती उत्तरं कशा स्वरूपात असावीत यासाठी हवं तर डॉक्टरची मदत घ्या…पुस्तकांना जवळ करा… त्यात काहीही चूक नाही. पण त्यांचं निरसन करणं गरजेचं आहे…आणि जे विचारत नाहीत.. त्यांच्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल…तुम्हाला वेळ काढून थोडं डोकं चालवावं लागेल…प्रत्येक पालकाचा आपापला फंडा असू शकेल…मी काय केलं असतं..ते सांगतो..ते कोणाला पटावं असं गरजेचं नाही…
मी पुस्तकांचा आधार घेतला असताच (घेतोच). अमुक पुस्तकं गिफ्ट दिली असती…Amazon वर कींवा अजुन बऱ्याच साईट्स वर तुम्हाला हवी ती पुस्तकं मिळू शकतात.. प्रत्येक पाल्याला त्याबद्दल उत्सुकता असते…त्यामुळे शाळेच्या अभ्यासात इंटरेस्ट नसला तरी याची पुस्तकं ते पटापट उत्सुकतेपोटी वाचतात…

तसे शैक्षणिक काही व्हिडीओज..चित्रपट आहेत का पाहिलं असतं…ते दोघांनी बघता येतील अशी सोय केली असती..चर्चा घडवुन आणण्यासाठी प्रयत्नशील असतो… अशा कुठल्या संस्था आहेत का..ते शोधलं असतं.. ज्या सेक्स..एज्युकेशन देतात…
पुढचा माझा आवडता पर्याय आहे…

मी एक गेम तयार केला असता…प्रत्येकाने आपापले प्रश्न तयार करायचे आणि त्याच्या चिट्ठ्या बनवायच्या… चिठ्ठया उचलल्यावर जो प्रश्न येईल..त्याचं उत्तर जो सांगेल..त्याला पॉईंट्स द्यायचे.. हा खेळ इंटरेस्टिंग व्हावा म्हणून काही प्रश्न फारच सोपे टाकायचे.. ज्याची उत्तरं ते देऊ शकतील आणि बर्यापैकी बक्षीसही ठेवायचं…ही लाच एकप्रकारची. या गेम आधी तुम्हाला तशी वातावरण-निर्मिती करावी लागेल..

आता या सेक्ससंदर्भातले महत्त्वाचे प्रश्न तुम्ही टाकू शकता ..याची गंमत अशी आहे, की एका प्रश्नापासून हजार प्रश्नांची लिस्ट सुरु होते..७ ते १५ वयोगटात आपण पुढचे प्रश्न टाकू शकतो…सगळेच प्रश्न अमुक एका वयाला सूट होणार नाहीत…पण पाल्याच्या वयानुसार कुठले योग्य ठरतील ते तुम्ही ठरवा…

म्हणजे मुलं कशी होतात ? वडिलांकडची एक गोष्ट आणि आईकडची एक गोष्ट जेव्हा एकत्र येते..तेव्हा मुलं होतात…ती गोष्ट एकत्र कशी येते ? पुरुषाचं लिंग जेव्हा स्त्रीच्या योनीत जातं तेव्हा…आणि त्यालाच सेक्स म्हणतात…सेक्सचे कुठले प्रकार असतात ?
मुख्य प्रकार एक लिंग आत टाकणं..दुसरं ओरल सेक्स.
ओरल सेक्स म्हणजे काय ?

जेव्हा दोन व्यक्ती मग त्या कुठल्याही लिंगाच्या असो. त्या एकमेकांच्या लिंगाला मुखाने स्पर्श करतात..त्याला ओरल सेक्स म्हणतात…असं करणं योग्य आहे का ? सेक्स घाण नाही का ? घाण नाही..पण ते फक्त मोठ्यांसाठी आहेत..अमुक एक वय झाल्यावरच ते करावं..कारण त्याने कधीही बरे न होणारे रोग होऊ शकतात…इथे त्यांना STD.. HIV बद्दल माहिती देऊ शकता.. सेफ सेक्स म्हणजे काय ?

मग इथे त्यांना कंडोम वगैरेची माहिती करून देता येईल.. ते कसे असतात हेही दाखवता येईल…

पाळी म्हणजे काय असतं ? ती मुलींनाच का येते ?

