Skip to content

तुम्ही कधी कुणाला प्रेमाने मिठी मारलीये का??

प्रेमळ मिठी : प्यार कि झप्पी


विक्रम इंगळे
9545974916

11 जानेवारी 2020


तुम्ही कधी कुणाला प्रेमाने मिठी मारली! आपल्या मुलाला, मुलीला, छोट्या मोठ्या बहिणीला, आईला, बापाला, प्रियकर, प्रेयसी अगदी कुणालाही प्रेमाने मिठी मारून बघा. एक वेगळीच संवेदना ह्या प्रेमळ मिठीत असते.

आईला मिठी मारली तर लहानपणी सारखीच त्या मायेची ऊब मिळेल, मग भले तुम्ही पन्नास वर्षाचे असाल. बापाला मारलेल्या मिठीत तीच आश्वासकता मिळेल. तोच धीर मिळेल अणि तोच खंबीरपणा असेल.

मला नेहमी असं वाटतं की ह्या प्यार कि झप्पीत काहीतरी जादू आहे. ते हिंदीत म्हणतात ना, दिल को छू जाती है, असं काहीसं होतं. कामावरून परत आल्यानंतर लहानांनी पायाला मारलेल्या बाल मिठीतून अख्खा थकवा दूर होतो. आपल्याला घरी परत आल्यावर हे किती छान वेलकम आहे ना!

अरेss यारss म्हणून मित्राने/मैत्रिणीने दिलेली प्यार कि झप्पी आठवा. पहिल्यांदा त्यांच्या घरी गेल्यावर ह्या एका झप्पीने त्याच परकं घर, आपलं होवून जातं. आपण त्या घरातलेच सदस्य होऊन जातो.

झप्पी हे आनंद व्यक्त करायचं अणि सुख शेअर करायचं पण माध्यम आहे. मनासारखे परीक्षेचे निकाल, क्रिकेट ची जिंकलेली मॅच, यारss मैने कर दिखिया असं करून मारलेली झप्पी आठवा. ह्या माध्यमातून अशा आनंद, सुख ह्या भावना काही न बोलता सुद्धा सांगता येतात.
दुःखाच्या प्रसंगी हीच झप्पी, काळजी करू नकोस, आम्ही पण तुझ्या बरोबर आहोत, हे सांगून जाते. माझ्या मते एका झप्पीतून जेवढं सांत्वन होतं तेवढं शब्दातून नाही व्यक्त करता येत.

आपल्याला जे आपले असतात, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, जे आपल्याला क्लोज असतात, अशांसाठी सर्व भावना व्यक्त करायला झप्पी असते. बघा ना! एका प्रेमळ मिठीतून केवढी काळजी बोलून जाते अणि केवढा दिलासा मिळतो.

आज्जी आजोबांना प्रत्यक्ष झप्पी नसली तरी आज्जीsss किंवा आजोबाsss म्हणून त्यांच्या गळ्यात पडण्यासारख सुख ह्या भूतलावर नाही. केवढं प्रेम, केवढी माया, केवढं आपलेपण असतं त्या मिठीत.
अहो झप्पी नाही पण खेडेगावात गेल्यावर कुठल्यातरी लांबच्या आज्जीने किंवा आज्जीच्या मैत्रिणीने आपल्या गालावरून हात फिरवून तिच्या कानशीलावरून बोटे मोडली तरी केवढी माया असते त्यात. ही झप्पी ची किंवा स्पर्शाची जादू काहीतरी वेगळीच असते.

मजा वाटते ना! एक झप्पी किती आनंद देवून जाते. किती भावना व्यक्त करते. आपल्याला काय वाटते, आपले नक्की फिलिंग आणि व्हायब्रेशन, एक झप्पी सांगून जाते. एक प्रेमळ मिठी जेवढं बोलते ते कुठल्याही शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. कुठल्याही वेळी, कुठल्याही प्रसंगी झप्पीतून दिलेल्या भावना आपल्या पर्यंत पोहोचतात.

शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलंय की वीस सेकंड पेक्षा जास्त काळ जर झप्पी असेल तर शरीरात आॅक्सिटॉसीन नावाच एक केमिकल तयार होतं जे तुम्हाला आनंदी ठेवत, स्ट्रेस कमी करत, तुमचा रक्त दाब (बिपी) व्यवस्थित ठेवतं. आता कळलं का, मुन्नाभाईच्या प्यार कि झप्पी मधे काय जादू होती ते!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजचे अपडेट मिळवण्यासाठी!

Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!