Skip to content

शारीरिक आणि मानसिकरीत्या एकमेकांना कसे समजून घ्याल?

रिलेशनमध्ये किंवा लग्नामध्ये होणाऱ्या सर्वसामान्य अडचणी


मयूर जोशी


एकमेकावर प्रेम करणारे लोक काही वर्षातच त्रासलेले असतात. त्रासलेले दिसतात. लोक एकमेकावर प्रेम करतात परंतु त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टीबाबत कधी विचार करत नाही. त्याचा कधीही अभ्यास देखील करत नाहीत.

माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला मी चांगलाच ओळखतो अगदी पाच वर्षापासून वगैरे असे वाटत असते लोकांना. परंतु पूर्णपणे चुकीची समजूत आहे ती.

मुळातच स्त्रिया आणि पुरुष हे पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या. सुरुवातीला प्रेमाच्या काळात भावनेने एकमेका साठी काय करू आणि काय नाही असे भेटलेले प्रेमवीर काही काळाने विझून जातात. कारण एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात.

आपल्यापैकी बरेच लोक सुशिक्षित आहे. त्यापैकी किती जणांनी लग्नाच्या आधी पुरुष किंवा स्त्री त्याचे शरीर आणि त्याचे मन याबद्दल थोडा तरी अभ्यास केलेला असतो? अर्थात खोल अभ्यास करण्याची गरज नसते परंतु वरवर. सेक्स गोष्ट सगळ्यांनाच आवडतं पण त्याचा थोडातरी अभ्यास केला जातो का? मानसिक मागणी काय असते याचा विचार आणि अभ्यास केलेला असतो का?

अर्थात मी येथे मानसिक गोष्टींबद्दल लिहायचा प्रयत्न करेल कारण त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शारीरिक गोष्टी काही काळासाठी असतील परंतु माणूस जास्त दुखावला जातो व मानसिक कारणामुळे.

मुळातच स्त्री आणि पुरूष हे वेगवेगळ्या टोप्या घालून आलेले असतात. मुख्यतः वाद अत्यंत छोट्या गोष्टींनी चालू होतात. बायको किंवा गर्लफ्रेंड काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ही तक्रार नेहमी असते, मी माझा नवरा किंवा बॉयफ्रेंड ऐकूनच घेत नाही. दिवसभरामध्ये काय झाले आहे त्याबद्दल तो माझ्याशी काहीच बोलत नाही. आणि पुरुषांची तक्रार ही असते की माझी बायको किंवा गर्लफ्रेंड मी सांगितलेले उपाय कधी ऐकत नाही.

मुळातच पुरुष हा नेहमी सोलुशन ओरिएंटेड असतो. म्हणजे कोणतीही गोष्ट पुरुषाला सांगितले असता त्याचा मेंदू त्यावरील उपाय शोधायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याच्या मनातील काही प्रश्न किंवा गोष्टी सांगण्यासारख्या असतील तर त्या कधी तो कोणाशिही बोलून मोकळा होणार नाही. तो स्वतः सोल्युशन ओरिएंटेड असल्यामुळे त्याला समोरील व्यक्ती देखील आपण जो विषय बोलणार आहोत त्या विषयांमधील माहितगार किंवा अनुभवी असणे गरजेचे असते.

त्यामुळेच पुरुष घरी येऊन ऑफिसमध्ये आहे प्रसंग किंवा प्रॉब्लेम फारसे सांगत असलेले दिसून येणार नाही. जर त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंड त्याच क्षेत्रामध्ये काम करणारे असेल तर मात्र थोडे चित्र वेगळे असू शकते. परंतु पुरुषाला समाधान तेव्हाच मिळते ज्यावेळेला तो आपल्या गोष्टी माहितगार आणि तज्ञ किंवा ज्या व्यक्तीकडून आपल्याला उत्तर अपेक्षित असेल अशा माणसांबरोबरच शेअर करेल.

