Skip to content

आजपासून अंतर्मनाला तेच सांगा, जे वास्तवात तुम्हांला हवंय!!

आजपासून अंतर्मनाला तेच सांगा, जे वास्तवात तुम्हांला हवंय!!


मयूर जोशी


लहानपणी आजी घरात नेहमी सांगायची ही नकारार्थी बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही कारण वास्तुपुरुष कोणत्याही गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे घरात नेहमी चांगले व सकारात्मक बोलावे.

चार वर्षांपूर्वी सहजच काही पुस्तके वाचायला घेतली. लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फ्याड लय वाढत असलेले बघून अंतर्मनावर भरपूर काम केलेला डॉक्टर जोसेफ मर्फी याची बरेच ची पुस्तके वाचून काढली. पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक. प्रत्येक माणसाने खरोखर एकदा वाचावे कारण त्याचा नक्कीच फायदा प्रत्येकाला होईल.
त्या म्हणण्याप्रमाणे दोन मने आपल्याला असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन..

बहिर्मन म्हणजे मेंदू व त्याचा कार्यभाग डिसिजन घेण्याची क्षमता वगैरे वगैरे. परंतु अंतर्मन म्हणजेच सब कॉन्शियस माइंड हे फारसे कधी प्रकाशात किंवा कार्यरत दिसत नाही.

बहिर मनाला चांगले आणि वाईट कळते परंतु अंतर्मनाला ते कळत नाही. तर अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शस माइंड कसे काम करते ते आपण बघू.

एखादी सूचना अंतर्मनाला दिली असतात आपण झोपे मध्ये असताना किंवा सुप्त अवस्थेमध्ये असताना आपले अंतर्मन ब्रह्मांड धुंडाळत आपल्याला हवी ती गोष्ट आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असते. हिप्नोटाइज करून रुग्णांवर किंवा लोकांवर उपचार केले जातात त्या वेळेला या अंतर्मनाला सूचना दिलेल्या असतात.

अंतर्मनाला हो किंवा नाही या गोष्टी कधीच कळत नाहीत. एक उदाहरण म्हणून पुढील गोष्ट करा. लगेच तुमच्या लक्षात येईल अंतर्मन कसे काम करते. पुढील गोष्ट खरोखर लगेच करून बघा मजा येईल.

डोळे मिटा आणि स्वतःच्या मनाला सूचना द्या की, ” गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजीन करू नको.” ” गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजीन करू नको.”

कितीही प्रयत्न केलात आणि स्वतःच्या मनाला गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजिन करायचा नाही असे सांगून देखील तुमचे मन तुमच्या बंद डोळ्यांसमोर गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजीन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

म्हणजेच इमॅजिन कर किंवा इमॅजिन करू नकोस अशी सुचना अंतर्मनाला दिलेली कधीही कळत नाही. त्याला हो किंवा नाही असे कळतच नाही तर त्याला फक्त त्या सूचने मधील ऑब्जेक्ट किंवा मुख्य विषय एवढेच दिसते.

समजा एखाद्या माणसाला दारू किंवा सिगरेट सोडायची मनापासून इच्छा असेल आणि जर का त्याने तशी सूचना मनाला दिली तर ते सहज शक्य असते. परंतु इच्छा असूनही म्हणजे मनाला माहीत असून देखील तसे का घडत नाही??

वरील उदाहरणावरून लक्षात आले असेल की आपले अंतर्मन हो किंवा नाही याची भाषा समजत नाही. म्हणजे एखाद्याने अंतर्मनाला सुचना केली की मला दारू सोडायची आहे. तर त्यामुळे त्याचे दारू सुटत नाही. अंतर्मन दारू ही गोष्ट लक्षात ठेवते आणि ते तुमच्यासाठी शोधू लागते. एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर अंतर्मनाला हे सांगावे. मी अत्यंत आरोग्यदायी आणि हेल्दी लाइफस्टाइल जगत आहे.
असे सांगितल्यामुळे अंतर्मण हेल्दी आणि आरोग्यदायी लाईफस्टाईल ही गोष्ट लक्षात ठेवते. त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न आपोआप होतो.

