स्वतःच्या ‘अफेअर’ बद्दल मुलीने आईला विचारलेला एक प्रश्न!
रिलेशनशिप
“… मम्मी, तू आणि बाबाने इंपॉसिबल अडचणी असताना त्या काळात marriage केलंत…
गेली छत्तीस वर्षं संसार सक्सेसफुल केलात…
आमच्या पिढीला का गं जमत नाहीये हे?
” तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली.
चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता.
“प्रश्न विचारलायस,”
पंचावन्नची आईने त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली;
” उत्तर हवंय, का ‘हो न गं, खरंच की न गं’ म्हणून प्रश्नाला गोंजारायला हवंय?”
“उत्तर हवंय”, लेक म्हणाली.
आई दुसऱ्या अॉप्शनला भीक घालत नाही हे तिला माहीत होतं.
“असे आहे न बाळा,” आई सहजच म्हणाली;
“आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो; तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय.
“आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं; तुमच्या काळात ते केलं जातं.
“आम्ही साथीदार व्हायचो; तुम्ही पार्टनर बनवता.
“आमच्यात प्रेम ही सहजता होती; तुमच्यात तो अट्टहास झालाय.
“आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं; तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं.
“आमच्या वेळी मैत्री विश्वासात रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.
“आम्ही कविता लिहायचो; तुम्ही त्या फॉरवर्ड करताय.
“आमचे जीवनसाथी होते; तुमचे बॉयफ्रेन्ड नि गर्लफ्रेन्ड आहेत.
“आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे’, म्हणून केलं जातंय.
“आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, असंय.
“आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची कैलक्युलेशन्स असतात.
“आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात.
“आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय.
“आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.
“आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय.”
…”बाळा; जमणं – न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेवलप करायची असते. आम्ही दोन सक्षम जीवांच्या सक्षमतेचा परिणाम म्हणून प्रेमात पडलो…
लेक स्तब्ध…
थोडं कळल्याच्या थोडं न कळल्याच्या भूमिकेत…
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी!
? ?
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
Very nice Line
ज्यांची मुले तरुण आहे त्या पालकांसाठी खूप छान लेख.जमले तर मुलांना जवळ घेऊन मुक्त बोलू द्या आणि समजावून सांगितले पाहिजे काय चांगले नि काय वाईट…
आईने तीच्या लेकीच्या प्रश्नाची समर्पकपणे उत्तर दिले….
काळाच अंतर असले तरी ते आजच्या पिढीने शिकणं खूप आवश्यक आहे..आज जर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही आणि मुलांनी आपल्या वर्तनात बदल घडवून आणले नाही तर पुढे होणारा धोका खूप मोठा व असहनीय असणार आहे…
खूपच सुंदर लेख
वरीलपैकी काही प्रतिक्रिया वाचल्या
दुसर्याच्या लिखाणात उणिवा काढणं फार सोपी गोष्ट
प्रतिक्रिया सोबतच नातं टिकवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी काही लिहावं.
वैचारिक मतभिन्नतेतुन काही निष्पन्न झालं तर अतिउत्तम .
आईने दिलेल्या उत्तराची सुरुवात फक्त अर्थपूर्ण आहे..
“आम्ही जुळवून कसं घेता येईल अशा उद्दिष्टानेच एकत्र असायचो त्यामुळे हे नातं “टिकून” राहिलं.”
बाकी डेकोरेटिव्ह स्वरूपाची, जुन्या नव्याची अवास्तव तुलना आहे.
नात खूप काळ ‘अस्तित्वात’ आहे म्हणजे त्या नात्यातील दोघांच्याही माणुसपणाच्या आवश्यक आयमांना न्याय मिळाला व नात्यातील परस्पर उस्फुर्त ओढ टिकली अस नाही.
नात ‘अस्तित्वात’ असणं व स्वतःच्या जगण्याशी असलेलं स्वतःचं उस्फुर्त नातं जिवंत व विकसनशील असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मी दुसऱ्या बाबीला जास्त महत्वाचं मानतो.
नाती या दुसऱ्या बाबीशिवाय नुसती ‘टिकवून टिकवून अस्तित्वात’ ठेवण्याचा प्रयत्न ही मजबुरी एखादी अपरिहार्यता असते.
सामाजिक बाबी व निव्वळ कौटुंबिक जबाबदारी म्हणून हा ‘टिकविण्याचा’ अट्टाहास खरंतर अर्थहीन असतो.
“आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे ..” अशी मनस्थिती यावी ही नात्यांची फलश्रुती नसावी.
वरील वाक्य मी ‘दोघांच्या परस्पर नात्याला ‘ तसेच ‘आपल्या स्वतःशीच असलेल्या’ नात्याला उद्देशून म्हणतो आहे !!!
Pingback: films year 2020
Uttam
ग्रेट?
Chan
खूपच सुंदर लेख , अंत्यत योग्य शब्दात सुरेख मांडणी
छान, पण मला वाटतं परिस्थिती माणसाला घडवते.फरक आहे दोन पिढ्यांमधील वातावरणाचा.त्यावेळची संस्कृती आणि आताची स्वतंत्र जीवनशैली, आताच व्यस्त जीवन, मोबाईल इंटरनेटवर सर्व प्रकारच्या विषयांचं मुक्त उधळण, कमी शारीरिक श्रमामुळे गाजलेली शरीरे,असतील मानसिकता, करीयरच्या नावाखाली लग्नासाठी वाढलेली वयोमर्यादा, सर्वात मोठं कारण स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला अनियंत्रित स्वैराचार ही सर्व कारणे मला वाटतं आजच्या पिढीच्या कौटुंबिक विध्वंसाला कारणीभूत आहे.?
So Fantastic And Thinkable
खूपच समर्पक उत्तर