
प्रेमाची साइकोलॉजी
समाजामध्ये वावरत असताना आपला अनेक लोकांशी संबंध येत असतो. त्या समूहामध्ये काही पुरुष तर काही स्त्रियाही असतात. त्यामध्ये काही पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतात, तर काही स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होत असतात. त्यामधील आकर्षण हे सुंदर आणि उठावदार असेल तरच पुरुष स्त्रियांकडे आकर्षिला जातो. याउलट स्त्रिया पुरुषांच्या कर्तृत्व आणि जबाबदारीकडे विशेष आकर्षित होतात.रोजच्या जीवनामध्ये प्रेमाला खूपच महत्त्व आहे.
काहीजण प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी काही जण जगतात तर काही जण प्रेमासाठी एखाद्याला मारायला पण मागे-पुढे पाहात नाहीत. एखादी व्यक्ती आवडणे आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.असे म्हटले जाते, की खरे प्रेम एकदाच होते; पण आजकाल प्रेमाचे स्वरूपच बदलले दिसते. कारण कोण चैन करण्यासाठी, कोण टाईमपास करण्यासाठी, कोण एकटेपणा दूर करण्यासाठी तर कोणी चॅलेंज म्हणून प्रेम करताना आढळतात, त्यामुळे आता खरे प्रेम किती वेळा होऊ शकते, हे सांगता येणे अशक्य आहे. खरे प्रेम दीर्घकाळ टिकणारे आणि परिपक्व असे असते आणि क्षणभंगूर असते ते खरे नसते.आपल्याला होणारे प्रेम हे कशा प्रकारचे असते आणि कसे होते ते जाणून घ्या.
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं‘”तुमचं आमचं अगदी सेम असतं‘असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल; पण “प्रेम म्हणजे पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्ती आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध प्रस्तापित करण्यास योग्य जोडीदार समजू लागतात, तेव्हा त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.‘‘”तेव्हा तुमचं आमचं प्रेम सेम नसतं‘प्रत्येक व्यक्तीचे होणारे प्रेम हे वेगवेगळे असते. प्रेम हे विशिष्ट छटांमधून होत असते. प्रत्येकाने आपण कोणत्या छटांमधून प्रेम करतो हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक जोडीदारांना आपले प्रेम खरे आहे, परिपूर्ण आहे आणि ते शेवटपर्यंत टिकावे असे वाटत असते. प्रेमामध्ये प्रमुख तीन वैशिष्ट्यांचा सहभाग असतो.
1) जवळीकता ः “दोघांनापण एकमेकांच्या जवळ राहण्यासाठी असणारी भावना म्हणजे जवळीकता होय.‘ ही वैशिष्ट्ये असणारी व्यक्ती एकमेकांचे चांगले व्हावेअशी इच्छा असते. जोडीदाराची मने ओळखतात. त्यांचा आदर ठेवतात व त्यांच्यावर अवलंबून असतात. एखादी गोष्ट जोडीदाराला आवडत नसेल तर ती करण्याचे टाळतात.
2) उत्कटता ः यामध्ये शारीरिक आकर्षण, लैंगिक जवळीकताआणि प्रेमाची भावना मोठ्या प्रमाणात असते.
3) बांधिलकी ः जोडीदाराशी माझेपण प्रेम आहे आणि आमचे परस्पर संबंध टिकवून ठेवणे ही माझी पण जबाबदारी आहे. यातच बांधिलकी येते. यामध्ये जबाबदारीचा स्वीकार आणिआयुष्यभराची साथ देण्याची भावना असते.जवळीकता, उत्कटता आणि बांधिलकी या तीन वैशिष्ट्यांच्या आधारातून प्रेम ही परिपूर्ण कल्पनातयार होते.”प्रेम हे संपणारच असतं हे माहीत असतं, तरी पण ते आपण करतो कशाला.‘ हे “मितवा‘मधील प्रसिद्ध वाक्य आहे. तर प्रत्येकाचे प्रेम या वाक्यांप्रमाणेच संपू नये असे वाटत असेल तर आपण आपले प्रेम दीर्घकाळ टिकवण्यासाठी खालील प्रकार लक्षात घ्यावे.
