Skip to content

“वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..”

मुसाफिर

घरच्या आर्थिक हलाखीमुळे अनेकांचं आयुष्य उध्वस्त झालेलं आजपर्यंत अनेकदा आपण बघितलं आहे. आर्थिक परिस्थितीमुळे माणूस हतबल होतो. असंच काहीसं तिच्या नशिबात आले. ती कर्नाटकातील जमंडी जवळच्या एका गावामध्ये आईवडिलांसह राहात होती. तिला अगदी अल्लड वयातच अंधश्रध्देमुळे देवदासी म्हणून सोडण्यात आले. तिला घरच्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी देवदासी म्हणून सोडले. त्यानंतर ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली.

साधारणपणे ३० वर्षांपूर्वी ओळखीमधूनच ती बुधवार पेठेतील वेश्या वस्तीमध्ये पैसे कमाविण्यासाठी दाखल झाली. याठिकाणी अन्य मुलींसोबत चेहºयाला रंगरंगोटी करायची आणि रस्त्यावर ग्राहकाची वाट पाहत उभे राहायचे हा दिनक्रम बनला होता. शरीराची भूक भागविण्यासाठी येणाºया ग्राहकांची भूक भागवून ती गावी आईवडिलांनाही पैसे पाठवायची.

तिने निवडलेला मार्ग तिला कुठे घेऊन जाणार होता हे निश्चित नव्हतं. पण तिच्या आयुष्यात काही चांगलं घडेल अशी शक्यता धूसरच होती. पण कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असतानातिच्या जीवनात एक आशेचा किरण आला आणि तिला एक सोबती मिळाला.

ती ज्या ठिकाणी उभी राहायची तेथे समोरच असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये एक तरुण मजुरी करायचा. दोघांना एकमेकांवर प्रेम झालं. त्याने लग्नाची मागणी घातली पण तिने वेश्या व्यवसाय सोडणार नाही अशी अट घातली. त्यानेही ती मान्य केली आणि त्या तरुणासोबत तिने प्रेम विवाह केला.

दोघांनीही हळूहळू पैसे साठवत वेश्यावस्तीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. पुण्याच्या दक्षिण भागात सुरुवातीला भाड्याने घर घेतले. दरम्यान, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. आपल्या मुलांना सन्मानाचे जगणे मिळायला हवे यासाठी दोघांनी त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांना शाळेत घालण्यात आले. याच काळात संगव्वाचे(बदललेले नाव) पती काम करीत असलेले दुकान दोघांनी मिळून चालविण्यास घेतले.

तिने वेश्याव्यवसाय बंद करुन पूर्णवेळ दुकानामध्ये द्यायला सुरुवात केली. धाकट्या मुलीनेहि आपली आई नेमके काय काम करते याची जाणीव ठेवत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि आज ती डॉक्टर बनली आहे. वेश्या असलेल्या तिने ‘पेशा’च्या पलिकडे जाऊन मुलीला डॉक्टर बनवलं आणि आज स्वताच्याच जीवनाला एक वेगळा सन्मान मिळवून दिला. मुलगाही सध्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत आहे.

या आई-वडिलांच्या जिद्दीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून प्रयत्न केले तर यश नक्की मिळते हे या कुटुंबाने दाखवून दिले आहे.

मातृदिनाच्या निम्मिताने या आईला सलाम.

आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

3 thoughts on ““वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..””

  1. दिनकर हिरे

    नमस्कार,
    मातृदिना च्या शुभ मुहूर्तावर आपण खरच एका मातेची व्यथा मांडली आणि जरी तिला देवदासी म्हणून समाजाने टाकून दिले होते पण तिने आणि ती एक शरीर विक्रय करणारी असून सुद्धा तिला तिच्या अटी सहित स्वीकारणारा तिचा जोडीदार दोघांना ही साष्टांग नमन…
    अशा बिकट परिस्थिती यशस्वी जीवन फुलविणे म्हणजे..खरच मातृदिनी या मातेला सलाम.
    धन्यवाद आपला लेख छान वाटला…

  2. त्या माउलीला सलाम आहे आणि यात त्या मुलाचेही मोठे योगदान आहे की तिच्याशी लग्न करून तिला साथ दिली

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!