हे समजावताना त्यांच्या आईला देखील पाळी येते..हे सांगणं महत्त्वाचं आहे…जेणेकरून मुलांच्या मनात इतर मुलींबद्दल काही वेडेवाकडे विचार येणार नाहीत.. आपल्या आईबद्दल नेहमीच सॉफ्ट..कॉर्नर असतो.. आपल्या आईसारख्याच इतर मुली..बायका..हे त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल…इथे..खासकरून मुलांना मुलींशी वागताना कुठले मॅनर्स असावेत..कुठले संकेत पाळावेत हे शिकवणं गरजेचं आहे…कोणाच्या मागे लागू नये..आपल्या वागण्याचा आजूबाजूच्या मुलींना त्रास तर होत नाही ना..Consent म्हणजे काय… हे सगळं सांगणं गरजेचं आहे…मुलांच्या पालकांनी कधीही जास्त काळजी घ्यायला हवी…. तर वरचे कुठले प्रश्न मांडायचे.. हे त्यांचं वय काय..त्यांची समज काय… ह्यावरून ठरेल…हे सगळं हाताळणं अवघड जात असेल..तर सरळ चांगला डॉक्टर बघावा..जो हे सगळं तुमच्या मुलांना समजावू शकेल…चर्चा करू शकेल…आजच्या घडीला पुस्तकं..मॅगजीन्स मदतीला आहेतच.

आपल्याला रोगराई आणि सेफ्टी ह्या दोन गोष्टी कव्हर करायच्यात…आपलं कर्तव्य त्यांना सेक्स करू न देणं..हे नाही.. तर ते त्यांनी सेफ्टी कशी बाळगावी हे आहे… त्यांचं सेफ राहणं महत्त्वाचं आहे…हे सगळं करताना काही महत्त्वाचे प्रश्न उरतातच…यामुळे त्यांच्यात सेक्सबद्दल अतिउत्सुकता निर्माण होऊन..त्याबद्दल त्यांना अजुन माहिती हवी असेल का ? त्यामुळे त्यांना सेक्स ट्राय करावासा वाटेल का ? आपले आई-वडील असं सेक्स करतात..हा विचार करून त्यांना घाण..वाईट वगैरे वाटेल का ? या सर्वांवर एक असा कुठला फाॅर्मुला नाही…काही प्रसंग आपल्याला झेलता येणारही नाहीत.. काही गोष्टी जशा समोर येतील..तशा त्या हॅन्डल कराव्या लागतील…म्हणजे उद्या मुलांनी विचारलं..कीमला अॅक्चुअल सेक्स कसा असतो ते पाहायचंय…वगैरे…

इथे आपल्याला मुलांना कायद्याची भिती घालावी लागेल…अमुक एका कायद्यापर्यंत तुम्ही सेक्स करू शकत नाही..18 वर्षांखाली सेक्स..व्हिडिओ पाहणं देखील कायद्याने कसा गुन्हा आहे..आणि तो गुन्हा असण्याचं कारण काय..त्यांना काय शिक्षा होऊ शकते.. हेही त्यांना समजावून सांगता यायला हवं…

बाकी..जर त्यांना सेक्स अँव्हेलेबल झाला..तर ते त्यांना हवं तेव्हा सेक्स करणारच..तुम्ही कितीही फंडे दिलेत तरी…ती शरीराची गरज असेल…अमुक एका वयानंतर त्यांनी फक्त सेफ राहावं..एवढाच आपला मेन उद्देश असायला हवा…बाकी त्यांना बिझी ठेवणं इतर गोष्टींत.. त्यांचे मित्र..मैत्रिणी कोण पाहणं.. मुलं आपल्याला एक मित्र म्हणून पाहतील..आपल्याशी त्यांच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करतील…. हे पाहणं गरजेचं आहेच…

( काही वाचलेल…काही अनुभवलेल…व काही माझ्या मनातल)


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

12 thoughts on “‘सेक्स’ बद्दल मुलांना कसं..कधी..काय सांगावं? काय काळजी घ्यावी?”

  1. Maza mulga 8varsha cha 2 std madhe shikat ahe…tyala sex baddal basic sangu shakte ka…? Ani te kase ? Sangnya chi yogya padhat ..please reply

  2. अतिशय उपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत

  3. माहीती खूपच छान मला दोन मुलं
    आहेत

  4. My son is 16 years now, and i am single parent mother please let me know how can I tell my son about this

  5. Dinesh वडतेले

    खूप छान माहिती आहे मला 3 मूल आहे आणि मी स्वता
    आपण नमुद केलेल्या काही विषयावर मुलाशी चर्चा करत
    असतो माज मुलांना हे सांगणे असते कि अपलेला आशे बाबतीत काही प्रशन पडलेस पहिले मला सांगा
    मी तूम्हाला तेचे उत्तर देईल
    ये बाबतीत आई किव्वा वडिल योग्य मार्गदर्शन करू शकतील

    त्या तुनच येणारी पीडी योग्य गडेल अस माज मत आहे

  6. Mast aahe..
    Mahiti chaan aahe
    Yasathi me Vitthal Prabhu yanche” YAUVAN TE VIVAH” he pustak suggest karel

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!