1) आवड ः (फक्त जवळीकता) ः भावना आणि निष्ठा असणारा मैत्रीसारखी जवळीकता होय.
2) अद्भुतरम्य प्रेम ः (जवळीकता + उत्कटता) ः एकमेकांबद्दल शारीरिक प्रेम असणारे परंतु जबाबदारीची जाणीव नसते.
3) सहवास प्रेम ः (जवळीकता + बांधिलकी) ः जबाबदारीने स्वीकार केलेली दीर्घकाळाची मैत्री.
4) भुरळ घालणारे प्रेम ः (फक्त उत्कटता) ः जवळीकता आणिजबाबदारी नसताना पहिल्या भेटीत झालेले प्रेम.
5) पोकळ प्रेम ः (फक्त बांधिलकी) ः लैंगिक आकर्षण व जवळीकता नसतानादेखील एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा घेतलेला निर्णय.
6) पोरकट प्रेम ः (बांधिलकी + उत्कटता) ः जवळीकता निर्माण होण्यासाठी वेळ न देताच झपाट्याने निर्माण झालेले प्रेम व थोडीशी ओळख असणाऱ्या व्यक्तींशी होणारे उथळ प्रेम.
7) परिपूर्ण प्रेम ः (जवळीकता + उत्कटता + बांधिलकी) ःहे तिन्हीही प्रकार ज्या प्रेमात येतात, त्यांचे प्रेम परिपूर्ण असते, यालाच आदर्श प्रेम म्हणतात;
पण अशा प्रकारचे प्रेम सहजासहजी होत नाही व सहजासहजी साध्य देखील होत नाही.प्रत्येकाचे प्रेम हे कोणत्या ना कोणत्या प्रकारांमध्ये येतच असते. जर प्रत्येक प्रेमीयुगलांनी आपल्या प्रेमाचे व नातेसंबंधाचे योग्य आत्मनिरीक्षण करून पाहिले तर आपले प्रेम कोणत्या पायरीवर आहे आणि आपण कसे Success करू शकतो याकडे विशेष लक्ष देता येईल.Over all -फक्त (14 Feb.) व्हॅलेंटाइन डे आला म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली असे काहींना वाटते. खरे प्रेम करणाऱ्यांना व्यक्त करण्याची गरज पडत नाही. प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यांमधून ते सहज शक्य जाणवते. प्रत्येकाने प्रेम केलेच पाहिजे असे नाही आणि प्रेम हे ठरवून तर मुळीच करू नये. प्रेम ही अशी भावना आहे, की सहवासातून, वागण्या-बोलण्यातून आपोआपच होत-जात असते, यालाच खऱ्या प्रेमाची उपमा देता येईल.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


विवाहित जोडप्यान मधील , एकाचे त्रयस्थ वेवाहिक जोडप्याचा साधिदाराशी , होऊ घातलेल्या प्रेम संबंधांना आपण काय सबोधन देऊ शकतो ? ते योग्य की अयोग्य ?
परस्पर विरोधी मताचे दोन जण विवाह बंधनात अडकले गेले असतील , अश्या लोकांना दुसऱ्या कडून मिळणाऱ्या प्रेमाचा स्वीकार करावा की नाही ?
*मार्गदर्शन अपेक्षित*
अप्रतिम
छान.
खुप छान
उत्कृष्ट, पण एकांगी , चौकटीतला ,
वैवाहिक जोडप्याशी निगडित,
या नात्या व्यतिरिक्त , वैवाहिक पण गैर स्त्री – पुरुषांच्या मधील ( शारीरिक सोडून) प्रेमाला , अपराधी पणाची भावना जाणवू शकते.
खूप छान
सुंदर
आजकाल प्रेमाची pribhasha बदलली आहे….यावर लिहिलेला हा लेख सुंदर आहे……????????