
आजपासून पुन्हा एकदा एका नवीन वर्षाला सुरुवात झाली!!
(वाडा, पालघर)
आज पासून पुन्हा एकदा एका नवीन वर्षाला सुरुवात झाली. नवीन वर्ष अर्थात नवीन कॅलेंडर. नवीन असतो तो फक्त कॅलेंडर …2019 चे आता 2020 झाले. पुढे 2021, 2022…
बस इतकच बदलत जाणार. खरं तर हे नवीन वर्ष जसे बदलते तसं आपल्या आयुष्यातला एक वर्ष सहज निघून गेलेला असतो. सरत्या वर्षाला टाटा बाय-बाय करणारी आपण माणसं खूप जोरात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करून नवीन वर्षाची सुरुवात करतो. पण खरंच का अशी सुरुवात आपल्याला आनंद देते. रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचं पार्टी करायची यातून जो आनंद मिळतो तो क्षणिक असतो. पण जर खरा आनंद मिळवायचा असेल तर मला तरी वाटते तो आपण स्वतःमध्ये बदल करून मिळेल.
कारण जसं हे वर्ष आपल्याला नवीन मिळते तसंच येणारा प्रत्येक महिना प्रत्येक दिवस प्रत्येक तास आणि हा प्रत्येक क्षण नवीनच खरतर असतो.
शाळेत असताना लहान मुलं या नवीन वर्षाला वेगवेगळे संकल्प करतात. जसं मी सकाळी लवकर उठणार, जबाबदारीने वागणार, शाळा, अभ्यास, खेळ याबद्दल व्यवस्थित समतोल राखणार, अगदी तसंच आपण ठरवूयात की येणाऱ्या नवीन वर्षात आपण नव्याने जगुयात..
अर्थात वाद नेहमी चालूच असतात. आई मुलाचं सासू-सुनेचं तसेच जॉब करताना बॉस आणि एम्पलॉइज च तर या कोणत्याच वादात न अडकता याच्या पलीकडे सुद्धा वेगळे जग आहे असा विचार करून नव्याने जगुयात…
अमावस्येला झाडाखाली जाऊ नये ग्रहणाच्या वेळेत काहीच खाऊ नये अशा आणि यासारख्या अनेक अंधश्रद्धांना बळी न पडता नवीन विचार पुढे चालवूया…
मोबाईल हा महत्वाच्या कामांसाठी, कॉन्टॅक्ट साठी, माहिती मिळवण्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. पण मोबाईल आपलं सर्वस्व नाही तर आजपासून मोबाईल बाहेरच्या दुनियेत फिरूयात मित्र-मैत्रिणी, घरातली माणसं, नातेवाईक तसेच आपल्या जवळच्या माणसांना आपला वेळ देऊयात…
आजपासून ठरवूयात रोज काहीतरी नवीन वागायचं रोज काहीतरी नवीन करायचं ज्यामधून आपल्याला आनंद मिळेल उत्साह मिळेल…
तेव्हाच तर नक्की म्हणता येईल
Happy New year..Month… Day and moment
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

