Skip to content

त्या वेश्या नाहीत…आपल्या नजरा वेश्या झालेल्या आहेत!!

कोल्हाट्याचं पोर


कै.डॅा. किशोर शांताबाई काळे.
कोल्हाट्याचं पोर.


वेश्या म्हणजे पैशांसाठी रोज अनेक व्यक्तींशी संबंध ठेवणे. पण या कोल्हाट्याच्या स्त्रीया; त्यांना कोणी सांभाळणारा असेल तर लग्नाची बायको सुध्दा वागणार नाही इतक्या निष्ठेने त्या वागतात. अशा नाचणारणीला तुम्ही वेश्या म्हणता! त्या वेशा नसतात; तुमच्या नजरा वेश्या झालेल्या असतात.

हे पुस्तक जरूर वाचा!

ही कथा आहे समाजाने नाकारलेल्या, आई-वडिलांच्या प्रेमापासुन वंचित राहीलेल्या, गरिबीने लाचार झालेल्या, कोल्हाटी समाजात एका नाचणारणीच्या पोटि जन्म घेउन डाॅक्टर झालेल्या पोराची. जन्मत:च स्वत:ला ‘नाजायज आैलाद’ हे सर्टीफिकेट समाजाने दिले आहे. आई मास्तरीण होण्याच्या उंबरठ्यावर असतांनाच समाजानं तीला नाचणारीण होण्यास मजबूर केलं.

कोल्हाटी समाजात नाचणारणीच्या मुलांना ना बापाचा सहारा मिळतो ना आईचा. दुध पितं बाळ आपल्या आई-बापाजवळ सोडुन, त्यांच्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी ती गावोगाव नाचायला जाते. मुलाला ती बरोबर बाळगत नाही. कारण मुल असलेल्या नाचणारणीला कमी लेखलं जातं. त्या नाचणारणीमधलं आईचं ह्रदय मेलेलं असतं का ? की समाजानं मारुन टाकलेलं असतं ? नाचणारीण जर उमेदीत मेली तर तीची मुलं कुत्रीच्या पिल्लांसारखी सैरावैरा फिरतात. त्यांच्यामधून गुन्हेगाराचा उगम होतो.

माझ्यासारखा एखादाच परिस्थितीशी झुंज देत डॅाक्टर होउ शकतो. मी बार्शीच्या कुंटणखान्यातुन बाब्याबरोबर पुण्या-मुंबईला गेलो असतो, तर मी डॅाक्टर होण्याऐवजी भडवेगीरी करीत अनेक जातींतील स्त्रीयांचं शरीर विकलं असतं.

मेडिकल काॅलेजच्या होस्टेलवर माझी जात कळली की त्यांच्यात चर्चा चाले की यांच्याच समाजातल्या स्त्रीया नाचतात आणि वेश्येचा धंदा करतात ! परंतु फक्त कोल्हाट्याच्याच स्त्रीया नाचत नाहीत तर अनेक उच्च-नीच, गरीब-श्रीमंत घराण्यातल्या स्त्रीयाही नाचतात. कोल्हाट्याच्या स्त्रीयांवर मात्र नाचणारणीचा शिक्का मारला जातो. नऊवारी साडीत सर्व शरीर झाकुन, रात्रभर नाचूनदेखील दोनशे रुपए मिळत नाहीत, त्या नाचणारणीला इज्जतही नसते. परंतु सिनेमांमधे सर्व उघड्या शरीराचं प्रदर्शन करुन एका रात्रीत लाखो रुपए मिळवतात. त्याला मात्र ‘कला’ आणि ‘फॅशन’ म्हणतात.

बाहेरचा समाज काय म्हणेल, आपल्याला सुखानं जगु देईल का ? या भीतीनं घाबरुन कोल्हाटी समाजात अनेक हीरे लपून बसलेले आहेत. परंतु डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दीलेला आहे, ‘शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा’. शिक्षण हे वाघीनिचे दुध आहे. ते प्यायल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या त्यांच्या मंत्रामुळे माझ्यासारख्या खेड्यातल्या मुलानं मुंबईसारख्या शहरांमध्ये ग्रॅंट मेडिकल कॅालेजला प्रवेश मिळवला.


आज डॉ. आपल्यात नाहीत त्यांच्या विचारांना आदरांजली देत आजचा लेख आपण अत्यंत नम्रपणे प्रकाशित करीत आहोत.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “त्या वेश्या नाहीत…आपल्या नजरा वेश्या झालेल्या आहेत!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!