आता यामध्ये देखील खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते म्हणजे अंतर्मनाला आपण जे काही सांगत आहोत ती गोष्ट उघडेल यावर आपला विश्वास असणे. फार महत्त्वाचे असते हे. नाहीतर तुम्ही अंतर्मनाला एखादी गोष्ट सांगाल आणि तुमच्या मनातच शंका आणि डाऊट असतील तर अंतर्मन ती गोष्ट शोधायला जाते पण प्रत्येक वेळी शंका-कुशंका मध्ये येऊन ती गोष्ट अंतर्मनाला सापडत नाही.

याचे उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही एका टॅक्सीमध्ये बसला आहे ड्रायव्हरला एका जागी जाण्याकरता सांगितले. ड्रायव्हर तुमचे ऐकून त्या दिशेने गाडी चालवायला लागेल. तुम्ही आता मध्येच त्या ड्रायव्हरला सांगितले की नाही नाही मला तिकडे जाता येणार नाही किंवा मला दुसरीकडे जायचे आहे. जर का पाच मिनिटांनी तुम्ही ड्राइव्हवर ल वेगळी सूचना दिली तर ड्रायव्हर गोंधळून जाईल. तसेच आपल्या अंतर्मनात बाबत होते.
आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे हे आपण अंतर्मनाला सांगत असतो परंतु ते होणार की नाही याबद्दल शंका कुशंका मनामध्ये ठेवल्याने त्या सूचनांचा काहीच उपयोग होत नाही.

असो तर हे सर्व सांगण्याचा उद्योग मी केला. त्याचे कारण पहिल्या ओळी मधील वास्तुपुरुष. आपल्या पूर्वजांनी ही गोष्ट किती सोप्या पद्धतीने मांडून ठेवले. कोणतीही नकारार्थी गोष्ट घरात बोलू नये कारण वास्तुपुरुष तथास्तु बोलत असतो. हा वास्तुपुरुष म्हणजे आपले अंतर्मनच नाही का?

परंतु प्रत्येक माणसाने सहजपणे ही गोष्ट अंगी बनवण्याकरता वास्तुपुरुष ही गोष्ट निर्माण केली गेली. पाश्चात्य विज्ञान हे अंतर्मनावर काम करण्याकरता या शतकामध्ये सुरू झाले. परंतु आपल्याकडे वास्तुपुरुष ही संकल्पना मात्र हजारो वर्षांपासून आहे. म्हणजेच आपल्याकडील तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांचा किती गाढ अभ्यास होता व त्यांनी सर्वसामान्य लोकांना शब्दांच्या जाळ्यात अडकवणे अपेक्षा सोप्या पद्धती कशा पद्धतीने घालून दिल्या. प्रचंड नवल वाटते मला या गोष्टीचे.

त्यामुळे या वास्तुपुरुषाला म्हणजेच स्वतःच्या अंतर्मनाला प्रत्येकाने प्रतिसाद देऊन त्याचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून आपले आयुष्य समृद्ध बनवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे या पोस्ट मध्ये जितके शक्य तितके घुसावण्याचा प्रयत्न केला.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

24 thoughts on “आजपासून अंतर्मनाला तेच सांगा, जे वास्तवात तुम्हांला हवंय!!”

  1. Khrch vachun energy milalyasarkh vatl…Karan he khr ch aahe jasa apn vichar krto nehmi tech hot

  2. सुजाता

    खूपच छान
    पटला
    वास्तविक मी THE SECRET वाचले आहे. त्यामुळे माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. कधी कधी मन डळमळीत होते पण आज हा लेख वाचून पुन्हा नवीन ऊर्जा मिळाली..
    ??

  3. Nice he book pan Reading kela ahe ani tyatil prathana pan use keli ahe thank you so much

  4. Prashant Kulkarni

    खुप सुंदर, मी सिक्रेट वाचलयं पण तुम्ही छान मांडलत…
    ??????

  5. एकदम सत्य, सीक्रेट सुद्धा या वरच पुस्तकं आहे

  6. Kharach barobar ahe…mi yacha Anubhav ala….mla.. Mahakaleshwar Che Darshan ghadale… planning nastana.

  7. सुंदर लेख आहे आजून सकारात्मक सुचना दिल्या तर माहिती होईल.

  8. प्रिया

    अतिशय सुंदर, आणि अंतर्मना बद्दल ची उत्सुकता खूपच वाढली

  9. शुभांगी कदम

    खूप छान आणि अगदी बरोबर आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!