Skip to content

‘फक्त आजच्या दिवसासाठी’ स्वतःला ही स्वयंसूचना देऊन पाहूया!

फक्त आजच्या दिवसासाठी


फक्त आजच्या दिवसासाठी मी आयुष्यभराचे सर्व प्रश्न, चिंता, एकदम सोडविण्या ऐवजी फक्त आलेला हा दिवस व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करणार आहे. शांत आयुष्य जर मला जगायचे असेल तर मी आजचा दिवस काहीतरी करू शकतो.
.
फक्त आजचा दिवस मी आनंदी राहीन,अनुभवी लोकांनी अचूक सांगितले आहे की जेवढा निश्चय करतील तेवढाच आनंद सर्वजण उपभोगू शकतील.
.
फक्त आजचा दिवस सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षा प्रमाणेच बदलण्या ऐवजी मी स्वतःला त्यापरीस्थितीनुरूप बदलण्याचा प्रयत्न करीन.
.
फक्त आजचा दिवस मी माझ्या मानसिक शक्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करीन.स्वतःला उपयुक्त अशी एखादी गोष्ट मी अभ्यासण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करीन.माझ्या चंचल मनाला मी आजचा दिवस आवर घालीन.ज्यासाठी मनाची एकाग्रता, विचारला पूरक व प्रयत्न लागतील असे काहीतरी वाचण्याचा मी प्रयत्न करीन.
.
फक्त आजचा दिवस मी माझ्या मनाला तीन प्रकारची शिकवण देईन.समजणार नाही अशा रीतीने मी आज कोणाचे तरी भले करीन आणि तरीही कुणाला समजले तरी मी त्याची दखल घेणार नाही . फक्त मानसिक व्यायाम म्हणून ज्या गोष्टी मला कराव्याश्या वाटणार नाहीत अशा दोन तरी गोष्टी करीन जरी माझ्या भावना दुखावल्या गेलेल्या असल्या तरी तसे दाखविणार नाही. निदान आज तरी तसे दर्शविणार नाही.
.
फक्त आजचा दिवस मी दुस-याचे ऐकेन. जास्तीत जास्त व्यवस्थीत दिसण्याचा,नीटनेटके कपडे करण्याचा,नम्रतेने वागण्याचा, किंचितही टीका न करण्याचा, दुसर्याच्या चुका न शोधण्याचा व माझ्याशिवाय अन्य कोणालाही न सुधारण्याचा प्रयत्न करीन.
.
फक्त आजच्या दिवसासाठी मी एक दिनक्रम आखेन. तंतोतंत पाळला गेला नाही तरीही मी दिनक्रम आखेन.दोन घातक गोष्टींपासून माझा बचाव करीन.—- घाईगडबड व अनिर्णायाकता.
.
फक्त आजचा दिवस मी फक्त माझ्यासाठी शांतपणे अर्धा तास घालवीन व विश्रांती घेईन. काही वेळेस ह्या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करीन.
.
फक्त आजचा दिवस मी निर्भयपने वागेन, जे चांगले आहे, सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही. ज्याप्रमाणे मी जगाला देईन त्याच प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवीन.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “‘फक्त आजच्या दिवसासाठी’ स्वतःला ही स्वयंसूचना देऊन पाहूया!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!