आता याविरुद्ध स्वभाव बायकांचा असतो. बायकांना उत्तराची किंवा सोल्युशन ची अजिबात आवश्यकता नसते. त्यांना फक्त आपले म्हणणे कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावे इतकीच अपेक्षा असते. त्यापलीकडे त्या व्यक्तीकडे उत्तर असेल किंवा नाही याबद्दल त्यांना फारसे काही वाटत नाही. कोणतेतरी व्यक्ती आपण बोललेले शांतपणे ऐकून घेत आहे यात त्यांना समाधान मिळते.

आता गंमत अशी होते की सुरुवातीला जेव्हा आपण प्रेम आणि भावना यांचा बहर असतो, त्यावेळेला विचारांची देवाण-घेवाण चालू असल्यामुळे दोघांमध्ये प्रचंड संवाद असतो. एकदा एकमेकांचे विचार आणि म्हणे समजून आली की आपोआप पुरुष फारसे बोलण्याच्या तंत्रात पडत नाही जोपर्यंत गरज आहे.

आपण एखाद्या घरात भांडणाची सुरुवात किंवा वादाची सुरुवात किती शुल्लक गोष्टीमुळे होते ते लक्षात घेऊ.

नवरा ऑफिस मधून येतो. बायको कदाचित हाऊस वाइफ असेल किंवा बाहेर ऑफिस मध्ये काम करणारी असे कसेही. दिवसभरामध्ये घडलेल्या गोष्टी सांगण्यात तिला प्रचंड इंटरेस्ट असतो. “सुरुवातीच्या काळात तरी.” ऑफिसमधील सांगितलेल्या किंवा घरांमधील सांगितलेल्या गोष्टी ऐकताना नवऱ्याचे डोके सोल्युशन देणाऱ्या माणसांची टोपी घालून बसलेली असते. तिचे पूर्ण म्हणणे ऐकण्याची आधीच हा त्यावर उपाय सुचवायला लागतो. मग असे वारंवार घडल्याने तिची होते चिडचिड. कारण तिला उपायांची आवश्यकता नसते. ते करण्यासाठी ती समर्थ आहे. परंतु कोणीतरी आपले म्हणणे ऐकावे असे तिला वाटते. परंतु आपला नवरा आपले म्हणणे ऐकण्याच्या ऐवजी उगाचच मला उपाय सुचवत बसला आहे आणि सोल्युशन देत बसलेला आहे हे तिला आवडत नाही. आणि हा मुद्दा जवळपास सर्व घरांमध्ये वादासाठी एक ठिणगी म्हणून पुरतो. नवऱ्याला आहे समजत नाही आपण तिला सोलुशन देत आहोत तरी देखील ती वैतागली का आहे? आणि आपले म्हणणे शांतपणे आपला नवरा ऐकून का घेऊ शकत नाही? फक्त माझे म्हणणे ऐकून घे इतके साधे मागणे तो का ओळखू शकत नाही त्यामुळे तिची चिडचिड झालेली असते. त्यानंतर ती सांगणे सोडून देते. मग नवरा देखील आताही आपल्याशी बोलत का नाही या गोष्टीमुळे विचार करायला लागतो. मग परत भांड्याला भांडे लागते.

वरील दोन मानसिकता जळगा प्रत्येकाने लक्षात घेतल्या म्हणजेच ज्यांना लग्न कार्य करून किंवा रिलेशन मध्ये राहून वाद टाळायचे आहेत त्यांनी. तर बऱ्यापैकी वाद आपोआप कमी होतील.

1. आपल्याला आपली बायको किंवा प्रेयसी जे काही सांगत आहे ते शांतपणे व पूर्णपणे ऐकून घेणे.
2. त्यामध्ये आपल्या मनात कितीही सोल्युशन्स आणि उत्तरे आली तरीदेखील ती न सांगणे.
3. आपला नवरा किंवा प्रियकर आपल्याशी ऑफिसमधील किंवा बाहेरील कोणत्याच गोष्टींबद्दल बोलत नाही याच्या मागचे कारण समजावून घेणे. ते हे की पुरुषाला उत्तर देण्यासाठी जी योग्य व्यक्ती लागते त्या व्यक्तीच तो अशा गोष्टींबद्दल बोलू शकतो. त्यामुळे आपला नवरा आपल्याशी फारसे काही बोलत नाही याचा अर्थ हा नसतो की त्याला आपल्याला काही सांगायचे नसते किंवा आपण त्याच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. किंवा आपल्यावर आता त्याचे प्रेम राहिले नाही.

