
बिलीफ सिस्टीम !…
डॉ. शिरीष राजे
(मानसशास्रतज्ञ)
लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?”
माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.”
मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का?
शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते?
धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं? – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!
तेच जेआरडी टाटा म्हटलं की – पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!
स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!
तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!
जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये?
जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्यावर मजा करताना दिसेल!
ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?
ह्या लोकांपेक्षा असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं!
बिलीफ सिस्टीम!
तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासुन बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी बनुन जगतो, केवळ त्याच्या बिलीफ सिस्टिम मुळे!
आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयशं आपल्याला असं भासवतात, की आपण दुर्बळ आहोत, पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो.
बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो,
समजा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी एका कार्यक्रमात गेला आहेत, जेवणे चालु आहेत वाढण्यात तुम्हीही त्या परिवाराला मदत करत आहात आणि कोणीतरी सांगतं,
“जा बरं, किचनमधुन तेवढं मीठ घेऊन ये!”
तुम्ही किचन मध्ये जाता, पण मनात विचार येतो, “इथे मी नवीन आहे,मला यांच्या घरातलं मीठाचं भांडं कसं सापडेल, बरं?”
अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मीठाचं भांडं दिसतच नाही, आपण रिकाम्या हाताने वापस आलेलं पाहुन ती व्यक्ती म्हणते, “अरे समोरचं तर ठेवलेलं आहे, ”आणि आपल्या हाताला धरुन ती किचन मध्ये येऊन भांडं दाखवते, आणि मीठाचं भांडं एकदम समोरच असतं,”
आपल्याला ते आधी सापडत नाही कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते, की “मला ते सापडणार नाही आणि आपलं अंतर्मन अगदी तसचं घडवतं.”
बिलीफ सिस्टीम माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते किंवा त्याची तरी धुळधाण करते,
चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे, ‘माझ्याकडे काय नाही’, हे न पाहता, ‘माझ्याकडे काय काय आहे?’ याचा विचार करणं!
रजनीकांत कंडक्टर होता, त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागोमटा, लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे स्टाईल आणि डायलॉग डिलीव्हरी होती, त्याने त्याच्यावर फोकस केला आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे. ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल होतात.
अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुझा हिरो बनण्यातला अडसर आहे. अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही त्याने स्वतःला विचारलं माझ्याकडे काय चांगलं आहे? त्याने असा काही आवाज कमवला दोन मिनीटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात.
जेफ बेजोस असो वा जेक मा,
स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेटस.
नारायण मुर्ती असो वा
दिपीका पदुकोन असो वा माधुरी दिक्षीत.
महेंद्रसिंग धोनीपासुन संदीप महेश्वरी पर्यंत.
स्वामी विवेकानंदांपासुन, विवेक बिंद्रांपर्यंत.
कोणतही, तुमच्या फेव्हरेट असलेलं कोणतंही कॅरॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणुन बघा,
त्याच्या यशाचं उत्तर तुम्हाला त्याच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल.
तर मित्रांनो,
यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीतही ही बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खुप मदत करते, किंवा आपल्या मार्गात आडवी येते,
ज्याचा बिलीफ खुप सशक्त आहे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते.
असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार मी माझ्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले आहेत,
आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडतानाही पाहतो आहे,
तुमची बिलीफ सिस्टीम कशी आहे? ती तुम्हाला साथ देते की नाही?
का तीच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात?
लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्वलायजेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलवण्यासाठी उपयुक्त आहेत.
बिलीफ सिस्टीम ला मजबुत करण्यासाठी,आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतुट विश्वासाचं बळ देण्यासाठी, उत्तम जाणकार व अभ्यासु समुपदेशक मोठी मदत करू शकतात.
तुमची बिलीफ सिस्टीम उतुंग भरारी घेवो यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !….
ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग…त्याला या जगात अशक्य असे कांहीच नाही….
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


Sunder
Very interested
Nice
Mast
Chan
Nice.