
छाप
प्रत्येक व्यक्ती भिन्न असतो, असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रकृती ते काहीही असो, प्रत्येक माणूस बदलत असतो, अहो वेळेनुसार सरड्यासारखे रंग बदलत असतो असं नाही….. बदलत असतो म्हणजे इतरां पेक्षा वेगळा असतो, आणि ते वेगळेपणच त्याची छाप असते मग ती चांगली किंवा वाईटही असू शकते. त्याचा स्वभाव, त्यांची बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता, एखाद्या दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एखाद्या प्रसंगामध्ये त्याचे वर्तन या गोष्टी त्याला वेगळं बनवत असतात. आणि यावरूनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. परंतु काही वेळेस वरील बाबी न पाहता समोरच्याचा चेहरा कसा आहे, त्याची देहबोली कशी आहे, यावरून प्रथमदर्शनीच तो व्यक्ती कसा आहे किंवा कसा असेल याचा एक अंदाज बांधला जातो, यातील काही अंदाज बरोबर तर काही चुकीचे ही असू शकतात पण शरीर व चेहरा बोलतो हे मात्र 100% खरं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आत्ता यामध्ये एक मज्जा आहे ती अशी की वरील उल्लेख केलेल्या बाबी काही व्यक्तींना माहित असतात म्हणून अशा व्यक्ती योग्य ठिकाणी त्यांच्यात असलेल्या अयोग्य गुणांची ओळख न करून देता समोरच्यांना अपेक्षित असणाऱ्या त्यावेळेपूरत देखाऊ वर्तनातून त्यांना हवे असणारे गुण स्वतःमध्ये आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण मुळात त्या ठिकाणी दाखवलेले गुण स्वतःमध्ये आहेत की नाही हे त्या व्यक्तीला चांगलेच ठाऊक असते. तरी तो त्याची खोटी छाप पाडण्याचा प्रयत्न करतो,,,
अशी छाप पाडण्याचे प्रयत्न सामूहिक समारंभात, भिन्नलिंगी व्यक्तीसमोर, नवीन भेटलेल्या व्यक्तींसमोर, मुलगा किंवा मुलगी पाहण्यासाठी गेल्यानंतर, मुलाखतीमध्ये, किंवा एखाद्या विषयावरची वैचारिक चर्चा मग ती वैयक्तिक असो वा सामूहिक यामध्ये, व या व्यतिरिक्त अशा अनेक प्रसंगांमध्ये केला जातो, यामध्ये जे व्यक्ती ठाम व परिपक्व विचाराच्या असतात त्यांची छाप पाडण्याची त्यांना गरज नसते कारण इतरांबरोबर त्यांनाही त्यांच्या क्षमतांची व व्यक्तिमत्वाची जाणीव असते.
पण जी व्यक्ती अज्ञानी किंवा विचाराने परिपक्व नसतात ते नेहमी त्यांचं अज्ञान किंवा कमीपणा लपवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा व्यक्ती चर्चा करत असताना भान विसरून जातात वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतात, त्याच बरोबर असे म्हणण्याचा प्रयत्न करतात की मी त्यावेळेस तिथेच होतो,मला माहित आहे, तसं नाही ते अस आहे ,असं नाही ते तसं आहे, म्हणजे त्यांना सर्वस्व माहिती आहे हे पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतात.
या उलट हेच परिपक्व व्यक्तीबद्दल विचार केला तर तो मध्येच न बोलता सर्वांचे ऐकून घेईल चूक काय बरोबर काय या दोन्ही बाजूचा विचार करून विषयाचं वास्तव न लादता फक्त पटवुन देण्याचे प्रयत्न करेन.
थोडक्यात जो व्यक्ती अपरिपक्व आहे तो स्वतःला परिपक्व असल्याची छाप निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि याउलट परिपक्व माणसाला त्याची छाप दाखवण्याची गरज नाही ते आपोआप दिसत असतं.
उदा-
एखादा मुलगा दररोज व्यायाम करत असेल तर मी व्यायाम करतो किंवा माझी बॉडी बघा म्हणण्याची गरज नाही, तो व्यायाम करतेवेळेस जिम किंवा ग्राऊंड ला येता जाताना लोकांना दिसतो आणि नाही दिसला तरी त्याचे शरीर पाहून समजते. पण दुर्दैव अस आहे की एखादा कधीही व्यायाम न करणारा फुल कॉन्फिडन्स मध्ये म्हणाला की मी व्यायाम करतो तर फक्त त्याच्या आत्मविश्वासाने बोललेल्या शब्दावरून त्याचं खरं मानणाऱ्यांची संख्या ही काही कमी नाही.
अशा ठिकाणी समोरचा खरी छाप पाडतो आहे की खोटी पाडतो आहे हे ओळखणे सुद्धा परिपक्व माणसाचे लक्षण आहे.
अपरिपक्व लोकांना जर सर्वांगीण विकास घडवून इतरांच्या मनात व त्यांच्या जीवनात चांगलीच छाप निर्माण करायची असेल तर त्यांनी त्यांचे अज्ञान स्वतः तरी मान्य करावं आणि त्यावर ज्ञान मिळवून, माहिती मिळवून, वाचन करून, मेडिटेशन करून परिस्थितीचा व इतरांचा अभ्यास करून परिपक्व व्हायला काही हरकत नाही.
क्योंकि इंसान दूसरों की नजरों में गिर गया तो बड़ी बात नहीं बल्कि खुद की नजरों में गिर गया तो बहुत बड़ी बात है.
म्हणून सतत स्वतःला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडाकडे जाण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
आणि खोटी छाप पाडण्यापेक्षा खरी छाप निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




Very nice