वरील गोष्टी लक्षात न आल्यामुळे अनेक लग्ना बाहेरील संबंध वगैरे गोष्टी जास्त होताना आज-काल दिसतात. त्यामध्ये शारीरिक गरज हे मुख्य बाजु नसते तर मानसिक गरज ही बाजू आहे.

ऑफिस मध्ये वगैरे काम करणाऱ्या स्त्रिया याला जास्त बळी पडतात आणि पर्यायाने पुरुष देखील. ऑफिसमधील कोणीतरी मित्र आपले सर्व म्हणणे कॅंटीनच्या टेबलवर निवांत ऐकतो आहे ही भावना देखील स्त्रियांना सुखावते. आपला नवरा आपले म्हणणे ऐकून घेत नाही परंतु समोरील व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेत आहे असे त्यांना वाटू लागते. परंतु हे पूर्वी ्वतःच्याच नवर्‍याबद्दल किंवा बॉयफ्रेंड बद्दल त्यांना कधीतरी वाटले असते. कारण विचारांची देवाण-घेवाण होईपर्यंत एकमेकांचे ऐकून घेणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आत्ता कॅंटीनच्या टेबलवर तुमचे म्हणणे ऐकून घेणारा मुलगा किंवा पुरुष हा काही काळाने परत तुमच्या नवऱ्या सारखाच वागणार आहे यात फारशी शंका नाही.

मी स्वतः कोणत्याही माणसाचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतो मग तो पुरुष असेल किंवा स्त्री. कारण मला एकंदरीतच समोरच्या माणसाचा स्वभाव किंवा त्याचे नेचर काय आहे याबद्दल अभ्यासायला आवडते. परंतु या माझ्या वागणुकीचा मला फटकाच बसला आहे. कारण आधीच लग्न झालेले किंवा रिलेशन मध्ये असलेली स्त्री माझ्या बरोबर बोलताना प्रचंड मोकळीकतने बोललेली आढळली. हेच जर का सिंगल मुलगी असेल तर मात्र ती मला रद्दीचा देखील भाव देणार नाही. कारण ती तिच्या विश्वात गुंग असते. कॉर्पोरेट मध्ये काम केल्यामुळे हा अनुभव बरा झाला परंतु समोरच्या मैत्रिणीला ठाम ही गोष्ट मी समजावून देखील सांगितले की तुला आत्ता जे वाटत आहे तेच तुला कधीतरी तुझ्या नवऱ्याबद्दल वाटत होते त्यामुळे या गोष्टींमध्ये पडून क्षणिक गोष्टींच्या मागे गेल्यासारखे असेल. यामध्ये मी समोरील व्यक्तीचा फायदा घेतला नाही. मी त्याच्यासाठी स्वतःला ग्रेट वगैरे मानत नाही कारण मी पूर्ण स्वार्थी आहे. कोणत्याही माणसाला मी स्वतःला शेपूट म्हणून जोडून घेत नाही. समोर माणूस असेल तेव्हा त्याचे पूर्णपणे ऐकून घेणे व पाठ फिरवली हे त्या माणसाला विसरून जाणे माझा स्वभाव आहे. परंतु तू मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच महिला या एका साध्या भावाने गोष्ट मुळे दुसऱ्या माणसांमध्ये अडकलेल्या तुम्हाला सहज दिसून येतील.

त्यामुळे प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला स्त्री म्हणून देखील तिचा मानसिक आणि शारीरिक अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक बायकोला आपल्या पुरुष म्हणून त्याचा शारीरिक आणि मानसिक अभ्यास कारणे गरजेचे आहे. जेणेकरून या छोट्या गोष्टींमुळे होणारे दुरावे कमी होतील.

या झाल्या मानसिक गोष्टी.

