Skip to content

साधने नाहीत म्हणून कधीही रडत बसू नका!!

साधने नाहीत म्हणून कधीही रडत बसू नका!!


प्रत्येक व्यवहारात विजयी भाव ठेवण्याचा अर्थ आपण जे काही करत आहोत ते सर्वोत्तम पद्धतीने होत आहे ही भावना ठेवणे हा त्याचा अर्थ होतो.

बुद्धिबळाच्या खेळामध्ये एक म्हण नेहमी वापरली जाते की या खेळातील यशासाठी हे आवश्यक नसते की त्यासाठी चांगली तयारी नेहमीच आपल्याकडे असली पाहिजे. उलट आपल्याकडे जी तयारी आहे त्यांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता मात्र जरूर असली पाहिजे.

हेच सूत्र आपल्या जीवणासाठीही लागू आहे. आपण कठीणात कठीण संकटांमधून मार्ग काढू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या बाहुबळावर विश्वास ठेवणे व त्याचा योग्य वापर करणे जमले पाहिजे. आपल्या प्राचीन शास्त्रग्रंथांमध्ये गुत्समद नामक एका ऋषींचा उल्लेख आढळतो. ते एक अष्टपैलू प्रतिभावंत, कवी, गणित तज्ञ, शास्त्रज्ञ, कृषक व विणकर होते. त्यांनी एक फारच उत्तम सूत्र लिहिले आहे.

प्रयिपाये जिगीवांस : स्याम !

अर्थात प्रत्येक व्यवहारात विजयाची भावना ठेवा. असे करू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने चक्रवर्ती ठरू. परंतु प्रत्येक व्यवहारात विजयी भाव ठेवण्याचा अर्थ आपण जे काही करीत आहोत ते सर्वोत्तम पद्धतीने होत आहे ही भावना ठेवणे हा त्याचा अर्थ होतो. भलेही आपल्याकडे उपलब्ध असणारी साधने ही मर्यादित असली तरी काही हरकत नाही. फक्त आपण आपले काम पूर्ण समर्पित वृत्तीने व पूर्ण मनोबलाने करीत रहायला हवं.

साधने नाहीत हे रडगाणे तेच गातात जे साधनांप्रती निष्काळजी राहतात. त्यांना जर एखादी गोष्ट तोडायची असेल तर ते म्हणतात.. काय करू माझ्याकडे हातोडाच नाही. परंतु जवळच पडलेला दगड काही त्यांना दिसत नसतो.

ते तोंडाने म्हणतात की काहीतरी करायला हवं. परंतु काय करू माझ्याकडे तर हे गवत व काड्याच तेवढे आहेत. त्यातून काय कपाळ बनणार? परंतु ईवलीशी चिमणी मात्र त्याच गवत व काड्यांचा वापर करून सुंदर घरटे निर्माण करते.

चार्ली चापलीनचे बालपण हे अठराविश्वे दारिद्र्यात गेले. त्यांची सख्खी आई वेड्यांच्या इस्पितळात भरती होती व सावत्र आई ही त्याचा प्रचंड छळ करीत होती. परंतु चार्लीने या संकटांना हत्यार बनविले व जगाला हे दाखवून दिले की अशा भीषण परिस्थितीतही खुश राहता येऊ शकते. चार्ली नेहमीच हाती असलेल्या अल्प साधनांच्या बळावरच उत्तम भविष्याची स्वप्ने बघत राहिला व ती स्वप्ने त्याने पूर्णही करून दाखवली.

नेमक्या अशाच रितीने आपल्याकडे असणारी उपलब्धता ओळखून त्यातनं काहीतरी सुंदर, प्रभावशाली बनवण्याचा प्रवास सुरु करणे आणि तो प्रवास खरंच सर्वोत्तम कसा आहे, असं स्वतःला सारखं भासवत राहणे….

हाच या लेखाचा मुख्य हेतू!

लेख कसा वाटला खाली Comment करून जरूर कळवा!


संकलन – आपलं मानसशास्त्र



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

8 thoughts on “साधने नाहीत म्हणून कधीही रडत बसू नका!!”

  1. jaychandra mahadu ghaywat

    उत्तम लेख,विव्वळ सेक्स हा शरीराचा नसून मनाचा असतो मनाने झालेला असावा.किंवा तशी माणसिकता करावी, परंतू बळजबरी नको

  2. अप्रतिम…आणि प्रेरणादायी लेख,??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!