
मन सुन्न आहे..खिन्न आहे..अति प्रामाणिक असल्यानं आतल्या आत धुसमसतयं..
मनात लागलेली ही आग..ही चिड बाहेर पडणं अतिशय आवश्यक आहे..नाहीतर मनोभावना नष्ट होऊन प्रचंड यातना होतील त्याही याच मनाला. सर्व बाहेर येण्यासाठी व्यक्त होणं हाच राजमार्ग आहे..पण त्यासाठीही कुणाची तरी गरज आहे..? कुणाजवळही व्यक्त होऊन कसं जमेल..? मनाच्या अत्यंत समिप..निकट असलेलं एक तेवढचं समंजस आणि जबाबदार मन पाठीशी हवयं.
ज्याला ख-या अर्थानं या खिन्न मनाच प्राक्तन समजेल..आंतल्या आगीची कल्पना येईल. या अत्यंत तिव्र झालेल्या भावनांची जाणीव होईल. म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून मनाशी पूर्णपणे एकरुप..एकजिव झालेलं..1+1=2 न होता 1+1=1 असं मन हवंय.
सद्यस्थितीत केवळ अशी शक्यताही दुरापास्त आहे. मनं चंचल झाली आहेत. सैरभैर झाली आहेत. टोकाचे प्रयत्नही अपूर्ण पडतायत त्यांना एकाग्र व्हायला. संकुचितपणा वाढलाय. स्वार्थानं चांगलच बस्तानं बसवलंय मनामनांत. उपयोगी आहे तोवर ठिक आहे. निरुपयोगाला अजिबात स्थान नाही. थोडीशीही चालढकल सहन होत नाही कुणाला. अपेक्षांच ओझं वाढल्यानं मतलबीपणानं सर्वदूर उच्छाद मांडलाय.
संकोच..संशय या प्रवृत्तींनी फेर धरलाय मनांपुढे. मनाची एवढी बिकट दुरावस्था होण्यास मनही तेवढचं जबाबदार आहे.” स्व ” च्या पलिकडं त्याला दिसतच नाही कांही. कौतुकाचा निर्लज्ज असाध्य रोग जडलाय त्याला. स्तुतीच्या सतत सान्निध्यात राहण्याची वाईट सवय लागलीय. प्रसिध्दीच्या हव्यासापायी त्याचा निरागसपणा केव्हांच लयाला गेलायं. प्रेम, ममत्व,दया,करुणा,समाधान नांवापुरते उरलेत. आभासी जगातल्या वारेमाप साधनांनी जिवनाचा बट्ट्याबोळ केला आहे. संवादच नसल्यानं मनं एकाकी झालीत. विसंवादही चालला असता, परंतु मुकसंवाद सर्वत्र उफाळून आला आहे.
बोलकी माणसंच शांत झाल्यानं शांततेची स्मशान शांतता झालीय. भरपुर वेळ असूनही No time zone च प्रस्थ वाढलयं. कुटुंबाच वास्तव खूप विदारक आहे. आधीच कुटुंब लहान झाल्यानं कुटुंबाच्या व्याख्येलाच सुरुंग लागलाय. त्यामुळे चौकोनी कुटुंबातील चौघांची चार तोंड चार दिशेला असं सर्रास घडतयं. संवादा अभावी संपूर्ण पिढीचं विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. अनुभवाचं रोजच चरित्रहनन हा एक नवा Trend झाला आहे. त्यामुळे नात्यांतील आदरच नष्ट झाला आहे.
Generation gap हा एक नविनच रोग निर्माण झाला आहे. या सर्वांमुळे मानसिकता वाढीस लागून नैराश्य,अस्वस्थता,एकाकीपणात कमालीची वाढ झाली आहे. सर्वात जास्त गर्दी मानसोपचार केंद्रात होत आहे. मनातल्या भावनाचं कोरड्या,शुष्क झाल्यानं त्यासाठी महागड्या उपचार पध्दती निर्माण झाल्या आहेत. त्याच्या आहारी जाऊन मनं आणखी कमकुवत झालीयेत. मनाची अक्षरशः दैना होऊन मनं तार तार झाली आहेत.
त्यासाठीच सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणं व्यक्त व्हा..मन मोकळं करा. कोंडमारा करुन घेऊ नका. जगा आणि जगू द्या.
Online Counseling साठी !
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी


अतिशय सुरेख लेख आजकाल लोक स्वप्नात जगतात वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली
Superb….truely correct…
अतिसुंदर हुबेहुब सध्याची परिस्थिती मांडलीय
खूपच छान आहे…! काही वैयक्तिक समस्या असल्यास मार्गदर्शन मिळेल का? कसे??
खुपच छान