Skip to content

सत्यघटनेवर आधारित..स्त्री आणि मानसिक धक्का !

कालच आमच्या कडे आधी काम करणाऱ्या पोळीवाल्या मावशी भेटल्या होत्या,  खूप दिवसांनी भेटल्या , त्यांच्या चेहऱ्यावर आणि माझ्याही चेहऱ्यावर तेवढाच आनंद , म्हणले कशा आहात मावशी , किती खराब झाल्या आहात,
काय सांगू ताई, जावई गेला मागच्यावर्षी , पोरगी अजून त्या धक्क्यातून सावरतच नाही हो, नातवंड लहान आहेत , त्यांची शिक्षण , पोरींनी सावरले पाहिजे हो, 

मी तिला दिलासा द्यायचा म्हणून म्हणले सावरेल हो सावरेल, पण त्यांना निरोप देऊन पुढे आले आणि सुन्न झाले , ओकसा बोक्शी मीच रडले ,

माहेरून स्त्री ज्याच्या भरवशावर जाते , जो सुख दुःखात साथ देतो , जिथे शरीर आणि मन यांचे मिलन होते , कितीही भांडणे , वाद झाली तरी ते सगळे विसरून संसाराचा गाडा पुढे ढकलत असतात , पटो न पटो जगाला दाखवून देत नाहीत , ही सगळी तडजोड करीत आयुष्य जात असते आणि अचानक असा नवरा सोडून जातो , मग कधी इथे जसे झाले की आयुष्यच संपले त्याचे ,  तर कधी नवरा आपल्या बायकोला सोडून देतो , तेव्हा स्त्री या धक्क्यातून खरच बाहेर पडू शकत नाही, आपल्या नवऱ्याची साथ संपली हे कटू सत्य पचविणे खूप अवघड जाते , आणि ती या धक्क्यातून सावरेल तेव्हाच मुलांकडे बघू शकेल ना!! तेव्हाच कुठे आर्थिक स्थैर्य मिळविण्याकरिता, पोटापाण्याकरिता धडपड करेल
आणि यातून बाहेर पडन्याकरिता वेळ हेच उत्तम औषध , आणि ठामपणे तिच्या पाठीशी लागणारा कोणाचा तरी आधार
स्त्री आपल्या नवऱ्याचे दूर जाणे हा मानसिक धक्का पचवून , कोलमडलेल्या अवस्थेतून बाहेर पडणे हे खरच खुप अवघड आहे
काही स्त्रिया मुळातच स्ट्रॉंग असतील , मग मानसिक , शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या असतील तर त्यांना हे धक्के फार हादरवून टाकत नाहीत ,
पण मुळातच स्त्री ही नाजूक , पुरुषापेक्षा हा । हळवी आणि जेव्हा पुरुषाला आपले सर्वस्व देते तेव्हा त्यात प्रचंड गुंतलेली अशी असते,
खंबीर साथ आणि वेळच उपाय , आशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या या मानसिक धक्क्यातून सावरू शकत नाहीत, पण याची जाणीव पुरुष आणि जवळच्या नातलगांना कितपत असते माहिती नाही , असते का नाही तेही नाही माहिती,
अलका मावशी होईल हो सगळे बरे , सावरेल लेक तुमची , तुम्ही पाठीशी राहा खंबीर !
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!