Skip to content

पुरुष स्त्रियांसारखे का रडत नाहीत….? यामागचं मानसशास्त्र काय ?

स्त्रियांना रड़ताना नेहमीच पाहिले आहे, ‘स्त्री आणि रडण’ जणू एका नाण्याच्या दोन बाजू इतके पक्के समीकरण आहे आपल्या भारतीय समाजात तरी… पण ‘पुरुषांच रडण’ हे बहुधा आपल्या समाजाला मान्यच नाही… पहिल्यापासून पुरुष म्हणजे ‘पराक्रम’ अशीच व्याख्या आहे.. पण त्याचा दुःख व्यक्त करण्याचा विचार थोडा दुरचा वाटतो… कारण दुःखातही ‘आधारस्तंभ’ बनून राहण्याचे बाळकडू त्याला मिळालेले असते..
अगदी एखादा लहान मुलगा रडायला लागला की, त्याला कुणीतरी म्हणतेच, ‘अरे, रडतोस काय मुलीसारखा?..’ तेव्हापासून त्या बालमनावर कोरले जाते, की मुलीच रडून भावना व्यक्त करू शकतात.. मुलांनी कधीच रडू नये.. ‘रडून व्यक्त होण म्हणजे कमकुवतपणाचे लक्षणही मानतात काही पुरुष..  मुलांनी नेहमी खंबीर रहावे, रडू नये.. संस्कारही असच सांगतात…
“पुरुषांना रडायला मनाई आहे.” ही बेगड आता तुटायला हवी.. कारण ही अट घातली होती पुरुषांना बलशाली, पराक्रमी बनवण्यासाठी पण याच अटीमुळे जर पुरुष आतल्या आत झुरत असतील .. नैराश्यात जात असतील तर.. कुठेही व्यक्त न होता आल्यामुळे.. व्यसनाधीन होत असतील तर.. सरतेशेवटी आत्महत्येचा पर्याय निवडत असतील तर..
‘पुरुषांना रडायला मनाई आहे.. यावर पुनः विचार व्हायला हवा’..
रडणं म्हणजे काय?.. मनात साठलेल्या, दबलेल्या अव्यक्त, त्रासदायक ठरणाऱ्या, वाटणाऱ्या ताणरूपी भावनांना अश्रूद्वारे वाट करून देणे..
न रडल्यामुळे जास्त काही नुकसान होत नाही, पण मनात गोष्टी साठून राहिल्यामुळे ‘ह्रदयविकाराचा’ धोका मात्र वाढतो.. त्यामानाने पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका खुप कमी असतो..(औरतें कभी ‘हार्ट अटॅक से नहीं मरती, क्योंकि उनके पास दिल ही नहीं होता’ हा केवळ एक विनोद आहे) कारण त्या नेहमीच व्यक्त होतात, मग त्यांचा व्यक्त होण्याचा मार्ग रड़णे का असेना… रडण्याने प्रश्न सुटत नसतात हे खरे आहे, परंतु मनावरचे ओझे मात्र नक्कीच कमी होते, आणि किचकट परिस्थितीतुन बाहेर निघण्यासाठी मेंदू नव्याने विचार करू लागतो..
असही नाही की पुरुष रडत नाहीत, ते रड़तात पण फ़क्त त्याच व्यक्ती जवळ, जी त्यांची विश्वासू असेल, जी त्यांच्या आसवांची भाषा समजू शकेल… कारण सर्वज्ञात आहे, आपल्या समाजात ”पुरुषांना रडायला मनाई आहे’..
रडण्याची मनाई असणं.. खरंच योग्य आहे का?..
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!