शारीरिक गोष्टींबद्दल देखील स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे असतात. एका वाक्यात सांगायचे झाले तर मी कुठेतरी वाचले होते, पुरुष सेक्स साठी प्रेम करतो आणि स्त्री ही प्रेमासाठी सेक्स करते. प्रत्येक पुरुष आणि स्त्रियांना मी हा न्याय लावणार नाही परंतु बहुतांशी किंवा सर्वसाधारणपणे जी गोष्ट आहे ते सांगत आहे. हे नैसर्गिक आहे. यामध्ये अपवाद असू शकतात परंतु सर्वसाधारणपणे पुरूष हा स्त्रीच्या सौंदर्याकडे आणि देहाकडे आकर्षिला जाऊनच पुढे घडणाऱ्या गोष्टी होतात. स्त्री ही पुरुषाच्या सौंदर्यापेक्षा त्याचा स्वभाव आणि त्याच्या मधील गुणधर्म किंवा त्याच्यातील अबिलिटी आणि कपॅसिटी या गोष्टी बघून मग पुढील गोष्टी होतात.

यामध्ये मी खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु हाच सल्ला मात्र नक्की देईल हे प्रत्येक पुरुषाने शारीरिक दृष्ट्या या स्त्रीला काय हवे आहे अभ्यास करायला हवा. केवळ आपल्या शरीराचे भूक भागत आहे हा विचारच चुकीचा असतो. शारीरिक प्रेमामध्ये आपल्या शरीराच्या संतुष्टी पेक्षा समोरील व्यक्तीच्या शरीराची आणि मनाची संतुष्टी होत आहे की नाही याकडे लक्ष दिले दोघेही एकमेकांना संतुष्ट करू शकणार असतात. परंतु त्यासाठी समोरच्या माणसाची मानसिकता आणि शारीरिक गरज काय आहे हे माहिती करून घेणे फार गरजेचे आहे. त्या व्यक्तीशी बोलून देखील आणि मेडिकल पॉईंट ने देखील.

अर्थात माझ्याबद्दल जवळपास सर्व लोकांना माहिती असेलच त्यामुळे मी एकटा राहून देखील या विषयांवर का बोलतो. एकटेपणावर आणि त्यातल्या फायदा बद्दल मी आजपर्यंत नेहमीच बोललो आहे. परंतु आजूबाजूला जे काही छोटे वाद-विवाद व त्यातून घडणाऱ्या मनस्तापाचा गोष्टी याबद्दल जर का चार शब्द सांगून काही फायदा झाला तर त्याच्यासाठी हा प्रपंच.

#mayurthelonewolf



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

23 thoughts on “शारीरिक आणि मानसिकरीत्या एकमेकांना कसे समजून घ्याल?”

  1. हा लेख वाचुन विचार करायला भाग पाडल.

  2. मानसिक आणि भावनिक पात्रांमधील सुसंवाद यशस्वी
    जीवनाची पाऊलवाट असते याचे उदबोधक विवेचन…

  3. छान लिहिलाय लेख. दोघातील सुसंवाद महत्वाचा. मला तू कसा हवायेस व तु कशी हवियस मला ह्याची जाणीव आली की दोघातील हार्मनी बदलेल असे वाटते. ‘ तेरा जादू चल गया…’ असे वाटणे महत्वाचे..!!

  4. अप्रतिम…याआधि येवढं छान उत्तर कुठे च नाहीं मिळालं

  5. खूप छान आमचे वाद का होतात ते माहित झाले

  6. Khup aavdla……infact me mazyasathi aani bfsathi ha lekh vacht hote…..aata smjl prem man bhandan he sgl ka hot

  7. अभ्यास पूर्ण व वस्तूस्थिती दाखवून देणारा लेख आहे.

  8. Shivaji राऊत

    नवीन मुलं मुली साठी हा लेख खूप महत्त्वाचा आहि

  9. Nice lekh……Please lekh post kartana ekda proof reading karat java… Khup thikani visangati hoti so link lagat nahi vachtana….

  10. लेख आणि विषय फारच चांगला आहे परंतु काही ठिकाणी सुसंगतपणा आढळत नाही.

  11. Sujawala Dattaram Sawant

    हा लेख पुर्णपणे अभ्यासपूर्ण विचार करून लिहिला आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!