Skip to content

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच… जी तिला कोणत्याही अडचणीत…

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच जी तिला कोणत्याही अडचणीत,सुखात ,दुखात सोबत देते. सारं जग एका बाजूला तरी ती आपल्या बाजूला थांबते..अशीच माझी सुद्धा एक खास व्यक्ती…तिच्यासाठीच हा थोडासा नवीन पण फार जुन्या आठवणींचा साचा एकत्र आणण्याचा प्रयत्न…कदाचित तुम्हालाही तुमची मैत्री आठवून देईल…
आज जरा भावूकच म्हणा झाले..,
कारणही तितकं गोड,
तिचा वाढदिवस पण मला भेटता न आल्याने काही ,
शब्द सुचले……

लहानपणी म्हणजे पहिलीतच,
पावसाची सुरुवात  आणि शाळेची एकदमच झाली..
मी त्या गावात नवीनच,
मामाच्या गावात,
चिमुकल्या पायांसोबत वाजणारे पैंजण सँडलच्या वर काढून चालणारी,

मद्येचं डबका  आला ,
तर पाहुण्यांच्या गावात म्हणून कि काय ,
आजूबाजूला पाहूनच उडी मारणारी…

तशी मी आतून खट्याळच ,
पण दिसताना सभ्यच…
हा सभ्यपणा शाळेत शिक्षकांना भावला…
पण माझा खट्याळपणा मात्र ,
एका मुलीने हेरला.
ती शांतच पण माझ्यासाठी तिने ,
नेहमीच माझ्या आवडीचा खेळ मांडला…

हळूहळू पेन्सिल पाटीवर गिरवत गिरवता,
स्पंज पाण्यात बुडवून ,चुकलेली अक्षरे पुसून परत लिहिता लिहिता..
अक्षरांचा मेळ तर जमलाच ,
आणि बालपणीच्या मैत्रीचा खरा खेळ सुरु झाला,

आता डबक्यावरून उडी मारताना,
मी आजूबाजूला पहायचीच नाही,
बिनधास्त उडी मारायची ,
आणि नंतर तिने दिलेल्या हास्यात,
ती जणू माझी क्षणभर ढालच बनायची..
“हिला कस जमत हे “,म्हणत तिच्याकडे आनंदान आणि तितक्याच अभिमानाने पाहत राहायची….

एका पोत्याच्या खोळीत ,
आमचं शेअरिंग चालायचं…
आजच्या पिझ्झा बर्गर मधील शेअरिंग पेक्षा पण ,
जास्त मजा द्यायचं….

एकदा तर गंमतच झाली…
निबंधस्पर्धेत दोघीही सहभागी..
पेन मात्र एकटी पाशी,
त्याचीही स्प्रिंग खराब होती..
मग काय ह्या मॅडमांनी,
रिपिल बाहेर काढली,,,आणि थोडं तू थोडं मी करत,
स्पर्धा दिलेल्या वेळेतच पूर्ण केली,
पण तिथेच तिच्या आणि माझ्या ,
मैत्रीची लेखणी अधिक रंगदार बनत गेली…

अशीच नंतर चालत तर कधी सायकल च्या  डबल सीट वरून जात जात शाळा संपली,
पण आजही ती जुनी सायकल पाहिल्यावर वाटत,
यार  तू का जुनी झाली,
नवीनच राहायचं ना….अगदी पहिल्यासारखी..
परत ते दिवस जगण्याच्या आशेने डोळे पाणावतात खरे,
पण अश्रूंना उलट्या हाताने पुसताना,
ओठांवर जे गोड हसू उमटलेल असत,
त्यातच आमच्या मैत्रीच  सुख दडत…

अजूनही ती तशीच आहे,
माझी ढाल बनून,
माझ्या अडचणीत पुढे धावणारी…
आणि मी हि अजून तशीच,,,,
“हिला कस जमत हे” म्हणत ,
तिच्याकडे आनंदान आणि तितक्याच अभिमानाने पाहणारी…
तिचीच भागू आणि माझीच ती गुड्डी(सुलोचना चव्हाण)

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!