वर्ष २०१९ तुझे आभार ???
सरत्या वर्षा तुझे खुप खुप आभार, हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
केलीस तू ओळख माझी या जगाशी,
जे फार वेगळे होते माझ्या मनाशी,
बनवलेस समंजस तू मला कधी घेवुनी माझा निरागसपणा,
वाढवलेस मनोबल तू माझे कधी देवुनी एकटेपणा,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
दाविलीस माणसे काही आतल्या गाठीची मारुनी मिठी पाठीत खंजीर खुपसणारी,
दिलीस खुप सारी प्रेमाची माझ्यासंगे माझ्यासाठी उभी राहणारी,
त्यांमुळेच मिळते मला सकारात्मकता, आत्मविश्वास आणी उभारी,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
सुख-दुख , मान-अपमान, खरे-खोटे, यां ही पेक्षाअसते समाधान मोलाचे,
बिंबवलेस मनी तू माझ्या धडे हे संयमाचे,
गिरवलेस तू माझ्या जिवनामध्ये कित्ते हे प्रेमाचे,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
तूच शिकविलेस जनी निंदय ते सोडुनी द्यावे,
शिकविलेस तूच जनी वंद्य ते भावे करावे,
तू केलेस ज्ञात नवे रामायण ज्यात अग्नीपरीक्षा नसते आता कायम,
तूच दाविलेस ना रे महाभारत आजचे,
ज्यात कौरव-पांडव खुद्द गोविंद सुद्धा आता नाही ओळखायचे,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
तू दिलास सुंदर निसर्गराजा, अपमान ज्याचा झाल्यावर दाखवलास तू कोपणारा वरुणराजा,
जरी आम्ही माणसे असु अती हुशार,
तरी निसर्गापुढे सगळेच बेकार,
शिकविलेस तू सृष्टीचा राखाया मान,
पकडुनी आमचे दोन्ही कान,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
तू दाविलेस अजिब राजकारणी ही ते सत्तेसाठी जनांची पर्वा न करणारे नेते ही,
तू दाविलीस हवस आणी क्रुरता यांनी माजलेली राक्षसे ही,
तू शिकविलेस इथे स्वतः साठी स्वतः लाच आहे उभे रहायचे आता,
तू केलेस निजलेल्यांना जागे आता,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
इतके सारे देवुनही नाही दिलास मला निष्ठूरपणा,
इतके सारे घेउनही नाही घेतलास माझा चांगुलपणा,
करूनी हिशेब अंती देण्या-घेण्याचा बाकी ठेवलास मला कणखरपणा,
हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
आता बांधुनी शिदोरी कणखरपणा आणी संयमाची,
घेउनी पालखी चांगुलपणा आणी प्रेमाची,
धरते वाट मी नववर्षा ची,
त्या आधी हे सरत्या वर्षा तुझे खुप खुप आभार, हे ऋण नाही फिटू शकणार तू दिलेस अपार ….
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!
Apratim khup chan
खूपच छान
खुपच छान